मुखवटा का आसवे ढाळीत आहे? --खयाली तरही--

Submitted by कावळा on 1 February, 2013 - 10:14

तरही साठी दिलेल्या खयालांबद्दल बेफिकीर यांचा आभारी आहे.

चांदण्यासाठी सदा झुंजीत आहे
चंद्र पदरातील दुर्लक्षीत आहे

नाचताहे,गात आहे चेहरा,पण;
मुखवटा का आसवे ढाळीत आहे?

एक ना खांदेकरी नात्यातला अन
चार पुत्रांची जमा शिलकीत आहे

झुंजतो आहे सदाचा जीवनाशी
सोबतीला 'तू' जरा शोधीत आहे

'कावळा' शिवताच पिंडाला पटावे
जो जळाला तो कुण्या योनीत आहे.

-कावळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा ! होय की...

पण बरे झाले आधी नाही वाचली ते.... मतला...खांदेकरी टकरा गये कावळेदादा Happy

आवडली गझल Happy

मतला आवडला.

खर्‍या नावाने न वावरण्याचे उदात्त हेतू कळाले मात्र मक्ताही खोट्या नावे लिहण्याने आपली गझलेबाबतची गंभीरताही कळते.
आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो तिला चारचौघात उघडे पाडू नये असे वाटते....

........शाम

'कावळा' शिवताच पिंडाला पटावे
जो जळाला तो कुण्या योनीत आहे.<<< वेगळाच आहे, तखल्लुसचा समर्पक वापर होत आहे, पण तरीही शाम यांच्याशी सहमत!

मतला आवडला. अचूकता ढळली नसली तरी सुबकता किंचित अधिक हवी होती असे वाटून गेले. कृ गै न!

खयाली तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन कावळा!