चला देवदर्शन आणि पर्यटन करुया

Submitted by Sanjeev.B on 1 February, 2013 - 04:22

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
मागच्याच आठवड्यात गणपतीपुळे, कोल्हापुर, बेळगाव, बिजापुर आणि तुळजापुर ला जाण्याचे योग आले, त्या दरम्यान काढलेले प्र चि.

गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिर
Ganpatipule1_0.jpg

करविर नगरी स्थित श्री महालक्ष्मी मंदिर
Mahalaxmi Temple 1_0.jpg

करविर नगरी स्थित श्री महालक्ष्मी मंदिर
Mahalaxmi Temple 2.jpg

श्री महालक्ष्मी मंदिर दिपमाळ
Mahalaxmi Temple Deepmaal.jpg

बेळगाव माळ मारुती मंदिर
Maal Maruti Mandir.jpg

कणबर्गी, बेळगांव श्री सिध्देश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार
Kanbargi Siddheshwar Mandir Entrance.jpg

कणबर्गी, बेळगांव श्री सिध्देश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार
Kanbargi Siddheshwar Mandir Entrance1.jpg

कणबर्गी, बेळगांव श्री सिध्देश्वर महादेव मंदिर
Kanbargi Siddheshwar Mandir.jpg

कणबर्गी, बेळगांव श्री सिध्देश्वर महादेव मंदिराच्या खालती मध माश्यांचे पोळ
Kanbargi Siddheshwar Mandir Bee Hive.jpg

कणबर्गी, बेळगांव श्री सिध्देश्वर महादेव मंदिराच्या आवारात उत्सव वेळेस महाप्रसाद करण्यासाठी बांधलेले चुल
Kanbargi Siddheshwar Mandir Chool.jpg

कणबर्गी, बेळगांव श्री सिध्देश्वर महादेव मंदिराच्या आवारात उत्सव वेळेस महाप्रसाद करण्यासाठी वापरण्यात येणारे भांडी
Kanbargi Siddheshwar Mandir Utensils.jpg

तुलजापुर स्थित श्री तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वार
TuljaBhavani Mandir Praveshdvaar.jpg

श्री तुळजाभवानी मंदिर आवारात केलेले रोषणाई "जय भवानी"
TuljaBhavani.jpg

श्री तुळजाभवानी मंदिर आवारात पालखी मिरवणुक
TuljaBhavani Paalquin Miravnuk.jpg

श्री तुळजाभवानी मंदिर
TuljaBhavani Mandir.jpg

**********************************************************************************************************

बिजापुर येथील गोल घुमट
Gol Ghumat.jpg

बिजापुर येथील गोल घुमट
Gol Ghumat1.jpg

गोल घुमटा बरोबरच बाजुला असलेले मिनार
Gol Ghumat Minaar.jpg

गोल घुमटा शेजारी असलेले मशिद
Gol Ghumat Masjid.jpg

गोल घुमट आवारात ठेवलेले तोफ
Gol Ghumat Canon.jpg

धन्यवाद Happy

- संजीव बुलबुले / ०१.फेब्रुवारी.२०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद उदयन, चैत्राली, रंगासेठ, दिनेशदा, शोभा आणि विनायक. Happy

चैत्राली, दिनेशदा आणि शोभा : कामाचे व्याप असल्या कारणाने प्रवास वर्णन लिहायचे जमत नाहीये.

त्यातल्या त्यात :-

तुळजापुर साठी बिजापुर हुन आम्ही संध्याकाळी ६.३० (शनिवार दिनांक २६.०१.२०१३) वा निघालो. मंदिरात पोहोचे पर्यंत रात्रीचे ९.३०/९.४५ वाजले होते, तेथे आम्हास कळले कि १०.०० वाजता दर्शन बंद होणार, लगबग करुन ही आम्हास फक्त पालखी चे दर्शन झाले. पालखी दर्शन झाल्यावर आम्हा सगळ्यांस मंदिरा च्या बाहेर जाण्यास सांगितले होते, तरी आम्ही बाहेर न जाता, आम्ही मंदिरा समोर होतो, काहीही झाल्यास, मंदिर आवार सोडायचे नाही असे ठरविले आणि थोड्या वेळाने बहुतेक शेजारती सुरु झाली व मंदिर आवारातल्या काही भक्तांना आत मध्ये सोडले, त्यावेळेस आमच्या सोबत आमचे मातोश्री होते. सौ, माझी बहिण अणि तिचे कुटुंब बाहेर गेल्या मुळे आम्ही आत गेलो नाही, तरी फोन करुन सगळ्यांना बोलावुन घेतले आणि बाहेर थांबले तर देवी ची कृपाच झाली, मंदिरा मध्ये शिरायला मिळाले आणि आरती मिळाले, आरती मिळाल्या नंतर लगेचच बाहेर जायला सांगितले.

पालखी दर्शन झाले तेव्हा आम्ही मंदिरा बाहेर चौकशी केले तेव्हा असे कळले कि रात्री आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केल्यावर रात्री १२ वाजता परत उघडणार आणि परत देवी दर्शन साठी रांग लागणार, म्हणुन आरती मिळाल्यनंतर आम्ही मंदिर आवार सोडले नाही, तिथेच बसुन राहिलो, बरेच जण होते. रात्री ११.०० च्या सुमारास सुरक्षा रक्षकांने सर्वांना मंदिराच्या बाहेर काढले आणि मंदिराचे दरवाजा बंद केले. आम्ही सर्व जण मंदिराच्या पायर्‍यांपाशी बसुन होतो, दुसर्‍या दिवस (२७.०१.२०१३) शाकंभरी पोर्णिमा असल्या कारणाने फार गर्दी होती, बरोबर रात्री १२ वाजता मंदिराचे दरवाजा उघडण्यात आले आणि सर्व देवी भक्त रांग लावण्यासाठी पळत सुटले, आम्ही ही पळत सुटलो, आम्ही पहिलाच चौकशी करुन ठेवले होते कि रांग कुठे लावायचे ते म्हणुन सरळ योग्य ठिकाणी जाऊन रांग लावले आणि आमचे रांगेत तिसरा - चौथा नंबर लागला (परत देवी ने कृपा केली), बघता बघता रांग वाढु लागली आणि तासा भरात माझ्या मागे अंदाजे ५०० देवी भक्तांने रांग लावली होती. रात्री १.१५ - १.३० आम्हास देवी दर्शन झाले आणि नंतर रात्री २.०० - २.१५ वाजता आम्ही मुंबई ला निघण्यास प्रयाण केले.

तत्पुर्वी तुळजापुर ला पोहचण्यापुर्वी २६.०१.२०१३ तारखे ला बेळगाव हुन आम्ही दुपारी २.०० वाजता बिजापुर ला जाण्यासाठी बेळगाव सोडले. बिजापुर ला आम्ही संध्याकाळी ५.१५ ला पोहोचलो, टिकीट काढले आणि गोल घुमट पाहण्यासाठी आत गेले.

तिथे गाईड ने दिलेल्या माहिती प्रमाणे गोल घुमट मध्ये जे खाली जे कबर दिसते, ते मुळ कबर नव्हे, त्याच्या ही खुप खाली एक कबर आहे. गोल घुमट हे तिथल्या राजाचे (बहुतेक आदिलशहा) चे नर्तकी चे नृत्य दरबार होते. बाहेरुन जरी हे घुमट गोल दिसत असले तरी आत मध्ये अष्टकोणी बांधकाम आहे. Diagonally उभे राहिल्यास समोर च्या भिंती मध्ये जरी हळुवार पणे बोलले तरी Diagonally समोर उभा असलेल्या माणसाला भिंती मध्ये त्याचे स्पष्ट echo ऐकु येते, त्याचे प्रचिती आम्हास आले. Diagonally अंतर ही फार मोठे होते (अंदाजे २०-२५ मिटर). हे सातव्या मजल्यावर होते, त्याकाळी सात मजले चढणे म्हणजे काय असतं, अफझल खान सारख्या उंच पुरा माणुस जेव्हा एक पायरी चढतो तेव्हा ते आपल्या सारख्या माणसांसाठी तीन पायर्‍या असतात, असे एक मजल्या वरुन दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी १५-२० पायर्‍या होते आणि ७ मजले. ७ मजले चढुन झाल्यावर पुर्ण दमछाक होते, आणि ७ व्या मजल्यावरुन बाहेर आल्यावर बाहेर मस्त थंड वारा बरं वाटतं आणि बिजापुर शहराचे विहंगम दृश्य ही छान दिसते.

सुंदरच प्र.चि आणि धावते वर्णन. वेळात वेळ काढुन आम्हाला देवदर्शन दिलेत त्याबद्दल तुमचे आभार. बिजापुर शहरही छानच आहे.

गेल्या रविवारी तुळजापुर ला जाण्याचा योग आला. देवीचं मुखदर्शन झालं आणि भरुन पावलो.
पण तेथील घाण, दुर्गंधी व अस्वच्छता बघुन कधी इथुन निघतोय असं झालं.
मला असं वाटतं एवढी घाण बघुन देवी आई, कधीच तेथुन निघुन गेली असणारं! Sad