सांग तुला हे जमेल का ?

Submitted by रसप on 30 January, 2013 - 23:24

कधी मिळावे तुझे तुलाही
तुझ्याकडुन जे मला मिळाले
मनात वादळ, उरात कातळ
पाझरणारे अबोल छाले..

सांग तरीही माझ्यासम तू
उधार हासू आणशील का ?
एकच मोती गुपचुप माळुन
'सडा सांडला' मानशील का ?

फसफसणाऱ्या लाटांनाही
खळखळणाऱ्या सरिता बनवुन
अवघड असते हसू आणणे
डोळ्यांमध्ये समुद्र झाकुन

समजा जर हे तुला मिळाले -
'कातळ, छाले, वादळ-वारे'
कविता, स्वप्ने, हळवे गाणे
परत मला दे माझे सारे

सांग तुला हे जमेल का ?
सांग तुला हे कळेल का ?
व्याकुळलेली शून्यनजर ही
तुला जराशी छळेल का ?
........सांग तुला हे जमेल का ?
........सांग तुला हे कळेल का ?

....रसप....
३० जानेवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/01/blog-post_31.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे...... आशय चांगला व्यक्त झालाय.
---------------------------------------------------------------------------------

'छाले' हा हिन्दी शब्द खरोखरच आवश्यक होता का असे एकदा वाटले.
मराठी व्यतिरिक्त शब्दांवर माझा आक्षेप नाही.
कृगैन.

मलाही आवडली
कणखरजींचेही पटले
बाजीरावांचेही !(हेच की आता आमच्या तुझ्याकडून अपेक्षा वाढल्यात अन तू एक कवी म्हणून आजवर जो विकास साधला आहेस त्याच्या पुढेच तू जायला हवेस अश्या टप्प्यावर तू आहेस वगैरे अर्थ मी काढला :))

ही कविता केवळ अप्रतीम आहे यातही काहीच शंका नाहीच आहे

"यह 'बेचारा' तो रोज देर से आता हैं, लेकिन गधे के बच्चे, तू क्युं देर से आया ..?'' - अशी एक हैदराबादी गंमत आहे.... ती आठवली !! Wink

असो..!

सर्वांचे मत मनोमन पटते... नक्कीच, 'अ लाँग वे टू गो..'

-----------------------------------

The woods are lovely, dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep..
And miles to go before I sleep....

- Robert Frost.

मस्तच रणजितदा .
आवडली कविता .

मनात वादळ आहे ठीक आहे , उरात कातळ आहे हेही ठीकच . पण "पाझरणारे अबोल छाले" ही प्रतिमा खूपच संदिग्ध वाटली .