आता कुठे पचकण्याची आली जरा उभारी!

Submitted by येऊकामी. on 30 January, 2013 - 11:51

गझल
आता कुठे पचकण्याची आली जरा उभारी!
इतक्यात नावपत्ता एडमीन मला विचारी!!
माबोमुळेच झालो सोशीक एवढा की,
मी ठोसले बियरचे प्रपात ते उदरी!
डुआयडीही दिले तू, मज HTML8ही दिले तू....
नाही तुलाच आली घेता कधी फरारी!
होते सुरू अचानक ये-जा शायर पैलवांनांची
जेव्हा मला खाली माझीच दिसते विजारी!
आयुष्य सर्व गेले, काढीत फक्त धागा....
एडमीना! आडवाच आहे घेवून मी डुआयडी!
डुआयड्यांवरुन येतो अंदाज मुळायड्यांचा;
वाचायच्याच आधी झोपतो किती दुपारी!
गाढवा चढव भले कितीही दळिंद्री सांज त्यांना;
कळतेच खानदानी आहेत ते डुआयडी!
सोडून मूलायडी डुआयडीलाच होय फाशी!
अन् राजरोस होती पैलवान पहा फरारी!!
माबोत काय पडलो, धाग्यात रंग भरला!
धागा तोच आहे, टुकार परी खुमारी!!
मी तोच कालचा, पण, डुआयडी नवीन आहे!
टाळायचे मला, ते देतात लाथ भारी!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शेर झाला की स्पेस देत जा
वृत्त काफिया रदीफ पाळायलाच हवेत विडंबन असो की गझल !

असो जे लिहिले आहे त्यावर खळ्खळून हसलो
धन्यवाद
पुलेशु