हजल : चिखलफेक

Submitted by राजीव मासरूळकर on 30 January, 2013 - 03:33

चिखलफेक

सांगते मी देश सारा माझिया हातात आहे !
मी इथे दिल्लीत आहे , तू तिथे चिखलात आहे !

सोनियाचे दिन दिले मी भारताला परत जनहो
हे विपक्षी वाद घालुन सांगती, हा घात आहे !

मी अता केली तयारी, बाळ माझा राष्ट्रनेता !
दाखवेलच तो हुशारी केवढी रक्तात आहे !

मी गळा काढून सांगितले सुपुत्रा राजकारण
राजशाहीची प्रथा या रांगड्या देशात आहे !

- राजीव मासरूळकर
दि २०.१.२०१३
सायं ४.४५ वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीवल्लभजी , आभार .

महेशजी , नाही हो .
त्या दिवशी राहूल गांधींना सोनियाजींनी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष (म्हणजेच UPA-ADHYAKSHAच ना ?)पदी Promote केलं होतं .

कविता लिहिल्याची दिनांक आणि वेळ आहे ती .
माझ्या फेसबुक अकाउंटवरून कॉपी पेस्ट केली आहे . त्यामुळे ती आली आहे इथे .
असो . धन्यवाद .

णिषेदावर धन्यवाद देणारे तुम्हीच .>>>

पुनश्च धन्यवाद !

ओरिजनल चिखल्यादादांचा जयजयकार असो !

मकरंद.११७७
आपलेही आभार !

चिखल फेक आहे
त्यातले कमळही फेक आहे

आपण मतदारांनीसुद्धा नेक रहायला हवं !

Happy

अ . अ . जोशी सर ,
सहमत !

भट साहेबांच्या बाराखडीनुसार पाच शेर असावेत , पण आधुनिक मराठी गझलेचे पुरस्कर्ते आता किमान तीन शेरांवर येऊन ठेपले आहेत . तीन शेरांचीही गझल मानणारा मोठा वर्ग आता निर्माण झाला आहे .

डॉ श्रीकृष्ण राऊत सरांचा मराठी विकीपीडीयाने स्विकारलेला लेख
"मराठी गझल तंत्रशुद्धता कि तंत्रशरणता" मधील ओळी काय सांगतात बघा ,

"पाचवे आणि शेवटचे कलम : दोन दोन ओळींच्या किमान पाच कविता (पाच शेर)

गझलेतील शेरांच्या संख्येची किमान मर्यादा सुरेश भटांनी पाच सांगितली तर माधव जूलियनांनी कमाल मर्यादा सतरा सांगितलेली आहे. पाचपेक्षा कमी शेरांच्या स्वत:च्याच गझलांना सुरेश भटांनी अपूर्ण गझला म्हटले आहे.त्यामुळे शेरांची संख्या किती असावी, याचेउत्तर देखील कवी किती शेर उत्तम लिहू शकतो असेच आहे. कवीच्या मनातला आशय उत्कटपणे केवळ तीन शेरांतच मांडला गेला असेल तर व्याख्येच्या पूर्ततेसाठी त्याने आणखी दोन शेर लिहून त्याच गझलेत घातले तर तेदुधात पाणी घालण्यासारखेच होईल. काफिये उपलब्ध आहेत म्हणून कवीने सुचतील तेवढे शेर गझलेत लिहून आपले पांडित्यप्रदर्शन करण्यापेक्षा उत्कट जमलेले शेर संपादन करून गझलेत ठेवल्यास कलाकृतीम्हणून गझल घाटदार होईल."

धन्यवाद .