नाते... तुझे नि माझे !

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 January, 2013 - 02:27

शब्दात नेमक्या कुठे मांडता येत सगळं ?
फुलतं जातं कधी-कधी नातं जगावेगळं !

मृद् -गंध येतो का साठवता...
इंद्रधनु कुठे येत पकडता ?
आकलनशक्तीच्याही पार पलिकडलं ....
फुलतं जातं कधी-कधी नातं जगावेगळ !

अश्या एकाच नात्याला कुठलचं लेबल लावू नये
दरवळत रहावं मनभर अर्ध्यावरतीचं खुडू नये !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली छान आहे

काही टायपो खटकले......अक्षराच्या वर अनुस्वारासारखे टिंब असते ते मिस करतोय अनेकजागी

गझलकारा सुप्रिया जाधव आपणच का?

रहावत नसल्याने ह्या अशा कविता होतात. आपण गझलेत दाखवता तो समजूतदारपणा इथे दाखवाल का प्लीज?

आणि किती ते अनावश्यक अनुस्वार???