सातवा सिलिंडर

Submitted by सुरेश शेठ on 28 January, 2013 - 15:12

सातवा आसमान , सात अजुबे , सप्ताह ,सप्तपदी ,सप्तसूर ,सप्तश्री ,असे अनेक सप्तक आपण अनुभवतो ,ऎकतो ,वाचतो ,पाहतो ."आम्ही सातपुते " हा एक चित्रपट देखील आपण पा हिला आहे .यात एक नवीन भर पडली आहे ती "सातवा सिलिंडर ची ". नुकताच पी चिदम्बरम साहेबांनी एक फतवा काढला आणि एका कुटुंबास दरवर्षी फक्त सहा अनुदानित ग्यास सिलिंडर्स मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले .सातवा सिलिंडर हा बाजारभावाप्रमाणे घ्यावा लागणार हे समजल्यावर अस्मादिकांची झोपच गायब झाली .
आरश्यासमोर बसून सहाचा आकडा नऊ कसा होतो हे पाहतापाहता चिदम्बरम देखील असा पराक्रम कधी करणार याची आस लावून बसलो ! "ध "चा "मा "करण्या इतके सहा चे नऊ करणे सोपे आहे असे आमच्या बालबुद्धीस वाटत होते. मनाला सहा म्हणजे उलटे नऊ असे समजावत, समजावत एकदाची गाढ झोप लागली .
झोपेत स्वप्न पडल ! स्वप्नात दिसले ग्यास सिलिंडर्स चे संमेलन ! सहा सिलिंडर्स सातव्या सिलिंडर ला चिडवत होती :" आता काय तुझा भाव वधारला. तुझी किंमत आमच्या पेक्षा ५०० रुपयांनी जास्त ! तू आता स्वतंत्र ,स्वयंभू ,अनुदानाच्या कुबड्या नसलेला .तू आता श्रीमंताच्या घरी विराजमान होणार !ऐट आहे बाबा तुझी !" सातवा सिलिंडर सुखावला ,आनंदी झाला .पण थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले " आपला नंबर सातवा ,पहिले सहा सिलिंडर संपल्याची आपण वाट पाहायची !नंतरच आपला पर्याय !बरेच लोक आपल्याला टाळणार आपण येवू नये म्हणून प्रयत्न करणार ,शेवटचा नाईलाज म्हणून आपला वापर करणार ! काय उपयोग आहे आपली किंमत वधारून !लोकांच्या मते आपण नको असलेले ,लादलेले !खरतर आपण आधीचेच बरे होतो !आपण त्या सहा सिलिंडर बरोबर जायला हवे .
सातव्या सिलिंडर्स ची एक बैठक होते . त्यांचे शिष्टमंडळ दिल्ली ला जाऊन चिदम्बरम साहेबाना भेटते .त्यांच्या वेदना, दुः ख त्यांच्या समोर मांडते .ते ऐकून चिदम्बरम साहेबाचे मन द्रवते .त्यांनी सहाचे नऊ करायचे मनावर घेतले .
आता दस नंबरी सिलिंडर्स काय करतात ते पाहूया !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users