अंदमान आयलंड भाग २

Submitted by जिवेश on 28 January, 2013 - 10:23

अंदमान चे फोटो फुलस्क्रीन बघण्यासाठी पुढील लिंक तपासा.
https://picasaweb.google.com/lh/myphotos

अंदमान सफरीची तयारी ६ महिन्याआधी सुरू केली. आम्ही ६ मित्रांनी अंदमानच्या विमानाच्या रीटर्न तिकिट बुक केल्या आणि सर्व एका जबरदस्त प्लानची वाट पाहु लागलो. आम्ही तसे सर्व engg चे मित्र होतो. अनेक पिकनिक, ट्रेक्स एकत्र केले होते. पण हा बराच मोठा प्लान होता आमच्यासाठी पण प्लान सक्सेस होईल कि नाही माहित नव्हत. :-). जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे एक एक जण कॅन्सल होऊ लागले. प्रत्येकाचे काही ना काही वैयक्तिक कारण होती. जेव्हां जायला अगदी एकच महिना राहिला होता तेव्हां तर आम्ही दोघेच उरलो होतो अंदमानला जाण्यासाठी, मी आणि माझा मित्र नितेश. पण आम्ही जायचं तर पक्क केल होत.काहीही झाल तरी बेत रद्द करायचं नाही. पण दोघांनीच जायचं?. असा प्रश्न आम्हास पडला.
शेवटी असे ठरले कि मी आणि माझी सौ व नितेश आणि त्याचे आईबाबा असे पाचजण तयार झालो.जायच ठरल आणि बेत पक्का झाला. अंदमानला राहण्याची आणि फिरण्याची बुकिंग पण केली. आता वाट पहात होतो ते अंदमान सफरीची आणि अर्थातच याचा आनंद काहि औरच होता. Happy

दिवस १ :
जायचा दिवस उजाडला. माझी सौ फारच खुश होती. तिला अंदमान बघायची फार इच्छा होती. आमची सकाळची फ्लाईट होती. मुंबई विमानतळावर सकाली चहा पीत असताना मन फार excited झाल होत. आम्ही येणार्याा दिवसांचा प्लान discuss करू लागलो .. आमचे विमान चेन्नईवरून जाणार होते. साधारण दुपारी एक वाजता आम्ही अंदमानच्या वीर सावरकर विमानतळावर पोहोचलो. अंदमान बेटावर उतरण्याआधी वरून अंदमानचे फार सुंदर दर्शन घडत होत . वातावरण तस ढगाळ होत. आम्ही weather report बघून आलो होतो. पहिले ४ दिवस पाउस त्रास देणार होता. सकाळी मुंबईतून निघालो तेव्हां मस्त गुलाबी थंडीचा अनुभव आला. पण अंदमानच वातावरण या उलट उष्ण व दमट होत. इथे कधी थंडी पडत नाही . पाउस सुद्धा कधीही पडू शकतो. एकदम बिनभरवशाच वातावरण. वातावरणाबद्दल मला इतकी काळजी चांगली फोटोग्राफी करता येईल कि नाही यामुळे होती :-). चांगले फोटो मिळण्यासाठी सूर्यप्रकाश हवाच. सूर्यप्रकाशात समुद्राच्या पाण्याचा रंग छान मिळतो. पण अंदमानचं ढगाळ वातावरण बघून माझी निराशा झाली, पण मी स्वत:ला समजावलं थोडं आभाळही हवेतच कि फोटोग्राफीसाठी. या एका गोष्टीवर नितेशचे आणि माझे एकमत झाले.

आमचा गाईड संदीप आम्हाला न्यायला आला होता. आम्ही हॉटेल सिल्वर स्प्रिंग्स मध्ये चेक इन केल. दुपारच्या जेवणानंतर आम्ही थोडा आराम करायचं ठरवलं. पण झोप येत नव्हती. आम्ही सर्व बाहेर फिरायला जायला निघालो आणि पावसाने आमचा मूड ऑफ केला. अक्षरशः जुलै महिन्यातील पावसाळ्यातील दिवस आठवतील असा पाउस पडत होता. अगदी ढग दाटून येउन पाऊस पडत होता. तरीही आम्ही बाहेर निघालो, आमच्या ड्रायव्हरने आम्हाला कॉर्बीन कोव बीचवर नेल . पण बाहेर पडायची कोणाची हिम्मत झाली नाही, पावसाने आमचा पहिल्याच स्पॉटवर विचका केला. शेवटी आम्ही अजून वेळ न घालवता सेल्युलर जेलला "sound and light show " बघायला निघालो. आम्ही पोहोचलो तेंव्हा साधारण ५ वाजले होते, आणि अंधार पडायला लागला होता. बघता बघता १५ मिनिटात एकदम अंधार झाला . आपल्या देशाच्या स्वातंत्र्यावर आधारित हा शो छान होता. प्रत्येकाने आवर्जून बघावा असा. नंतर आम्ही आमच्या रूम वर आलो. पाउस मात्र रात्रभर पडत होता.

प्रची १.
catmeran मधून काढलेला , अंदमान च्या पावसाळी दिवसांचे वर्णन करणारा फोटो.
दिवस २ :
आमची सकाळ पुन्हा एकदा पावसाने सुरू झाली. परत आज फोटोग्राफीसाठी चान्स कमी मिळणार असं वाटल. आम्ही आज "Havelock Island"साठी निघालो. आमची क्रुझ (catmeran ) होती ८.४५ ची. पोर्ट ब्लेअर ते अंदमान साधारण ६०किमी आहे आणि जायला २ तास लागतात. प्रवास मस्त झाला. आम्ही ११ वाजता Havelock जेट्टीला पोहोचलो. हॉटेल symphony palm मध्ये आमची राहण्याची सोय होती. आम्ही बॅगा टाकून लगेच Elephant Beach साठी निघालो. एका मिनी बोटीने आम्ही साधारण ४५ मिनिटात तेथे पोहोचलो. पाउस थांबला होता, पण वातावरण ढगाळ होतं. आजचा दुसरा दिवस असुनही अजून मनासारखी फोटोग्राफी करता आली नव्हती. मी बोट मधून उतरल्या उतरल्या कॅमेरा, tripod घेऊन निघालो चांगल्या फ्रेम च्या शोधात. नितेश माझ्यासोबत होता. माझ लक्ष सारख ढगांकडे होत कधी ते बाजूला होतील, आणि सुंदर निळा पाण्याचा रंग मला टिपायला मिळेल. पण सूर्य तर सकाळ पासून दिसलाच नव्हता. elephant beach ला elephant बघायला नाही मिळाला. पण त्सुनामीच्या काळात पडझड झालेली झाड लक्ष वेधत होती. मी beach चे दोन्ही किनारे हुडकून काढले, भरपूर फोटो काढले, पण सर्व black आणि white कारण ढगाळ वातावरण. मग आम्ही एलिफंट बीचवरून साधारण २ वाजता havelock जेटीला येउन दुपारचे जेवण घेतले. आमच्या पुढच्या भटकंतीचे ठिकाण होते "काला पठार बीच". हा समुद्रकिनारा अंदाजे २ ते ३ किमी पसरलेला असुन त्याला लागुनच काळा दगड सापडतो म्हणून याला "काला पठार बीच" म्हणतात. माझी आवडती motion blur photography ज्याला नितेश ने "दगड photography " नाव दिल होत. Happy हे ठिकाण यासाठी उत्तम आहे.
दगड photography बघण्यासाठी पुढील लिंक तपासा.
https://picasaweb.google.com/110807543474750270497/MotionBlurrPics?authk...
प्रची २.
एलिफंट बीच

प्रची ३.
काला पठार बीच

ढग दाटुन येऊन अंधार होत होता आणि तेवढ्यातच एक सूर्याचा एक किरण दिसला आणि त्याने काळ्या ढगांवर एक तांबडी छटा आणली. सुर्य प्रकाशचा उत्तम खेळ मी पाहत होतो. बघता बघता एक इंद्रधनुष्य उभ राहील. मी स्तब्ध होऊन सारे काही पाहत होतो. निसर्गाचा हा सुंदर खेळ बघुन आम्ही तेथुन निघालो.
प्रची ४.
काळ्या ढगांवरील तांबडी छटा .
दिवस ३ :
अंदमान मध्ये वातावरण अचानक बदलत असते अस सर्व म्हणत होत, त्याच उत्तम उदहरण आम्हाला आज बघायला मिळाल. सकाळी जेव्हां मला जाग आली तेव्हां बाहेर चक्क सूर्यप्रकाश Happy . मी लगेचच उठलो आणि कॅमेरा घेऊन हॉटेलच्या बीच वर गेलो. नितेश माझ्याआधीच तिथे आला होता. कडक सूर्यप्रकाश, निळेशार समुद्राचे पाणी, पांढरीशुभ्र वाळू पाहून mala वेड लागण्याचे शिल्लक होते. काल परवा पर्यंतची black आणि white जिंदगी अचानक रंगीबेरंगी झाली होती. माझा कमेरात क्लिकक्लिकाट सुरु झाला. इतक कमी होत कि काय नितेशने मला ओरडून मागे बघायला सांगितलं आणि बघतो तर काय दुहेरी इंद्रधनुष्य Happy
प्रची ५.
दुहेरी इंद्रधनुष्य Happy

प्रची ६.
havelock island .

हा क्षण टिपण्याची माझही धडपड सुरु झाली. हे सर्व पाहून आम्ही दोघेही फार excited झालो होतो. आज तिसर्या8 दिवशी खर्याआ अर्थाने अंदमानच पाहिजे तसं दर्शन घडत होत जे नेहमी दुसर्यांच्या फोटो मधून बघितलं होत. नंतर आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या मागे लागलो , आमच आजच भटकंती destination होतं " नेल आयलंड " साधारण २ किमी व्यासाच्या आकारच आयलंड आहे , पण लोक वस्ती ४००० आहे. आज एका छोट्याश्या बोटीने आमही येथे गेलो, havelock पासून साधारन २ तास लागले आम्हाला पोहोचायला. नेलच्या पहिल्या बीच वर आम्ही उतरलो तो लक्ष्मणपूर बीच. बीच तसा उथळ होता. पण निर्मनुष्य होता. मला असे बीच फार आवडतात. आज मी फुल बेभान झालो होतो बीच वर पाय ठेवल्यापासुन माझी आणि नितेश ची भटकंती सुरु झाली होती. बर्या च महिन्यांपासून जे चित्र रंगवले होते त्यांचा अनुभव घेत होतो. समोरच चित्र थोड्या थोड्या वेळाने बदलत होत, ढगांचा खेळ चालू होता मी सर्व टिपत होतो. वेगवेगळ्या कोनातुन फोटोशूट करत होतो. अगदी स्वर्गीय अनुभव घेत होतो. पाण्याचा रंग मनाला वेड लावत होता. मनसोक्त फोटो काढल्यावर आम्ही नेल आयलंडच्या दुसर्याय बीचवर गेलो. भरतपूर बीच. इथे आम्ही glass bottam असलेल्या बोटीतून कोरल्स बघितले. मग मस्त शहाळ्यांचा आस्वाद घेतला.

लक्ष्मणपूर बीच
प्रची ७.

प्रची ८.

प्रची ९.

प्रची १०.

दुपारी आम्ही एका बंगाली घरगुती हॉटेल मध्ये जेवलो. आमचा पुढचा सीतापुर बीच फार घाई गडबडीत झाला कारण आम्हाला उशीर झाला होता आणि अंधार होण्याआधी आम्हाला havelock जेटी ला पोहोचायचं होत. या बीच वर natural bridge formation बघण्यासारख आहे. जे दगडाने बनल आहे. बाकी पाहण्यासारखं जास्त काही नाही. घनदाट जंगल तर अंदमानची खासियत आहेत. प्रत्येक आयलंड वर तुम्हाला त्याच दर्शन होईल. परतीचा प्रवास आम्ही साधारण ३.३० ला सुरु केला पोहोचता पोहोचता ५ वाजले आणि एक अप्रतिम सूर्यास्त बघयला मिळाला.

भरतपूर बीच
प्रची ११.

प्रची १२.

natural bridge formation " सीतापुर बीच "
प्रची १३.
दिवस ४ :
आज आमचा havelock आयलंड वरचा शेवटचा दिवस, आम्ही सकाळी आशियातील सर्वोत्तम दहा मध्ये येणार्या " राधानगर बीच"साठी निघालो. साधारण १०किमी अंतर कापून आम्ही तेथे पोहोचलो. रस्त्यात अंदमानच्या घनदाट जंगलाच दर्शन घडत होते. दुपारी ११ वाजता आम्ही तेथे पोहोचलो होतो. उन त्रास देऊ लागल होत. अंदमानला आल्यापासून अनेक बीच बघितले पण राधानगर बीच टॉप टेन मध्ये का, हे मला बघायचं होत. पोहोचल्यावर आम्ही बीच explore करायला निघालो. तसा दिसायला सुंदर होता पण एक वेगळी गोष्ट या बीचला इतरांपेक्षा वेगळ करत होती ती म्हणजे समुद्राच्या लाटा .बघायला फारच मस्त वाटत होते. नंतर मी आणि नितेश नेहमी प्रमाणे बीच exploration साठी निघालो. उन फार होत पण फिकीर नव्हती . १५ मिनिटे चालल्यावर आम्ही एक सुंदर स्पॉटवर आलो. एक अजून सुंदर बीच आम्हाला दिसला होता. आम्ही तिथेच TRIPOD ठोकून photography सुरु केली . मनसोक्त फोटो काढल्यावर आम्ही बीचला लागून असलेल्या जंगलात शिरलो. फार छान वाटत होत झाडांच्या सावलीत, मग तिथल्या पक्षांचा वेध घेत आम्ही परत निघालो. मुख्य बीच वर येई पर्यंत फार थकवा आला होता चालून चालुन. मग दुपारच जेवण करून आम्ही havelock जेट्टी कडे निघालो. havelock आयलंड तसं फार मोठ आहे , बरंच काही बघण्यासारख आणि exploration साठी आहे. पण वेळ फार कमी आहे. havelock च्या सुंदर आठवणी घेऊन मी catmeran मध्ये बसलो.साधारण ७ वाजता आम्ही पोर्ट ब्लेअरला आलो आणि इथल्या हॉटेल मध्ये चेक इन केल.

राधानगरी बीच
प्रची १४.

प्रची १५.

प्रची १६.
दिवस पाचवा :
आजचा दिवसात आम्ही विविध प्रकारच्या म्युझियम्स, सॉ मिल, सेल्युलरजेल इ बघितलं. सर्व निवांत पाहुन होण्यास दोन वाजले. त्यातल्यात्यात मला चातम सॉ मिल , मरिन museum आणि सेल्युलर जेल पाहण्यासारखे वाटले. सेल्युलर जेल मध्ये वीर सावरकरांची खोली आवर्जून बघावी. गाईड अवश्य करा , त्याच्याकडून येथील इतिहास ऐकताना खुप छान वाटत. जेलच्या वरच्या मजल्या वरून मस्त view आहेत . नॉर्थ बे आयलंड, रोस आयलंड फार छान दिसतं इथुन. दुपारच्या जेवणानंतर आम्ही कॉर्बीन कोव बीचला गेलो. हा बीच नाही बघितला तरी चालेल. आपल्याकडच्या चौपाटी सारखा बीच आहे हा. Happy

सेल्युलर जेल
प्रची १७.

प्रची १८.

प्रची १९.
दिवस सहा:
अंदमानच्या प्रत्येक बेटाची विविधता आहे, काहीतरी नवीन नक्कीच पाहायला मिळेत . तसाच काही पाहायला मिळाल आम्हला jolly bouy या बेटावर. सकाळी आम्ही गाडीने ३०किमी दूर वान्डूर कडे पोहोचलो. येथून राजीव गांधी मरीन नॅशनल पार्कसाठी फेरी सुटतात , joully bouy आयलंड हा याच पार्कचा एक भाग आहे. हा भाग मासेमारीसाठी वर्जित आहे. इथे प्लास्टिक संबंधी कोणतीही गोष्ट आपण घेऊन जाऊ शकत नाही. येथे मरीन प्राण्यांचं संवर्धन केल जात. आपल्या फेरी च्या तिकिटात snorkling हा प्रकार आपल्याला करायाला मिळतो. बोट समुद्र मधेच नांगरली जाते आणि आपल्याला काचेचा तळ असलेल्या बोटीतुन कोरल्स दाखवत किनार्याावर सोडतात. आम्ही पोहोचलो तेव्हां साधारण ११ वाजले होते मस्त उन पडला होत, छान ढग होते. एका seascape फोटो साठी अजून काय हव आहे? हे आयलंड फारच छोट होत अर्धा मैल पण नाही भरणार. आम्हाला ठराविक भागात जायला , डुंबायला सांगितलं होत. पण मी फोटोसाठी पूर्ण आयलंड पालथ घातल. या आयलंडची गोष्टच न्यारी. ते फोटो मध्ये दिसेलच तुम्हाला.निसर्ग वेड लावत होता आणि म्हणून कि काय मी या बीच ला "most beutiful beach, i ever seen," अस बोललो. याच ओळीत सर्व काही आल.

jolly bouy island
प्रची २०.

प्रची २१.

प्रची २२.

मी आणि नितेश दोघेही मस्त अनुभवत होतो आणि टिपत होतो. मनसोक्त फोटो काढल्यावर मला पाण्यात डुंबण्याचा मोह आवरला नाही. सूर्यप्रकाश पाण्याला सुंदर भेदत होता. मधेच कुठेतरी छोट्या मास्यांचा झुंड दिसत होता, मधेच कोणता तरी रंगीत मासा, अस सर्व काही बघयला मिळत होत.नंतर snorkling केल हा एक फार मस्त अनुभव होता. फार उड्या मारल्यावर आम्ही परत वान्डूर ला आलो. आम्ही घाईत लंच केल ,कारण आम्हाला आज चिडिया टापूला जायचं होत. हे अंदमान बेटावरच साउथच ठिकाण आहे. इथे सनसेट बघायला आम्ही आलो . सनसेट बघायला मजा आली.आमच्या बरोबर भरपूर couple आले होते या स्पॉट वर. त्सुनामी मध्ये येथे फार हानी झiली आहे त्याच्या बर्याीच खुणा येथे बघयला मिळतात. हि जागा पोर्ट ब्लैर पासून ३० किमी आहे , हॉटेल वर जायला आम्हाला रात्र झाली.
प्रची २३.
दिवस ७ :
आज आमचा भरगच्च प्लान होता. रोस, नॉर्थ बे ,वायपर अशे तीन आयलंड बघायचे होते. आम्ही सकाळी १० वाजता फेरी पकडली, हीच फेरी आपल्याला तीनही आयलंड दाखवते. या फेरी राजीव गांधी जेटी वरून सुटतात. आधी आम्ही रॉस आयलंडला आलो. ब्रिटिश लोक येथे राहायचे. त्यांनी हे आयलंड डेव्हलप केल आहे. त्यांची राहण्याची घर, पडझड झालेले चर्च, पाण्याच्या टाक्या अस अनेक गोष्टी बघायला मिळतात. मोर , हरीण सर्रास फिरताना दिसतात. मी नेहेमीसारख पूर्ण आयलंड पालथ घातल. आता बराच भाग indian navy कडे असल्याने तो आपल्याला visit करता येत नाही. रोस वरून मग आम्ही वायपर आयलंड बघायला निघालो. बोट मध्येच आम्हाला लंच मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे वीरांना फाशी दिली जायची ते फासी घर इथे आहे. बाकी बघायला काही नाही आहे. आम्ही नंतर आमच्या शेवटच्या आयलंडला निघालो नॉर्थ बे. २० रुपयाच्या नोट वर जे चित्र आहे ते या बीच च आहे. आम्ही पोहोचलो तेव्हां ३ वाजले होते . आम्ही येथे seawalk चा अनुभव घेणार होतो. seawalk म्हणजे ३० फुट पाण्यात आपल्याला oxygen supply देऊन मासे ,कोरल्स दाखवले जातात, आपण त्यांना हात सुद्धा लावू शकतो. पाण्यात बागडण्याचा आणि कोरल पाहण्याचा हा ३०मिनिटाचा खेळ इतका अप्रतिम होता कि अंदमान ट्रीप चे पैसे खर्याा अर्थाने वसुल झाले होते. या अनुभव बद्दल मी कितीही लिहील तरी ते कमी असेल. सर्वांनी एकदातरी याचा अनुभव अवश्य घ्यावा. वयोमर्यादा अजिबात नाही आहे. जे मासे, शंख, शिंपले आम्ही म्युझियममध्ये बघितले होते ते सर्व येथे प्रत्यक्श आम्हाला पाहायला मिळाले, स्पर्श करायला मिळाले. या सुंदर आठवणी मनात साठवत पुन्हा हॉटेलवर आलो.

रोस आयलंड
प्रची २४.

प्रची २५.

प्रची २६.

प्रची २७.
दिवस ८ :
सकाळी आम्ही mount harriet साठी निघालो. आज आम्हाला फक्त हा एकाच स्पॉट बघायचा होता . चातमच्या येथून आम्ही फेरी घेतली आणि bambooflat या ठिकाणी पोहोचलो. येथून १० किमी वर हा स्पॉट आहे. रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. अंदमान च जंगल म्हणजे दिवसा पण येथे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही. आम्ही फार आशेने आलो होतो कि aerial photography करायला मिळेल. पण अस काही झाल नाही. views एवढे चांगले नव्हते. येथून नॉर्थ बे चा view मिळतो आणि जंगलाचा. एक बगीचा मस्त बनवला आहे. येथे अजून काही बघण्यासाठी नाही आहे. मग आम्ही सिटी मध्ये लंच घेतलं. आणि मग आम्ही राजीव गांधी गार्डन ला बसलो. गेल्या ८ दिवसांमध्ये वातावरण मध्ये केवढे बदल झाले होते. आज आकाशात एकही ढग नव्हता. मस्त थंड हवा होती. शेवटचा दिवस आम्ही या समुद्राच्या बाजूच्या बागेत घालवला.
प्रची २८.

८ दिवसांच्या या भरगच्च प्लानची आमची ट्रीप आता संपली होती. किती आणि काय काय बघितलं होत याचा पत्ताच नव्हताता. सर्व आठवणी डोळ्यात साठवून आम्ही मुंबईकडे येण्यास निघालो.
प्रची २९.

काही सूचना:
१. हॉटेल मध्ये रूम AC बुक करावे , उष्ण व दमट वातावरण आहे.
२. फिरण्यासाठी कार AC असेल तर अजून सोयीस्कर होईल.
३. सर्वच आयलंड वर glass bottam ride आणि snorkling तुम्हाला करायला मिळेल. पण तुम्ही हे दोन्ही प्रकार jolly bouy आयलंडला करणे बेस्ट आहे. साधारण चार्जेस रूपये ३०० प्रति माणशी आहेत.
४. seawalk किवा स्कूबा डायविंग नक्की करा. चार्जेस रूपये .२८००, रूपये ४००० प्रत्येकी. नॉर्थ बे ला करावे.
५.सिटी मध्ये फिरण सोप्प आहे. रिक्षावाले चांगेल आहेत. Happy
६. नोव्हेंबर ते जानेवारी हा पिक सीजन आहे. फेब्रुवारी ते मे पर्यंत किफायती पॅकेजेस मिळू शकतील.
७. जेवण एकतर साउथ इंडियन किवा बंगाली पध्दतीच मिळतं.
८. विमान प्रवास महाग आहे पण सोयीस्कर आहे, flight तिकिट्स लवकर बुक करून घ्याव्या.
९.अंदमान च्या एरिअल photography साठी विमानाच्या मागच्या भागात डाव्या बाजूला बसावे.
१०.फोटोग्राफीसाठी अंदमान म्हणजे पर्वणी आहे. भरपूर वेळ काढुन यावे. Happy

अंदमान च्या अजून माहितीसाठी काही लिंक आहेत,व जाण्याआधी या अवश्य बघुन घ्या.
http://wikitravel.org/en/Andaman_and_Nicobar
http://as.and.nic.in/TourismAND/TCorner/AccommodationInAN.htm
http://www.tripadvisor.in/Tourism-g297583-Andaman_and_Nicobar_Islands-Va...
http://www.tripadvisor.in/Hotel_Review-g297584-d590009-Reviews-Andaman_R...
http://www.nativeplanet.com/andaman-nicobar/map/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिवेश, क्या बात है!! काय एकेक फोटो आहेत.. अप्रतिम!!!! अतिशय आवडले.
वर्णन ही मस्त !! तुझी एक्साईटमेंट इथपर्यंत पोचली
सूचनांकरता धन्स!!

व्वाह मित्रा... क्या बात है...
तसे सर्वच प्रचि मस्त आहेत पण काही प्रचि तर अफलातुन आहेत. लाजवाब...
दिवसाची सुरुवात मस्त झाली.

अप्रतिम प्रकाशचित्रण Happy

अदंमानची भटकंती खरच एक सुंदर अनुभव देणारी असते. प्रत्येक बीचची वेगळीच खासियत असते.

राधानगरी बीचची खासियत म्हणजे पाण्याच्या तळातील वाळू अगदी स्पष्ट दिसते. अप्रतिम बीच आहे.

प्रची ९ खासच... सगळे सिस्केप आवडले.

"most beutiful beach, i ever seen," > +१
jolly bouy island प्रचि २०च्या ठिकावरच आम्हाला अगदी किनार्‍यावर २ फुटावर रंगीत मासे दिसले होते. आतील कोरल्सची रंगीबेरंगी दुनिया जणू स्वर्गच! २००२मधे फक्त ५० रुपयांत कोरल्स पहाण्याची संधी मिळाली होती.

नाविक दलातील माझा एक मित्र ज्या आरमारी जहाजावर होता तें जहाज पर्यटकाना मज्जाव असलेल्या या बेटांच्या किनार्‍याजवळ आठ दिवस नांगर टाकून होतं. जगभरचे किनारे फिरलेला माझा मित्र म्हणतो कीं इतकं स्वच्छ, पारदर्शक पाणी व इतकं वैविध्यपूर्ण जलचर जीवन त्याने इतरत्र कुठेही पाहिलं नाही; तीस-चाळीस फूट खोल पाण्यातही खालचा तळ इतका स्पष्ट दिसणं हें आश्चर्यच !!! [ मी अजून या बेटांकडे फिरकलो नाही , हें कबूल करायला लाजही वाटते !]. प्रचिंबद्दल म्हणूनच पुन्हा धन्यवाद.

जिवेश, सगळेच फोटो अप्रतिम आहेत रे. बहुत मजा आ गया. Happy
एक अनाहूत सुचना - यातील काही फोटो तू नॅशनल जिओग्राफिकच्या फोटो कॉन्टेस्टसाठी पाठवुन द्यावेस.

अप्रतिम! खल्लासच! एकसे एक बीच आणि सुंदर ठिकाणं आहेत, माणसांची गर्दी अजिबात जाणवत नाही.
वर्णन व दिलेली माहिती तर फार उपयोगी! सीवॉक करावाच नक्की. Happy

जिवेश, एक शंका : अंदमान आणि निकोबार अशी ट्रीप असते की फक्त अंदमानलाच जाता येतं? निकोबार बेटांवर काही पाहण्यासारखं आहे?

प्रचि अप्रतीमच!
अंदमानला जाणार्‍यांनी खाली दिलेल्या लिंकवरील माहितीही नजरेखालून घालावी म्हणजे आज आपण जे पर्यटनाचा आनंद लुटायला तेथे जातो आहोत ते कोणाकोणाच्या त्यागामुळे शक्य झालेले आहे हेही नीट समजाऊन घेता येईल आणि ...
ते निव्वळ पर्यटन न होता ती एक कृतज्ञता-यात्राही होऊ शकेल.
http://www.maayboli.com/node/32973

अंदमान आणि निकोबार अशी ट्रीप असते की फक्त अंदमानलाच जाता येतं? निकोबार बेटांवर काही पाहण्यासारखं आहे?>> आपल्या नेहमीच्या ट्रीप्स फक्त अंदमानच दाखवतात. निकोबार बेटांवर आदिवासींच्या वस्त्या आहेत. तिथे खूप लिमिटेड ट्रीप्स असतात असं ऐकलंय. आणि त्यासाठीही परमिशन घ्यावी लागते असं ऐकलय.

साक्षी.

Pages