मूर्ग हैदराबादी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 27 January, 2013 - 22:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

DSC02197-002.JPGमॅरिनेशन :

चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून

ग्रेव्ही :

बारीक चिरलेला कांदा – २ कप
लसूण पेस्ट – १ टेबल स्पून
कोथिंबीर – अर्धा कप
पुदीना – अर्धा कप
हळ्द – १ टी स्पून
तिखट – १ टी स्पून
गरम मसाला – २ टी स्पून
मीठ – चवीनुसार
तळलेले काजू १०-१२
तेल – ४ टेबल स्पून

क्रमवार पाककृती: 

१. मॅरीनेशन चं साहित्य चिकनला चोळून चिकन साधारण दीड तास मॅरीनेट करा.

२. कढईत तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या.

३. मग त्यात लसूण घालून थोडं परता.

४. त्यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घाला.

५. आता त्यात चिकन चे मॅरीनेट झालेले तुकडे घालून परता.

६. मग त्यात अर्धा कप पाणी घालून नरम शिजवून घ्या.

७. शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीना आणि काजू घालून आणखी एक उकळी काढा.

८. मस्त चमचमीत तयार झालेलं चिकन कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून सर्व्ह करा. तबीयत खुश होणारच Happy

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ५
अधिक टिपा: 

दह्याचं मॅरीनेशन थोड्या आंबटपणासाठी. कारण ह्यात आपण बाकी काहीही आंबट घालणार नाही.
दही घातल्यामुळे छान मस्त तेल सुटतं असा माझा अनुभव आहे.
पुदीन्यामुळे एक मस्त आणि वेगळाच फ्लेवर येतो.
पिल्लाच्या वाढदिवसाला हा वेगळा प्रयोग एकदम सुपर डुपर हीट झाला त्यामुळे पिल्लु खुश ......पिल्लु खुश म्हणून आई पण खुश खुश Wink

माहितीचा स्रोत: 
नेट आणि स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

super..

दह्याचं मॅरीनेशन थोड्या आंबटपणासाठी. कारण ह्यात आपण बाकी काहीही आंबट घालणार नाही.

रिनेशन :

चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून
^^^
लिम्बे गोड पाहून घ्यावीत का?

वा वा व्वा

मस्त दिसत आहे. पिल्लूच काय पिल्लाचे मित्र मैत्रिणीही खुष झालेले असणार.

धन्यवाद

इब्लिसपणा यालाच म्हणतात .... Happy

अरे ...एक किलो चिकनला दोन चमचे लिंबाचा रस काय पुरणार...... आंबटपणा दह्याचाच येतो ....कळल्ल्ल्ल्ल्ल्लं.... Happy

जयवी.. तू तर या कलेतही माहीर दिसतेस.. तोंपासु आहे चिकन.. स्लर्पी!!!
द>>क्षे... ग्रेवी तरी खाऊन बघ गं .. बाकीचं आम्ही खाऊ हाकानाका...

हे हे हे........कंसराज फोटो नव्हता टाकायचा......अरे असं कसं.......इतकी मेहेनत केल्यावर, खाल्ल्यावर थोडा तो जलाना बनता है ना ....;) Wink

रेशिपी मधे स्माइल तडका दिल्याबद्दल आम्हाला चिकनचा नैवेद्य मिळाला अस्ता तर गोड वाटलं असत Wink

वेगळी वाटतेय रेस्पि...मी चिकनला नेहमी आलं-लसूण दोन्ही लावते.एकदा हे विदाउट काजू टृआय करून पाहेन.( पिल्लाला अलर्जॉ)
फोटो जास्तच टेम्प्टींग आहे..म्हणून खास कमे'ट Happy

मी केली होती काल हि रेसिपी...माझा हात तेलाला खुप कमि चालतो..४ टेबल स्पून ऐवजी मी एकाच वर भागवल्..आधी त्यात काजु तळले आणि मग कांदा परतला ... पण एकदम हिट ..नवरा खुश्...मलाही आवड्ली...thank you