माहीतीचा आधिकार आणी विद्यापीठ

Submitted by विजय देशमुख on 27 January, 2013 - 21:54

मी ज्यावेळी अमरावती विद्यापिठातुन मास्टर्सची डिग्री घेतली त्यावेळी ग्रेडींग पद्दत नव्हती. सध्याच्या विद्यापिठात मला जुन्या कोर्सेस चे ग्रेडस मिळु शकतात, पण त्याकरिता अमरावती विद्यापिठातुन अमुक विषयाचे एका आठवड्यात अमुक तास असे कोष्टक हवे आहे.

यापुर्वी हि माहिती सध्याचे विभागप्रमुख आणि विद्यापिठला इमेल व प्रत्यक्ष भेटुन मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

१. माहितीच्या अधिकाराचा वापर करुन ही माहिती मिळवता येईल का?
२. त्याकरिता नेमके काय करावे लागेल?
३. हि माहिती परदेशातुन बोलावता येईल का? की विद्यापिठ फक्त भारतातील पत्त्यावरच ही माहिति पाठवेल.
४. हि माहिती मागवण्यासाठिचे कारण फक्त लिहिणे गरजेचे आहे की सोबत तसे कागदपत्र जोडणेसुद्धा आवश्यक
असते?
५. अधिक काही सुचना/ माहीत

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्यापीठे ही माहितीच्या

विद्यापीठे ही माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येतात त्यामुळे आपण अशी माहिती विचारु शकता. आपण या विद्यापीठाच्या वेब साईटवर गेलात तर जबाबदार अधिकार्‍याचे नाव ही सापडेल. त्यांच्या नावाने आपण रजिस्टर्ड पत्राने किंवा स्वतः पत्र नेऊन त्याची पोच पावती घेऊन पाठ पुरावा करु शकता.

माहिती मागवण्याचे कारण लिहील्यास माहिती अधिकार्‍याचे काम सोप्पे होते. आपण परदेशातुन ही माहिती न मागवता इथुनच मागवली तर सोप्पे होईल असे वाटते.

ग्रेडेशन आणि टक्केवारी यांचे एक कोष्टक जरी त्यांनी सही शिक्याने दिले तरी जुने टक्के म्हणजेच त्याला अनुसरुन ही ग्रेड असे तुम्हाला सांगणे सोप्पे होईल.