मुक्या वेदनांचा मुका मार होता!

Submitted by सतीश देवपूरकर on 27 January, 2013 - 13:24

गझल
मुक्या वेदनांचा मुका मार होता!
कृपेचा तुझ्या फक्त आधार होता!!

मला ठाम ठाऊक होते, जगा हे.....
तुझा आळ जात्या निराधार होता!

तरीही उभारी किती मी धरावी?
मनावर व्यथांचा किती भार होता!

फळे जी कडू, गोड वाट्यास आली....
कृतींचाच माझ्या गुणाकार होता!

पशू हिंस्रही सर्व शरमून गेले....
असा माणसांचा दुराचार होता!

जिथे बारमाही अहोरात्र दारू!
घराच्या जवळ नेमका बार होता!!

विडी, पान, दारू, उभा जन्म चालू!
तरीही जिता तो....चमत्कार होता!!

नव्हे गाठ पडणार, पडलीच पण ती....
किती तो दिखाऊ नमस्कार होता!

फुलांनी कशा टाकल्या आज माना?
कुणाचा इथे आज सत्कार होता?

सुळाने तयाला नमस्कार केला!
किती धन्य तो वीर झुंझार होता!!

फुले द्यायचे, घ्यायचे लोक तेथे...
फुलांचा तिथे चोरबाजार होता!

दिसाया दरिद्री जरी आज आहे!
अरे! कालचा तो वतनदार होता!!

मनस्वीच जगला! मनस्वीच मेला!
अरे, शेवटी तो कलाकार होता!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसाया दरिद्री जरी आज आहे!
अरे! कालचा तो वतनदार होता!!>>>
हे असे पाहिजे होते

दिसाया दरिद्री जरी आज आहे!
अरेरे! कालचा तो वतनदार होता!!

प्रसादराव तुम्ही जाम भारी आहात राव!

अहो तो दुसरा रे भरीचा आहे म्हणून सरांनी तो वापरला नाही ......व पहिल्या अरे बद्दल म्हणाल तर तो अरे वृतात बसतो म्हणून सरांनी तिथे सफाईदारपणे योजला आहे ;हे काय तुम्हाला वेगळे सांगावे लागणार आहे आता ?

काय हे प्रसादराव नसत्या शंका घेताहात अशाने तुमच्या सौंदर्यबोधाबद्दल व गझलेतील नॉलेज बद्दल लोक प्रश्न उपस्थित करू लागतील ....मग तुम्हाला देवसरांच्या गझलेच्या कॉलेजमेधे( कॉलेज नावाला ....खरेतर वेड्यांचे इस्पितळच ते!!).....प्रवेश घ्यावा लागेल .....बघा बुवा तुमचं तुम्हीच

मीही अत्ताच वाचलं

हसू की रडू कळत नाहीये
जाउदे हसतोच.............हसावं म्हणे;अंगी लागतं हसलं की

निर्भय प्रतिसाद >>>> Rofl