Submitted by -शाम on 26 January, 2013 - 05:35
कुणीतरी हकललेली
आलीच परत
काठी टेकवत
चिंध्या सावरत ...
मुक्तीच्या जल्लोषात
नाचली असेल बाहुली घेवून
इतकं असावं वय
तेंव्हा नसेल जाण कुट्ट भविष्याची
आणि आता नसेल ती सय
जेंव्हा हातात घेतला
थरथरणारा हात
"खाऊ मिळलं ना मला?"
पुटपुटली कानात
तिच्या प्रश्नाने उठलेलं वादळ
माझ्या पापणीबाहेर येण्याआधी
घामाचा डंख नसलेली
ओरडली शुभ्रखादी......
"चला गुर्जी, झंडा फडकून घेऊ!"
................................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचल्या बरोबर मनाला भिडते ती
वाचल्या बरोबर मनाला भिडते ती खरी कविता. तुमची कविता तशी आहे!!
दुर्दैवान आमच्या देशाची परिस्थिती आहे खरी अशी. पण आज एखादी सकारात्मक कविता तुम्ही लिहा . स्वातंत्र्यानंतर आपल्या देशान बरच काही कमावल सुध्दा आहे. ते तुमच्या काव्यात वाचून नव , अधिक चांगल घडवायला स्फूर्ती यावी अस काही तरी लिहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
प्रत्यक्ष जगलेल्या
प्रत्यक्ष जगलेल्या अनुभवलेल्या घट्नेचा संदर्भ वापरला आहेत का शामजी ? .... तसे वाटले !
ती कोण हे मला नीटसे समजले नाही क्षमस्व
कवितेच्या समारोपावरून आजच्या २६ जानेवारीचा पर्यायाने भारताच्या लोकशाहीचा व थोडे पुढे जावून राज्यघटनेचा काही संदर्भ असावा इतकेच लक्षात आले
पण खूप वेगळ्या धाटणीची कविता आहे
आवड्ली
भावना पोचल्या.
भावना पोचल्या.
वैवकु साठी ओलांडून पुढे
वैवकु
साठी ओलांडून पुढे गेलेल्या भारतीय लोकशाही बद्दल बोलत असावेत ते.
(मठ्ठ) इब्लिस.
तिच्या प्रश्नाने उठलेलं वादळ
तिच्या प्रश्नाने उठलेलं वादळ
माझ्या पापणीबाहेर येण्याआधी
घामाचा डंख नसलेली
ओरडली शुभ्रखादी......
फार सुंदर शब्दरचना....
अजयजींशी सहमत.
अजयजींशी सहमत.
सुरेख मांडलं आहेस..
सुरेख मांडलं आहेस..
आवडली कविता.
आवडली कविता.
आवडली कविता. मनापासुन
आवडली कविता. मनापासुन लिहीलीय.
बापरे!! काय बोलू??
बापरे!!
काय बोलू??
स्वातंत्र्यप्राप्तीच्या
स्वातंत्र्यप्राप्तीच्या जल्लोषात बाहुली घेऊन नाचलेली , कुट्ट घोर भविष्याची जाण नसलेली , अजून जिवंत असलेली बहिष्कृत (नातेवाईकांकडून) असहाय म्हातारी , स्वातंत्र्यप्राप्तीच्या गोड फलितावर नेमकं बोट ठेवणारा तिचा भाबडा प्रश्न आणि तो ऐकून घामाचा डंखही न झालेल्या खादीतल्या पुढाऱ्याचं तिच्या प्रश्नावरून सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी गुर्जीला झेंडा फडकवायला सांगणं !
संपूर्ण अनुभवच नेमका , विलक्षण आणि अंगावर शहारा आणणारा आहे .
भारतीय स्वातंत्र्य कसं असहाय , असुरक्षित , विफल आणि राजकारणकेंद्रीत आहे हे या कवितेतून म्हातारीच्या रूपकातून नेमकेपणानं व्यक्त झालं आहे .
विशुद्ध अनुभवासाठी सलाम !
सुंदर
सुंदर
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो!! @
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो!!
@ वैभव, बीटवीन द लाईन आणि बिहाइंड द वर्ड काहीतरी असल्याखेरीज कविता समृध्दपणे पोचत नाही असे मलाही वाटते. ते तसे होत नसेल तर ती माझ्यातली उनीव आहे.
राजीव विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद!
... धन्यवाद!
सुरेख कविता !! खूप
सुरेख कविता !! खूप आवड्ली..
खूप शुभेच्छा !
छान..... कमीत कमी शब्दांत भाव
छान..... कमीत कमी शब्दांत भाव चांगले व्यक्त झालेत.
व्वा, उत्तम पकडलंत
व्वा, उत्तम पकडलंत
या विषयावर खूप दिवसांनी
या विषयावर खूप दिवसांनी चांगली कविता वाचली.सुंदर .
धन्यवाद दोस्तान्नो!
धन्यवाद दोस्तान्नो!