झाड आणि वस्ती

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 January, 2013 - 00:29

एक सुंदर झाड होते.
उंचच उंच गर्द पानांचे
फळांनी लगडलेलं
किलबिल करणाऱ्या
पाखरांनी अन घरट्यांनी
अवघे भरून गेलेलं.
शिकारी प्राण्या पासून
खूप सुरक्षित असलेलं.
म्हणून मग
त्या झाडावर हळू हळू
नवीन पाखर येवू लागली
घरटी बांधून राहू लागली
सुरवातीला त्याचे कुणालाच
काही वाटले नाही
हळू हळू पण फांद्या
कमी पडू लागल्या
बेचक्या तर उरल्याच नाही .
तरीही झुंडी मागून झुंडी
पाखर येतच राहिली
एव्हाना त्या झाडाजवळ
ससाणे साप व्याधही
येवून वावरू लागले
पण जगण्यासाठी ते झाड
खूपच सोयीस्कर होते
म्हणून ती पाखर तरीही
तिथेच राहू लागली
पण ते झाड आता
अस्ताव्यस्त दिसू लागले
जागा कमी पडू लागली
काही स्वार्थी पाखरांनी
बुंधा फांद्या टोकरून
नव्यांना जागा करून दिली
मोबदल्यात
भरपूर कीड खाल्ली .
त्यामुळे झाड खचू लागले
खुरटू लागले
ते पाहून झाडावरची
जुनी जाणती गोळा झाली
अन त्यांनी फर्मान काढले
सारी नवीन घरटी
तोडण्यात यावीत
खूप भांडण पाखरात
खूप लढाया झाल्या
अन शेवटी त्यावरही
एक तोडगा निघाला
अमुक काळा नंतरची
घरटी पाडण्यात यावीत
काडी काडी गोळा केलेलं
एकेक घरट मग
उध्वस्त होऊ लागलं
भरपावसात भिजलेली पिलं
पंखाखाली घेवून
पक्षीण आक्रोश करू लागली
कीड खावून फुगलेली पाखर
आपल्या उंच घरात
गुपचूप बसून राहिली
पावूस पडतच होता
मोडलेल्या घरट्यांची
काडीन काडी वाहवत होता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काडी काडी गोळा केलेलं
एकेक घरट मग
उध्वस्त होऊ लागलं
..... खरेच आहे.

थोडं पद्यात्मक अधिक असते तर उत्तम झाले असते.
तरी चांगले आहे.

जोशी ,धन्यवाद .खर आहे खूप गद्य झाले आहे .विषय असा होता की गाडी सुटली .सिग्नल ,सौदर्य स्थळ न पाहताच मुक्कामावर पोहोचली .असो.