युट्युब वर आवाज येत नाही

Submitted by श्री on 24 January, 2013 - 23:52

माझ्या लॅपटॉपवर युट्युबवर आवाज येत नाही. जो स्पिकरचा सिंबॉल असतो युट्युबच्या व्हिडिओ खाली त्याच्यासमोर X अशी खुण ( स्पिकर बंद असल्याची ) आहे. माझ्या लॅपटॉपचे स्पीकर व्यवस्थित चालु आहेत पण फक्त युट्युबलाच हा प्रॉब्लेम येतोय. कशामुळे होत असेल ? आणि सॉल्व कसं करायचं ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्काईप मधे सेटीन्ग्ज मधे जाऊन चेक करा तिकडे स्पिकर्स सिलेक्ट करून बघा वेगवेगळे. एक लिस्ट असते स्पिकर्सची, त्यात हेडफोन, ब्लूटूथ, पीसीचे स्पिकर्स असे ऑप्शन्स असतात.

वेगळा ब्राउजर वापरुन पहा.
ब्राउजर्चा डॅटा क्लिअर करा.
फ्ल्याश प्लेअर रिइन्स्टाल करा.

हेड फोन लावून ऐकताय का? तिथे काहीतरी प्रश्न असेल. नाहीतर ल्यापटॉपच्या सेटिन्ग मध्ये काही गडबड आहे का?

ब्राऊझर व्हर्शन आणि फ्लॅश प्लेअर वर्शन्स कॉम्पॅटिबल नसावेत. दोन्हीही अपग्रेड करून पहावे....

धन्यवाद सगळ्यांना प्रयत्न करुन बघतो.
मी फायर फॉक्स वापरतोय , वर सांगितलयं तसा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर बघतो.

जिथे क्रॉस येतो आहे तिथेच आवाज कमी-जास्त करायचा ट्रँगल असेल. त्यावर सगळ्यात डावीकडे क्लिल करून माऊस उजवीकडे घेऊन जा. थोडक्यात आवाज मोठा करा.

अगदीच बेसिक सांगते आहे. कदाचित तुम्ही करूनपण बघितले असेल. पण मधे माझ्याकडे यु ट्युबवर आवाज येत नव्हता तेव्हा हे करावे लागले होते. कधीकधी एखाद्या वीडिओलाच असे होते.

कंट्रोल पॅनेल>>साऊंड>>प्लॅबॅक>>आता "स्पीकर्स" वर डबल क्लीक करा>>स्पीकर्स प्रॉपर्टीज>>लेव्हल्स>>ऑडीओ आउटपुट>> इथुन मॅन्युअली स्पीकर्स इनेबल करुन बघा
कदाचित तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होइल Happy

झालं बुवा एकदाचं , अडोब फ्लॅश प्लेयर अन इन्स्टाल केला आणि परत इन्स्टाल केला .
रमड लॅपटॉपला किक मारायचीच बाकी ठेवली होती. Proud

स्टेप बाय स्टेप

१. कान तपासून घ्यावेत
२. स्पीकर्स तपासून घ्यावेत
३. यू ट्यूब तपासून घ्यावी
४. सगळे आलबेल असल्यास नारायण नागबळी करावा. एक चालत नसलेला माऊस घाटावर नेऊन त्याचा बळी द्यावा.
५. लवकरात लवकर पुण्यकर्मे, दानधर्म वाढवावे.