मलाही प्रश्न पडतोच...

Submitted by प्रेरीत on 24 January, 2013 - 14:04

आपलं सहज दु:ख राहू द्यावं आतच
की...काय करावं?़
की दुसर्‍याजवळ बोलुन दाखवून
त्या दु:खाचा अपमान करावा...
छे?कां नाही मी सामान्य माणसासारखा
याबद्दल शोक करु की खेद, खंत करु की चिंता?
पूर्वी जमायचं सहज अश्रु ढाळणं...
आता तर त्यांना ही पोक्तपणा आलाय
अनिमिष.
तेही येतात जाणते गंभीर होऊन...
कुठे उगवावी रात्न अन कुठे अंत शुक्राचा,
ऋतू तसं क्षितीज बदलतं...
वाईनच्या रसात मिसळून जातो
पेल्याचा झंकार आणि उरतात
जणू तरंग आधी तिच्यावर
मग मनावर...
पण अस्तंगत न होणार्‍या
सूर्या सारखा प्रश्न एकच छळवादी...
दु:ख मी आतच राहू द्यावं
की त्याला होऊ द्यावं अपमानित?
त्याची होऊ द्यावी किंमत?
छे!ते पुराणपुरुषाचं दु:ख आहे,..अजात...आणि अज्ञात...
दरवेळी इथेच येऊन संपते याविषयावरची कविता...काय करू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users