प्रेम

Submitted by सागर123 on 24 January, 2013 - 13:38

प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम,
आजकालच्या युगात लैला मजनूचा गेम,
मित्राची मैत्रिण पण आपला नेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . ..
कॉलेजला जायचं फ़क्त नावचं असतं,
कट्यावर बसणं आमचं कामचं असतं,
भिडली नजर की झाला फेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . ..
प्रेमपत्र आणि कबुतरांचा जमाना गेला,
फेसबुक आणि मॅसेजेसचा जमाना आला,
भेटला नंबर की नाईट पॅक सेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . ..
कुणाची गर्लफ्रेंड कोणकुणाचाबॉयफ्रेँड ,
पार्ट टाइम जॉब जसा, मधेस्टोरीचा दी एण्ड,
प्रत्येक वर्षी रिलेशनचेंजहा एकच ऐम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . ..
वाट लागली देवा इथे खरया प्रेमाची,
किंमत नाही कोणाला काही कुणाच्या भावनेची,
कोण सांगेल अर्थ त्यांना, काय असते हे प्रेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . ..
भिडली नजर त्यांची आणि झालागेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users