?????

Submitted by UlhasBhide on 23 January, 2013 - 03:29

अनेक दिवसांनंतर परवा ऑनलाईन येऊ शकलो. माबोवर फेरफटका मारला.
अचानक काहीतरी स्फुरलं, लिहिलं; पण कुठल्या विभागात प्रकाशित करावं या संभ्रमात पडलो.
कारण जे काही(तरीच) लिहिलंय त्याला
कविता म्हणावं की न-कविता की न-गझल ??
’काकाक’ विभाग नसल्यामुळे अखेरीस कविता विभागात पोस्ट करतोय.
(या विभागात काहीही पोस्ट केलेलं चालतं ..... Wink ..... क्षमस्व.)
-------------------------------------------------------------------------------------------------

मागतो ते दान आताशा पडाया लागले
वाटते हे भाग्य आता फळफळाया लागले

लागले मिसरे सुचाया काफिया मिळताक्षणी
आणि वेगे गझल-जाते घरघराया लागले

बहर ये जमिनीस या, मी बीज अस्सल पेरता
जीर्ण, वठले वृक्ष सारे उन्मळाया लागले

दाटला अंधार होता, या नभाच्या अंगणी
कोंबडा दे बांग माझा, फटफटाया लागले

साठ होता बुद्धि नाठी, अनुभवाने जाणले
मन्मनी तारुण्य आता मुसमुसाया लागले

कोण हा उल्हास ? याला भीड, मुर्वत ना जरा
कोण कुठले लोक येथे कडमडाया लागले

.... उल्हास भिडे (२३-१-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लागले मिसरे सुचाया काफिया मिळताक्षणी
आणि वेगे गझल-जाते घरघराया लागले<<< Proud

कोण हा उल्हास ? याला भीड, मुर्वत ना जरा
कोण कुठले लोक येथे कडमडाया लागले<<<

भीड ना मुर्वत जरा - असेही एक सुचले आपले. कृ गै न

मक्ता फारच तिखट! Happy

धन्यवाद बेफीजी.

भीड ना मुर्वत जरा >>> प्रथम असंच सुचलं होतं.
परंतु, भीड, मुर्वत हे शब्द मराठीत एकत्र उच्चारले जात असल्याने
"भीड, मुर्वत ना जरा" असे लिहिले.

मक्ता फारच तिखट! >>> वाचकाच्या मनात येऊ शकणारे माझ्याबद्दलचे विचार व्यक्त केलेत.
मलाच उद्देशून असल्याने तिखट इ. चा फारसा विचार केला नाही..... Happy

मी पहिल्या ओळीतच माती खाल्ली

मागतो ते दान आताशा पडाया लागले >> हे मी मागतो ते "दात" आताशा पडाया लागले... असं वाचलं. त्यामुळे Rofl

जरा सावरले की संपूर्ण वाचून मग मतप्रदर्शन करीन.

बहर ये जमिनीस या, मी बीज अस्सल पेरता
जीर्ण, वठले वृक्ष सारे उन्मळाया लागले........ मनापासून आवडली ही द्विपदी

बाकिची नझल, नविता किंवा नाकाक ब्येष्टच ! Proud

काका,
सुंदर आहेत काही द्विपदी एकदम

पण कवितेस शिर्षक का नाही? ते तर द्या!!

बहर ये जमिनीस या, मी बीज अस्सल पेरता
जीर्ण, वठले वृक्ष सारे उन्मळाया लागले>> वा, वा!

जाते Lol

Rofl

क्लासिक विडंबन उकाका(प्रा. साहेबांच्या मूळ रचनेपेक्षा खूप कसदार शायरी आहे यात)
जियो !!!
लै भारी
हे गझल विभागात हलवून सार्वजनिक केले तरी चालेल सर्वाना दिसेल

रियुडे हे वाच ...........
http://www.maayboli.com/node/40424

काळजाचे पान कुठले फडफडाया लागले ..........माननीय प्रा.स.दे.(उर्फ "माबोला त्रा -स-दे" )यांची रचना Lol

( टायपोला पण सोडत नाहीत हे गझलकार )वैवकु (बास का? Proud ) Rofl

माझ्याबद्दल राग आहे का काही मनात?
का असा सूड उगवताय? Sad

का मला त्यांच्या गझला वाचायला लावताय? Lol

का मला त्यांच्या गझला वाचायला लावताय?>>> Rofl
_________________________________
नाही गं ...तुझ्यावर कसला राग !! मी तर तुला लाडाने रियुडे म्हणालो Wink

उप्स
हे ईडंबन होते?

मी स्माईलींच्या भीतीपोटी त्यांच्या गज़ला वाचतच नाही आता Happy Proud

असो ;
बाकी रिया तुझ्या प्रत्रिसादात एक हायकू दिसतो आहे मला ..........ज्यास चुकून वैवकू असे नाव तू दिलेस
____________________
वैवकू :
माझ्याबद्दल राग आहे का काही मनात?
का असा सूड उगवताय?
....का मला त्यांच्या गझला वाचायला लावताय?

_____________________

तुझ्या परतिभाशक्तीला सल्ल्लाम रियुडी !!!

कवितेबद्दल बोला म्हणालीस ते याच साठी ना.. ...लब्बाड!! Wink

Lol

सर्वांना धन्यवाद.

वैवकु.
विडंबन म्हणून हे लिहिलं नाही.
प्रस्तावनेत म्हटलंय त्याप्रमाणे सहज काहीतरी स्फुरलं .... लिहिलं.
असो.....
मी नेहमी म्हणत आलोय तेच परत एकदा :
लिखाण प्रकाशित केल्यावर त्यावर लेखकाचा प्रताधिकार असू शकतो;
पण मताधिकार केवळ वाचकांचा, रसिकांचा.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.