विदेशात शॉपिंग साठी सल्ला ""थायलंड""

Submitted by तुक्या on 21 January, 2013 - 06:22

आमच पुढिल महिन्यात थायलंडला जाण्याचं ठरवलं आहे...
मी पहिल्यांदाच विदेशात जाणार असल्यामुळे मला काही मदत आहे..
थायलंड मध्ये इलेक्टोनिक्स वस्तु मिळण्याचे ठिकाण आणि शॉपिंगसाठी सल्ला हवा आहे..म्ह्ण्जेच त्या वस्तुची बार्गिनिग कशी करावी...ओरिजिन्ल पोड्क्ट कसं ओळखाव वगैरे..
मला तिथुन मोबाइल फोन्स,टँबलेट,कँमेरा या विविध प्रकारच्या स्मार्ट गड्जेट्ची खरेदि करायची आहे..
थायलंड मध्ये खरेदि साठी योग्य आहे की आपला देश.? म्हण्जेच थायलंडला शॉपिंग करताना माझी बचत होईल का..खास इलेक्स क्टोनिवस्तु मध्ये...
इलेक्टोनिक्स वस्तु खरेदी करुन झाल्यानंतर कुठ्ल्या प्रकारचं कर वगैरे भराव लागत या बद्द्ल माहीती द्यावी
मी पुन्हा भारतामध्ये येताना मी खरेदी करुन आणल्या वस्तुंवर कुठ्ल्या प्रकारचं कर वगैरे भराव लागेल का?

क्रुप्या करुन मला त्याबद्द्ल आपला सल्ला लवकरात लवकर द्यावा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला थायलंडला जाऊन बरीच वर्षे झाली. तरीपण ईलेक्ट्रॉनिक्स साठी सल्ला देईन, कि आता भारतातही उत्तम दर्ज्याची उत्पादने मिळतात. किमतीत फारसा फरक नसतो पण पुढेमागे दुरुस्ती करायची असेल तर भारतात अधिकृत एजंट असतील, अशाच कंपनीची उत्पादने घ्या.

तूम्हाला एखादे खास उत्पादन हवे असेल तर त्याच्या वेगवेगळ्या देशांतील किमती नेटवर तपासून बघा.
अगदी मोठा ब्राव्हियाचा टिव्ही वगैरे आणला तर गोष्ट वेगळी पण कॅमेरा, सेलफोन, लॅपटॉप कडे सध्या कष्टमवाले दुर्लक्षच करतात. अंगावरचे दागिने पण चालतात.

थायलंडला जाताच आहात तर तूमच्या रुचीत बसतील अशी अनेक आकर्षणे आहेत तिथे. त्यांचा आनंद लूटा.

दिनेशदा ...जर मी थायलंड मधुन नोकिया मोबाइल खरेदी केल आणि जर त्या मोबाइल काही तांत्रिक बिघाड झाली तर मी आपल्याकडिल सर्व्हिस सेंटर मध्ये नेऊ शकतो का..मला ही फ्री करुन मिळेल का त्या काही चार्चेस भरावे..
आणि हो क्रुपया करुन सविस्तर माहिती द्यावी..

महागातल्या वस्तू विकत घेताना इंटरनॅशनल वॉरंटी आहे का ते तपासून बघा. आणि खरेदी केल्याची पावती जपून ठेवा. वॉरंटीत असेल (पार्टस / सर्व्हीस ) ते अर्थातच फ्री मिळते. मी आजवर अशा वस्तू दुबईमधेच घेतल्या आहेत. आजवर कधीच दुरुस्तीचा प्रश्न आला नाही. पण मी दुबईला वारंवार जात असल्याने, मला तशी काळजी नसते.

तूम्ही जर एखादे खास मॉडेल ठरवले असेल, तर त्याच्या भारतातल्या किमती बघून जा. तिथे जर खास स्वस्त नसतील, तर नकाच घेऊ.
थायलंड हून येताना कपडे / फळे ( ताजी / वाळवलेली ) / शोभेचे दागिने आणा. ते चांगले असतात. भाव करताना त्यांच्याकडचा कॅल्क्यूलेटर वापरा. ते त्यांची किंमत त्यावर लिहून दाखवतील तूम्ही तूमची किंमत लिहून दाखवा. अर्ध्यापासून सुरु करा. विमानतळावर पण हे मिळेल, पण महाग आहे.

जर एखाद्या संस्थेतर्फे जात असाल, तर त्यांचे मार्गदर्शन लाभेलच. तिथे तूम्हाला माणिक / पाचू वगैरे घ्यायचे असतील तर तिथल्या सरकारी संस्थेतूनच घ्या. त्यांचे सर्टीफिकेट मिळते. पण ते फार स्वस्त असतात असे नाही.

तिथे बघण्यासारखी देवळे / बाजार / अम्यूझमेंट पार्क्स आहेत. त्यांना अवश्य भेट द्या. केवळ खरेदीसाठीच जात असाल तर मात्र दुबईलाच जा. तिथला व्हीसाही लगेच मिळतो. या दिवसात हवामानही ठिक आहे. शॉपिंग फेस्टीव्हल्स वगैरे असतातच. भाषेचा प्रश्न येत नाही. ( थायलंडमधे थोडाफार येतो.)

मोबाईल फोन्स, टॅबलेट ई मधे भारतात आणि थायलंडच्या किमतीत काही फरक नसतो. कदाचीत भारतातच दोन पाचशे रुपयांनी स्वस्त मिळतील. कॅमेरे थोडे स्वस्त असतात पण इतकेही स्वस्त नाही की खूप पैसे वाचवाल तेव्हा तेही भारतात घेणेच उत्तम. फक्त एलसीडी, ३डी टिव्ही तिथे भारतातल्या पेक्षा बर्‍यापैकी स्वस्त असतात. तिथे अनेकदा मोठ्या टिव्हीवर लहान फ्री ई. ऑफर्स पण असू शकतात, तर ओझे वाहायची तयारी असेल तर टिव्ही आणा. बाकी भारतात आल्यावर कर किती भरावा लागतो वगैरे काही माहिती नाही. मी कधी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणलेल्या नाहीत.

इतर गोष्टींमधे कपडे, हँडीक्राफ्ट वस्तू स्वस्त मिळतात.

जर तुम्ही टुरिस्ट व्हिसावर जात असाल तर जास्त काही घेऊ नका... बहुतेक १० हजाराच्यावर १००% ड्युटि भरावी लागते... कस्टमवाले असे बकरे शोधतच असतात.. काही प्रॉडक्ट्सना Region Code असतो ते भारतात unlock केल्याशिवाय चालणार नाही... बाकी थायलंड चांगलं फिरुन घ्या...

लेटेस्ट माहिती खालील लिंकवर बघा..
http://www.cbec.gov.in/customs/cs-act/formatted-htmls/bgge-rules1998-aso...

थायलंड फिरण्यासाठी बेस्ट. शॉपिगसाठी बेक्कार आहे - असे मला तरी वाटले.
खरेदी मुळीच करु नका. त्यापेक्षा थई फूड अन थाई बीचेस बघण्यात वेळ अन पैसा खर्च करा.

बेस्ट लेडीज शॉपिंग आणी इतर काही बाही सोविनिअर्स,लहानसहान भेटवस्तूंच्या शॉपिंग करता एम बी के मॉल, प्लॅटिनम मॉल, इन्द्रा मार्केट आणी रॉबिन्सन मॉल चांगले आहेत. खूप महाग ही नाहीत हे मॉल.. रॉबिन्सन सोडून इतरत्र घासाघीस करता येते.. करावीच..
पॅटपाँग हा रेड लाईट एरिया असला तरी तिथे भरणार्‍या नाईट मार्केट मुळे शॉपर्स पॅरेडाईस झालेला आहे. इथे सांगितलेल्या किमती च्या निम्याहून ही आधिक किमतीपासून बार्गेनिंग करा..
हँडबॅग्स, शूज, बेल्ट्स्,वॉलेट्स्,लायटर्स,आणी अजून खूप खूप सटरफटर सामान इतेह स्वस्तात मिळतं..
चांगले ,ब्रँडेड इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स मात्र भारतातच , रेप्युटेड दुकानातून घ्यावे. आता या सर्वांच्या किमती इंटरनॅशनली जवळ जवळ सारख्याच आहे. भारतातूनच विकत घेतल्याने आफ्टर सेल्स सर्विस चा फायदाही मिळेल..

थायलंडमध्ये फक्त एलसीडी टीव्ही बर्यापैकी स्वस्त मिळतात. बाकी गॅजेट्सच्या किमतीत विशेष फरक नाही.

एलसीडी टीव्ही बर्यापैकी स्वस्त मिळतात>> एलईडी टिव्ही देखील.
३२ इन्चापर्यंत असेल तर कस्टम नाहिये. (ऐकीव माहिती)
पण अर्थात विमानतळावर हॅ हॅ हॅ......
हसरे बापु खिशातुन बाहेर काढावेच लागतात. किमतीत बराच फरक आहे.

वर्षु +१

थायलंड ला किंवा इव्हन दुबईला मला काही खास इलेक्ट्रॉनीक आढळले नाही. म्हणजे वैविध्य भरपूर पण सगळ्या वॉरंट्या लोकल !!! एकदा त्यांचा देश सोडला की संपल्या... आम्ही लॅपटॉप व मोबाइल पहात होतो... पण किमती जास्त वाटल्या भारता पेक्षा... भारतात आधी रीसर्च करुन गेलो होतो... साधा १टी.बी चा हार्ड डिस्क ड्राइव्ह जो सेम मेक चा भारतात क्रोमा (मुलुंड) ला ५३००/- होता तो तिकडे चलन हिशोबाने ५८०० ते ६००० पडत होता... त्या मुळे दुबईला खुप मॉल धुंडाळले.. पण मना सारखी खरेदी झालीच नाही... भारतात खुपच वैविध्य आता सापडत... हां आता एल.सी.डी किंवा मुझीक सिस्टीम बद्दल माहित नाही...

१२-१३ वर्षांपुर्वी जेंव्हा भारतात काही एलेक्ट्रॉनीक मिळत नव्हते तेंव्हा आम्ही सिंगापूर हुन कॅमकॉर्डर आणला होता जे.व्ही.सी चा... त्याने नंतर एका वर्षात येवढे रंग दाखवले की रामा शीवा गोविंदा... त्यामुळे ह्या वस्तु आपल्या देशात अतिषय उत्तम मिळतात... परत बाहेरुन हे प्रकार आणायचे नाहीत असे कायमचे ठरवले आहे...

बाकी कपडे, दागीने, पर्सेस, जोडे, खाण्याचे पदार्थ, बॅगा हे सगळं थायलंड मधे मुबलक मिळत... ते नक्की घ्या. कपडे तर खासच... पण कामचलावु कपडे पण मस्त मिळतात.. जास्त ब्रँड काँशस नसाल तर थायलंड कपडे खरेदीचा स्वर्ग आहे...