शिवार माझे उजाड सारे नकाच येऊ कोणी

Submitted by प्राजु on 20 January, 2013 - 22:23

शिवार माझे उजाड सारे नकाच येऊ कोणी
फ़ुलण्यावर वैशाख पहारे नकाच येऊ कोणी

पहाट झाली स्वप्ने विरली भकास वास्तव बाकी
आशेचे मावळले तारे नकाच येऊ कोणी

माझ्या नशिबावरती रडण्या, किंवा सांत्वन करण्या
तुम्हास करते पुन्हा इशारे नकाच येऊ कोणी

नर्तन नाही अता व्हायचे मेघ पाहुनी देखिल
मिटले माझे मीच पिसारे, नकाच येऊ कोणी

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी

मोहरण्याची, हुरहुरण्याची आस न उरली आता
पुन्हा फ़ुलवण्या नवे शहारे नकाच येऊ कोणी

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नर्तन नाही अता व्हायचे मेघ पाहुनी देखिल
मिटले माझे मीच पिसारे, नकाच येऊ कोणी...वा..

आवडली गझल.

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी

मोहरण्याची, हुरहुरण्याची आस न उरली आता
पुन्हा फ़ुलवण्या नवे शहारे नकाच येऊ कोणी<<<

वा वा, मस्त शेर!

गझलेची लय आणि शब्दमांडणी छान आहेच. पहिल्या काही शेरांमध्ये अर्थतीव्रता काहीशी अधिक आणता आली असती की काय असे फक्त वैयक्तीक मत!

धन्यवाद

Atiuttam.. zakaas..
radeef saathee full marks!
Ishaare chaa sher jaraaaassaa kami aavadalaa jaraa ajoon ThaNakaavoon saangaNaara asaa vhaaylaa paahije hotaa
aso
hyaa mast gazalesaaathee dhans

चांगली गझल.

रदीफेवर खूप विचार केला.. ती चर्चा पुन्हा केंव्हातरी.

फुलण्यावर वैशाख पहारे.. मात्र खूपच आवडलं..

पु.ले. शु!

वा!

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी...वा वा वा!

मोहरण्याची, हुरहुरण्याची आस न उरली आता
पुन्हा फ़ुलवण्या नवे शहारे नकाच येऊ कोणी.....क्या बात !

आवडली

मतला सुंदर आहे..

नर्तन नाही अता व्हायचे मेघ पाहुनी देखिल
मिटले माझे मीच पिसारे, नकाच येऊ कोणी
छान..

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी
हा हि आवडला..

शिवार माझे उजाड सारे नकाच येऊ कोणी
फ़ुलण्यावर वैशाख पहारे नकाच येऊ कोणी

नर्तन नाही अता व्हायचे मेघ पाहुनी देखिल
मिटले माझे मीच पिसारे, नकाच येऊ कोणी

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी

>> हे तिन्ही शेर अप्रतिम !
सुंदर गझल !

इतकी मस्त लय आहे ना....!!
"वैशाख पहारे"...मस्त मस्त Happy