कॉफी पेंटींग-१

Submitted by अंतरा on 20 January, 2013 - 09:20

मी केलेली कॉफी पेंटींगः
कशी आहेत ते नक्की सांगा..
1)
pcr1.jpg

2)
p5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे फारच कष्टाचे आणि चिकाटीचे काम आहे हे. हा प्रकार मी यापूर्वी कधी ऐकलापण नव्हता.

ही चित्रे फारच सुन्दर झाली आहेत. तुम्हाला शुभेच्छा. Happy

खूपच सुंदर!!
जिथे ही पेंटिंग्ज ठेवली असतील तिथे कॉफीचा किती मस्त वास येत असेल नं?

@गायत्री१३ कॉफी ,पाणी हे मिक्स केले की कॉफी चा इतका मस्त वास येतो की हातातले काम बाजूला ठेवून कॉफी प्यायची इच्छा होते..
@रोहन धन्यवाद..मला इपॉक्सी बद्दल काहीच माहित नव्ह्ते.मी हॉबी क्लास मध्ये शिकले.तिथे शिकवतात त्यानी तर मला सांगितले की त्याला म्युरल लिक्विड म्हणतात.मग दुकानात चौकशी केली तेव्हा कळले कि त्याला इपॉक्सी म्हणतात.मी ग्लोव्ह्ज वापरले. पण डोळ्याना त्रास होवू शकतो हे माहित नव्हते.क्लास मध्ये काही मुलीना ग्लोव्ह्ज वापरले नाही तर हात जळ्जळत होते त्यांचे..तेव्हा काही कळले नाही.शिकवणार्या बाई असे का होते हे सांगू शकल्या नाही.

Pages