रसुलल्लाह.. गाण्याचे शब्द, अर्थ आणि रसग्रहण - जाणकाराना विनंती

Submitted by mansmi18 on 19 January, 2013 - 03:29

नमस्कार,

युट्युब वर भटकताना..पुढील लिंक मिळाली..

http://www.youtube.com/watch?v=Qeg5dnUy3Jw

"दयाघना" चे मुळ गाणे "रसुलल्लाह" पं. हृदयनाथ आणि लता यानी एका कार्यक्रमात सादर केलेले आहे.
हे गाणे लेकिन मधे येउन गेलेले आहे पण का कोण जाणे माझ्या ऐकण्यात आलेले नव्हते. डोळे मिटुन हे गाणे ऐकताना कुठल्यातरी दुसर्‍या जगात आपण गेलोत असे काहीतरी मला वाटले.

गाण्याचे शब्द मात्र नीट कळले नाहीत. कोणी जाणकार या गाण्याबद्दल विस्ताराने लिहितील का? माझ्यासारख्याना खुप उपयोग होइल.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला एक गोग्गोड पेढा माझ्याकडून.
देवाच्यान, याच दोघांनी गायिलेल्या याच बंदीशीच्या शोधात फार दिवस होतो. ती शोधून दिल्याबद्दल, तोंड गोड करा.
अन हा झब्बू ऐका :
http://www.youtube.com/watch?v=KxqdIcDAIZM
मस्त आहे.

(तुम्ही दिले त्याचे शब्द मलाही उमजले नाहीत.)

mansmi18 ,

>> डोळे मिटुन हे गाणे ऐकताना कुठल्यातरी दुसर्‍या जगात आपण गेलोत असे काहीतरी मला वाटले.

मीही डोळे मिटून ऐकलं. वेगळाच अनुभव आला. हृदयनाथांचा आवाज ज्या प्रकारे घुमतो त्यामुळे असं होत असावं. हा माझा तर्क आहे. मला संगीतातलं काही कळत नाही.

मात्र लताबाईंचा आवाज तितकासा घुमत नाही. तुमच्या दुव्यात खाली एकाने अभिप्राय नोंदवलाय की : Hridaynath is singing better than Lata Mangeshkar here.

जाणकार लोक अधिक प्रकाश टाकू शकतील.

आ.न.,
-गा.पै.

"रसूलल्लाह.." ही बंदिश मी साहित्य संघात पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या भावसरगममध्ये लाईव्ह ऐकली आहे. संपुर्ण गायली होती की अर्धवट ते आठवत नाही आता. ही बंदिश गायल्यानंतर लगेच त्यांनी "दयाघना.." गायलं होतं.

दुव्यामधून परत ऐकली आज. काहीही कळत नसलं तरी कान तृप्त झाले Happy

इब्लिस, तुम्ही दिलेला झब्बूही मस्त आहे Happy

अश्विनी के.
तेच. लाईव्ह खूप दिवसांपूर्वी ऐकलेली. पुसटशी. मग शोधत होतो.
इंटरनेटवर काहीही मिळते, ते सत्य आहे. मनस्मींनी शोधून दिले. म्हणून तर पेढे दिलेत त्यांना.

" रसूल अल्लाह पीरन पीर
कर दो कर दो पीडा दूर हमारी "

पंडितजींच्या आवाजात ही बंदिश जितकेवेळा मी ऐकते तितके वेळा त्यांना माझा _/\_ !!!

पंडितजींनी भावसरगम मध्ये म्हणून दाखवल्याने ह्या बंदिशीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी दयाघना म्हंटले होते ( अश्विनीने लिहिल्याप्रमाणेच ). लेकिन सिनेमात ह्या बंदिशीनंतर " जा जा रे" ही बंदिश आहे. ती ऐकली की कानच काय मन सुद्धा इतकं तृप्त होतं की पुढे काही ऐकवतच नाही. Happy

ते 'पीडा पार हमारी' नसून
कर दो बेडा पार हमारा असं आहे.

रसूलिल्लाह पीरन पीर
कर दो कर दो बेडा पार हमारा |
जा जा रे पथकवा
मोरे पिया कही देवो संदेसवा |
उन बिन तुम ..... (इथला शेवटचा शब्द नीट कळत नाहिये)
तुम राखो ध्यायी |

पर्युत्सुक करणारी रचना आहे ही.
लाईव्ह रेकॉर्डिंग असल्यामुळे आणि फक्त तानपुरा जोडीला असल्याने खूपच वेगळा 'इफेक्ट' आला आहे.

mansmi18 | 20 January, 2013 - 22:07 नवीन

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.
<<
प्रतिसादकां"ना"

चेच्याचेचेच्याची षष्ठी नको.
सलातेसलानाते हवे. Sad

( मी १९८३ मधे मन्गेश्कराशकरान्च्या मुलाखतीचा दूरदर्शनवर झालेला कार्यक्रम रेकोर्ड केला होता. अजूनहि ती ध्वनीफीत माझ्याकडे आहे)
त्याचा आन्तरा असा आहे

हुकूम तुमरो दीन दुनी
तुम हो हझरतहो रसूलिल्लाह

पंडितजीं दयाघनाच्या सुरुवातीला ही बंदिश गातात , मी एकदा (लातूरला) राधा मंगेशकरांनी गायलेली ऐकली आहे.
आतापर्यंत ३ वेळा लाईव्ह ऐकायला मिळाली , नंतर यु ट्युबहुन घेतली .
बर्‍याच जणांनी घेतली माझ्याकडून.

पुण्यात पुर्वी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे गाण्यांचा एक कार्यक्रम होत असे. (बहुतेक अजुनही होतो पण आता ठिकाण बदलले आहे)
त्या कार्यक्रमामधे अनेक नामवंत गायक हजेरी लावून जात असत. तिथे अनेकवेळा मंगेशकरांनी ही बंदिश आणि त्यापाठोपाठ दयाघना म्हणलेले आहे. ते ऐकण्याचे भाग्य लाभले होते. Happy

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे गाण्यांचा एक कार्यक्रम >> मस्त असायचे ते कार्यक्रम. गणपती बसतो तिथेच स्टेज असायचं आणी बेलबाग चौकापर्यंत गर्दी. याच दिवसात असतो ना? आता बहुतेक शनिवारवाड्यासमोर असतो. हृदयनाथ, श्रीधर फडक्यांचे कार्यक्रम तिथे ऐकल्याचे आठवते.