HR Round ची महिती हवी आहे

Submitted by Prajakta C. Kulkarni on 18 January, 2013 - 01:14

Technical Round झाल्यावर HR Round का असतो.
त्यामागे कंपनीची काय भुमिका आसते? मला जरा माहिती हवी आहे.
त्यात काहीही प्रश्न विचारुन का विचारतात? त्यातुन त्यांना काय सिद्ध करायचे आसते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रूप चुकला आहे.... माहिती हवी आहे ग्रूप मध्ये हालवा हा प्रश्न.... आणि रैनाशी संपर्क साधा ती उत्तर देऊ शकेल..

HR round ला घाबरुन रहा प्राजक्ता ताई. माहिती आहे ना गेल्या आठवड्यात DBA च्या HR round ला काय झाले ते. HR मुलाखत एखाद्या HR मधल्या बाई नी च घ्यावी असा आग्रह धरा. केबीन चे दार उधडेच ठेवायला लावा. Happy

बापरे, फारच मुलभूत प्रश्न विचारला आहे. मुळात एचआर चे कामच असते लोकांना नोकरीवर घेणे आणि काढणे.
रैना तुस्सी किथ्थे हो ? Uhoh

टेक्निकलचा सिनियर टेक्निकल प्रश्न विचारून तुमचे ज्ञान तपासतो.

पण कंपनीला नुसता ज्ञानी मनुष्य नको असतो.. तो काय प्रत्येक डिग्री होल्डर त्या त्या क्षेत्रातले किमान ज्ञान बाळगून असतोच.. पण लीडरशिप, मनमोकळेपणा, डिवोशन, तुमची कौटुंबिक परिस्थिती, त्यातील ताण तणाव, तुम्ही जॉब टाइम पास म्हणून करणार, की सिरियसली, ओवरटाइम, सुट्टीच्या दिवशी काम कराल का?? कंपनीतील इतर सिनियर पोस्टला उद्या तुम्ही जाऊ शकाल का?, तुमचा पत्ता, ऑफिस तुम्हाला सोयीस्कर आहे का? पगाराच्या अपेक्षा इ इ अशा अनंत गोष्टींची चाचपणी करायला एच आर राउंड असतो.

टेक्निकलच्या राउंडला ग्रीन सिग्नल मिळाला असेल, तर अशा गोष्टी चाचपून एच आर हो म्हणतात... अगदीच क्वचित प्रसंगी एच आर नाकारू शकतो.... उदा.. टेक्निकलला तुम्ही पास झालात.. पण एच आर ने विचारले कंपनीचीच एक ब्रँच जवळच आहे, तिथे रात्री अपरात्री डेप्युटेशन, इमर्जन्सीला जाऊ शकाल का? तुम्ही बोललात , नाही.. तर तो तुम्हाला का घेईल?

माबो वरच्या बायकांच्या मतांनी मी इतका हादरलो आहे की माझा HR interview कोणी HR ची बाई घेत असेल तरी मी केबीन चे दार उघडे ठेवायला सांगीन.

बाकी इथले जाणकार मत देतीलच.. पण माझे २ पैसे..

नावाप्रमाणे ही "ह्युमन रीसोर्स" ची मुलाखत असते.

तुमचे तांत्रिक ज्ञान तपासुन झालेले असते पण तुम्ही म्हणजे एक मशिन नाही तुम्ही एक व्यक्ती आहात आणि माणुस म्हटल्यावर त्यांची मानसिकता, भावभावना इ. गोष्टी आल्याच. जेव्हा कुठलीही कंपनी एखाद्या व्यक्तीला हायर करते तेव्हा ती व्यक्ती त्या कंपनीच्या टिमला पुरक आहे की नाही हेही पाहिले जाते. तुमच्या टेक्निकल नॉलेजसह तुमचे संभाषण कौशल्य कसे आहे, तुमचा स्वभाव कसा आहे. तुम्ही टीम प्लेयर आहात की नाही, तुमच्या कंपनीकडुन अपेक्षा काय आहेत इ. पाहिले जाते. तुम्ही आधीची नोकरी का सोडत आहात, तुम्ही आधीच्या नोकरीबद्दल/बॉसेसबद्दल कशा प्रतिक्रिया देता हेही पाहिले जाते. थोडक्यात म्हणजे तुमची पर्सनॅलिटी ही जॉब प्रोफाइअलला किती कंपॅटिबल आहे ते पाहिले जाते.

बर्‍याच वेळा लोक टेक्निकल इंटरव्युला जास्त महत्व देतात आणि एच आर म्हणजे काय फक्त गप्पा असे समजतात. एच आर इण्टरव्युलाही तेवढेच महत्व दिले पाहिजे. Ideally HR Interviewers हे थोड्या वेळात साध्या साध्या प्रश्नामधुन तुमच्या स्वभावाबद्दल बरेच काही जाणुन घेउ शकतात त्यामुळे याला कॅज्युअली अजिबात घेउ नये.

आणि जाता जाता..
कंपनीला काहीही सिद्ध करायचे नसते. त्याना तितका वेळही नसतो आणि लोकाना सुधारायची इच्छाही नसते. फक्त आपण जाहिरात दिलेल्या पदासाठी योग्य व्यक्ती मिळवणे हा एकमेव उद्देश असतो त्यामुळे काही वेळा हा इंटरव्यु कठीण जरी गेला/अपयश आले तरी ते पर्सनली न घेता पॉझिटिव्हली घेउन आपले काय चुकले असेल याबाबत Introspection करावे.

एक अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारला आहे. यातील येणार्‍या जाणकारांच्या प्रतिक्रियानी बर्‍याच इच्छुकाना लाभ होइल.

(जर तुम्ही जाणार असाल तर) मुलाखतीसाठी शुभेच्छा!

mansmi18

धन्यावाद .तुम्ही खुप उपयुक्त अशी महिती दिली आहे .ज्याचा मला नक्कीच उपयोग होईल
कारण या राउंड बद्द्ल बरेच प्र श्न होते ,त्याची उत्त रे मि ळाली

माबो वरच्या बायकांच्या मतांनी मी इतका हादरलो आहे की माझा HR interview कोणी HR ची बाई घेत असेल तरी मी केबीन चे दार उघडे ठेवायला सांगीन.>>>> आता काहि खरे नाहि तुमचे! Proud

वरती काहि पोस्ट मध्ये तमाम आदर्श गोष्टि लिहिल्या आहेत - पण HR round चे खरे कारण आहे की तुम्हाला चेपायचे आणी कमीत कमी पगार देउन तुम्हाला आत कसे आणता येइल ते पाहायचे. एकदा टेक्निकल राउंड पास झाल्यावर हा माणुस कमीत कमी पैशात आणी कमीत कमी वेळेत कसा join होइल ते पहाणे एवढेच खरे कारण असते. फक्त अगदीच काहि टोकाचे बोललात तरच प्रश्न निर्माण होइल जे ९९.९९ टक्के केसेस मध्ये होत नाहि.

(जर तुम्ही जाणार असाल तर) मुलाखतीसाठी शुभेच्छा! -- पगार आणी joining पिरियड अजिबात compromise करु नका

बहुदा वर सायकोमेट्रीक टेस्टबद्दल कुणी लिहले नसावे. टेक्नीकल नॉलेज शिवाय जे कौशल्य तुमच्या कामावर प्रभाव पाडते त्याची खात्री उदा. लिडरशिप, टिम मॅनेजमेंट इंटर पर्सन स्कील, कम्युनिकेशन इ.

सायकोमेट्रीक टेस्ट एच आर ला वरील कौशल्यांच्या गट फिलिंग्ज बरोबरच एक सायेंटीफिक टेस्ट द्वारे पडताळा देते.

याशिवाय हा उमेदवार खरोखरच जॉइन होईल की खेळवत राहील. इ गोष्टींचा अंदाज देते.

काही वेळा टेक्नीकल इंटरव्हु मधे ओळखीचा/नातेवाईक यांना झुकते माप दिले जाते व त्या पेक्षा चांगला उमेदवार डावलला जातो. असे सारखेच घडले तर कमी लायक उमेदवार व त्यांच्या मार्फत लॉबी निर्माण करण्याचा प्रयत्न टाळला जातो.

ह्युमन कॉस्ट हा बिझनेस स्ट्रॅटेजीत महत्वाची असते त्यामुळे उमेदवाराचा सध्याचा पगार, अपेक्षीत पगार, सध्याचा त्या जॉब प्रोफाईलला त्या टाईपच्या इंडस्ट्रीमधे दिला जाणारा पगाराचा ट्रेंड इ बाबी सुध्दा एच आर च्या दृष्टीने महत्वाच्या असतात. कायमच कमी पगारात माणुस घेणे हे ध्येय नसुन हा माणुस दिर्घ काळ सेवेत रहावा या दृष्टीने वरील विचार आमलात आणावा लागतो.

वर बरेच मुद्दे आले आहेत, त्या सोबतच ही काही निरीक्षणे - अर्थातच , मुलाखतकार काय प्रश्न विचारेल हे त्याच्या किंवा तिच्या अनुभव, वैयक्तिक समज, नोकरीचे स्वरूप यावर अवलंबून असते. खाली दिलेली निरीक्षणे निव्वळ माझ्या अनुभवावर आधारित आहेत. उमेदवाराने स्वत: च्या सदसदविवेकबुध्दीवर आणि निर्णय क्षमतेवर अवलंबून राहाणे आवश्यक असते.

-
जनरली टेक्नीकल राऊंड क्लिअर केला की एच आर राऊंड होतो. तुम्ही तांत्रिक्दृष्ट्या या नौकरीसाठी योग्य आहात पण एक व्य क्ती म्हणून तुम्ही कसे आहा त , तुमची बलस्थाने काय आहेत, तुमच्या म ते तुमच्यात स्वभावात काय त्रुटी आहेत, तुम्ही कार्यालयीन दबावाखाली काम करू शकता का ; या आधीच्या नौकरीत आलेले अनुभव कसे होते; तुमच्या आवडीनिवडी काय आहेत; तुम्ही कामानिमित्त प्रवास करावा लागल्यास त्यासाठी तयार आहात काय इ गोष्टींबद्दल या राऊंड मध्ये चर्चा होते. सगळ्यात शेवटी पगारावर चर्चा ( आणि बरेचदा निगोसियेशन Happy ) होते.;

काही जनरल सुचना -
- कॉन्फिडंट रहावे, घाबरून जाऊ नये.
- बरेचदा या राऊंड्ची सुरुवात ' टेल मी अबाऊट युवर सेल्फ' या ( अतिशय ढोबळ) प्रश्नाने होते. या प्रश्नाच्या उ त्तरादाखल काय सांगावे हे संपुर्णतः उमेदवारावर अवलंबून असते. आपले नाव, गाव, शिक्षण, आवडीनिवडी इ बद्दल बोलणे अशा वेळी योग्य ठरू शकते. या प्रश्नाची तयारी करून जाणे उमेदवारासाठी फायद्याचे ठरू शकते
- बोलताना घाई करू नये, स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे.
- मुलाखतीच्या शेवटी बरेचदा 'तुम्हाला का ही विचारायचे आहे का ?' असा प्रश्न विचारला जातो. अशावेळी त्या कंपनी बद्दल एखाद दुसरा प्रश्न विचाराय ला हरकत न सा वी . इ तर काही माहिती हवी असल्यास ती विचारणे योग्यच

बाकी मायबोलीवरील तज्ञ माहिती देतीलच Happy शिवाय जालावर अनेक उत्तम एच आर साईटस आहेत, त्या बघणे देखील फायद्याचे ठरू शकते

काही वेळा टेक्नीकल इंटरव्हु मधे ओळखीचा/नातेवाईक यांना झुकते माप दिले जाते व त्या पेक्षा चांगला उमेदवार डावलला जातो. असे सारखेच घडले तर कमी लायक उमेदवार व त्यांच्या मार्फत लॉबी निर्माण करण्याचा प्रयत्न टाळला जातो.>>>>>. हेहि मान्य नाहि. जनरली कमीत कमी २-३ जण इंटरव्हु घेतात त्यामुळे असे होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. उलटे HR कडुन बर्याचदा कमी लायक उमेदवार असेल आणी कमी पगारात व लगेच येण्यास तयार असेल तर आग्रह केला जातो. नापास केले तरी ३-४ महिन्यांनी परत रिझ्युम पाठवला जातो.

कायमच कमी पगारात माणुस घेणे हे ध्येय नसुन हा माणुस दिर्घ काळ सेवेत रहावा या दृष्टीने वरील विचार आमलात आणावा लागतो.>>>>>>>> ह्याला अनुमोदन नाहि. मी गेली १५ वर्षे हजारो मुलाखती घेतल्या आहेत MNC कंपन्यात काम करत असताना त्यामुळे HR काय पहाते ते चांगलेच माहित आहे.

टेक्निकल इंटरव्ह्यु घेणारी माणसे जनरली वरच्या बर्याच पोस्ट मध्ये आलेल्या गोष्टि बघत असतातच आणी कोणी लीडरशिप, संभाषण कौशल्य, टिम प्लेयर वगैरेत बरे वाटले नाहि तर त्याला पुढे पाठवले जात नाहि.

माणुस दिर्घ काळ सेवेत रहावा हा विचार असता तर parity चा इश्यु निर्माण झाला नसता. पण सर्व कंपन्यांमध्ये parity हा मोठा इश्यु आहे.

थोडी माहिती हवी आहे.
दोन कंपन्यांकडून ऑफर्स येण्याची शक्यता आहे. त्यातील एका कंपनीशी पॅकेजबद्दल तोंडी बोलणे झाले आहे व ते आता ऑफिशयल ऑफरचे पत्र देतील.
दुसर्‍या कंपनीच्या एचआरने पॅकेज ऑफर करण्याआधी खालील प्रश्न विचारले आहेतः
१) तुझ्याकडे आत्ता दुसर्‍या कुठल्या कंपनीची ऑफर आहे का? / बोलणी चालू आहेत का?
२) असल्यास त्या दुसर्‍या कंपनीचे नाव काय? लोकेशन काय? (अगदी मुंबईतही कुठे आहे?) तुला किती पॅकेज देत आहेत? आमच्या कंपनीच्या मॅन्डेटनुसार त्यांचे ऑफर लेटर सबमिट करावे लागेल...इ.

प्रश्न क्र. १ विचारणे मी समजू शकते. पण प्रश्न २ मध्ये दिल्याप्रमाणे एचआरने कँडीडेटला त्याला ऑफर देणार्‍या दुसर्‍या कंपनीचे नावगाव विचारणे, वर त्यांचे ऑफर लेटर सबमिट करायला सांगणे, हे बरोबर आहे का? हे कॉमन आहे का ? या सगळ्यामागे 'कँडीडेटला खरोखरच दुसरी ऑफर आली आहे का व असल्यास ती किती आहे ते बघून आपल्याला पॅकेज ऑफर करता येईल" असा विचार असेल पण म्हणून तुम्ही दुसर्या कंपनीच्या ऑफर लेटर्सारखे डॉक्युमेंट मागणे कसे काय बरोबर आहे?

वर्षा,

कन्फर्म करण्यासाठी कि दुसरी कंपनी खरच ऑफर देत आहे का यु आर ब्लफींग.. यासाठी मागितले असेल पण मला ते बरोबर वाटत नाही. फारतर तुम्ही त्यांना स्वतः ते लेटर (फिजिकली) दाखवु शकता पण त्याची कॉपी सबमिट करणे योग्य नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे हे एक कॉन्फिडेन्शिअल डॉक्युमेंट असते ते अगदी त्या कंपनीच्या दुसर्‍या एंप्लॉयी बरोबरही शेअर करु नये असा प्रघात आहे.

मला तरी वाटते तुम्ही जरा हार्ड स्टँड घेउन सांगा की अमुक अमुक ऑफर (बेटर दॅन द अदर कंपनी) असेल तरच मी अ‍ॅक्सेप्ट् करेन. मी तुम्हाला माझे ऑफर लेटर देउ किंवा दाखवु शकत नाही.

ऑल द बेस्ट!

धन्यवाद मनस्मी.
हो मलाही ते योग्य वाटत नाही तर ती कंपनी म्हणे हे कॉमन आहे. सर्वच कंपन्या असं करतात.
असो.

be urself..
स्वत:ला एक्सप्रेस करा, आतिषयोक्ती नको.

जर campus interview मधला hr राउंड असेल, तर बेसिक प्रश्न विचारतील. उदा.
tell me about urself, ur family or any question that would help hr to know u better.

जर पहिला job switch असेल तर फक्त salary negotiations and possible joining date विचारतील.

वर्षा, क्र. २ मला तरी अप्रोप्रिएट नाही वाटले. तसेही तू दुसरीकडे इन्टरव्यू झाला आहे ऑफर लेटर अजून मिळालेले नही असे सरळ सांगू शकतेस की ! (तुला तिथल्या ऑफर चा या कंपनीशी निगोशिएशन साठी उपयोग करायचा नसल्यास)

पहिला प्रश्नही विचारायचा काहीच संबंध नाही.. माझ्याकडे कोणती ऑफर आहे ह्याच्याशी दुसर्‍या कंपनीला प्रॅक्टीकली काहीही घेणं देणं नाही.. त्यामुळे पहिल्या प्रश्नालाही उत्तर देण्याची गरज नाही.. दुसरा प्रश्न तर फारच लांब राहिला..

वर्षा, हे प्रश्न salary negotiations साठीच आहेत. मला पण असा अनुभव आला होता. आम्ही दुस्र्या कंपनीची offer बघुन ती match करु किंवा त्यापेक्षा थोडे जास्त देउ असे सांगितले होते.

सहाजिकच मी ते पत्र दाखवले नाही. negociation नाही झाले आणि त्यानी दुसर्या कंपनीला कळवले तर तेल ही गेले आणि तुपही गेले अशी अवस्ठा होईल.

पहिला प्रश्न ठीक आहे, सगळीकडेच विचारतात. हे बघायला की समोरच्या व्यक्तीला ऑफर दिली तर तो/ ती ती अ‍ॅक्सेप्ट करण्याची शक्यता किती ?सो तो प्रश्न मला चुकीचा नाही वाटला. पण दुसरा प्रश्न अजिबात अप्रोप्रिएट नाही वाटला. माहिती देऊ नये! सरळ सांगावे हे शेअर करण्याबाबत मी कम्फर्टेबल नाही.

"सध्या ऑफर आहे का" असे बरेच एच आर वाले विचारतात कारण समोरच्याने हो म्हटले तर त्यांना "दुसरे प्यादे बघुन हातचे ठेवले पाहिजे हा माणूस गेला तर" हा अंदाज येतो आणि 'नाही' म्हटल्यास लवकर जॉइन करायला आणि गरजूपणा चेहर्‍यावर जास्त दिसल्यास कमी पगारात पटवायला सोय होते.
धंदा आहे, समोरचा किती कमी मध्ये पटेल आणि चांगला मिळेल यावर त्यांचे इन्क्रिमेंट ठरते. ऑफर लेटर बघायला मागणे जरा अती झाले, त्यांना 'गुप्त डॉक्युमेंट आहे आणि दाखवता येणार नाही' असे सांगून कटवता येईल.

>>प्रश्न २ मध्ये दिल्याप्रमाणे एचआरने कँडीडेटला त्याला ऑफर देणार्‍या दुसर्‍या कंपनीचे नावगाव विचारणे, वर त्यांचे ऑफर लेटर सबमिट करायला सांगणे, हे बरोबर आहे का? हे कॉमन आहे का ?>>
हे अगदीच अयोग्य वर्तन झाले. स्पष्ट सांगा. कॉन्फिडेंशियल डॉक्युमेंट आहे सबमिट करणार नाही. अजून एक म्हणजे अशी मागणी करणार्‍या कंपानीतले एकंदरीत वर्क कल्चर तुमच्यासाठी योग्य आहे ना हेही एकदा तपासून बघा.

दुसर्‍या कंपनीचे नाव्गाव, ऑफर लेटर द्यायला सांगणारी कंपनी ही एक मुंबईतली सुप्रसिद्ध आयटी कंपनी आहे. तिने असे प्रश्न विचारल्यावर मला आश्चर्य वाटले (अशी अजिबातच अपेक्षा नव्हती) आणि आवडलेही नाही. पण ते ऐकायला तयार नाहीत. ऑफर लेटर शेअर केले "तरच" त्या ऑफरला मॅच होणारी ऑफर देऊ अशी तिची मेल आली आहे.
मी ऑफर लेटर अजिबात देणार नाहीये. आणि स्वाती म्हणताहेत तसं तिथल्या वर्क कल्चरवर शंका घेण्यायोग्यच ही डिमांड आहे.
दुसरी कंपनी आणि तिथली संधीदेखील चांगली आहे. मी बहुतेक करुन तिथेच नक्की करत आहे.
धन्यवाद सर्वांना.

त्यांना विचारायचे ना तुम्हाला चालेल का तुम्चे ऑफर लेटर दुसर्‍या कंपनी सोबत शेअर केले तर चालेल का म्हणून Happy
असो,
मी पण असे निगोशीएशन्स करून सॅलरी मॅच करून घेतली होती पण दोघांनाही एकमेकांचे ऑफर लेटर्स शेअर नव्हते केले.