करू आता कल्ला कल्ला कल्ला.... !!! (बालक पालक - बीपी)

Submitted by भुंगा on 17 January, 2013 - 06:14

एका वेगळ्या विषयावर पुन्हा एकदा रवी जाधव घेऊन आलेला चित्रपट बालक पालक (बीपी).

एक असा विषय ज्यावर उघडपणे चर्चा करायला अजही बरेच लोक कचरतात.... त्याला चित्रपट माध्यमातून स्पर्श करायचा एक देखणा प्रयत्न. नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन तो वेगळेपणाने मांडायचा प्रयत्न बर्‍याच प्रमाणात यशस्वी झालाय.

कथा एका पौगंडावस्थेतील मुलापासून सुरू होते आणि थेट पोचते त्याच्या आई-वडिलांच्या भूतकाळात. (पुन्हा एकदा फ्लॅशबॅक तंत्र)
डॉली, अव्या, चिऊ आणि भाग्या ही चार समवयस्क एकाच चाळीत राहणारी निरागस मुलं.
चाळीतल्या एका मोठ्या ताईवर चाळ सोडायचा प्रसंग येतो आणि मग ही चार मुलं "शेण खाणं म्हणजे काय?" याचा शोध घेत टप्याटप्याने जो प्रवास करतात तो म्हणजे बीपी........ पालकांना विचारायची सोय नाही म्हटल्यावर यात त्यांचा गुरू होतो त्यांच्याच वयाचा अर्धवट ज्ञान पाजळणारा "विशू"...... हा विशू त्या चौघांना "आयुष्यात" जे काही शिकवतो त्याचे पुढे कसे आणि काय परिणाम होत जातात हे एकदा तरी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखं आहे......

बर्‍याच दिवसांनी अगदी पहिल्या क्षणापासून विषयाला धरून जाणारा चित्रपट पाहिला..... चित्रपट सुरु होतो तोच अंधारातले दोन रोखलेले पण शोधक डोळे घेऊन .... आणि त्यातूनच शब्द तयार होतो "बीपी". सुंदर अ‍ॅनिमेशन. त्याला बॅग्राऊंडला गाणं वाजवलय "ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार" ..... विषयाला पूरक सुरुवात.....!

विशाल -शेखरचं म्युझिक..... करू आता कल्ला कल्ला कल्ला गाणं म्हणजे खास विशाल स्टाईल रॉक.... !

संपूर्ण चित्रपट आहे या चार मुलांचा..... सगळे नवे चेहरे...... त्यात चिऊ एकदम बोलक्या चेहर्‍याची आहे.... पण विशू आणि भाग्या भाव खाऊन जातात........ बाकी सर्व कलाकारांची कामे उत्तम,. सई ताम्हणकर आणि किशोर कदम लक्षात राहतात, त्यांचा रोलही तितकाच महत्वाचा आहे.

जो काळ दाखवलाय चित्रपटात त्या काळात दोन मुलं आणि दोन मुली यांनी एकत्र ब्ल्यू फिल्म पाहाणं तसं अशक्य वाटत राहातं.... पण मुळात एक अत्यंत महत्वाचा विषय आणि या गोष्टींचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे मुलांवर आणि मुलींच्या मनावर कसे होत राहतात त्यातही व्यक्ती म्हणून प्रत्येकात काय वेगवेगळे बदल होतात हे जर दोन तासात पडद्यावर दाखवायचं असेल तर मग असं एकत्र पाहताना दाखवणं थोडेफार संयुक्तिक वाटून जातं...... थोडी लिबर्टी. Happy

बाकी काही अधिक प्रसंग मुलांच्या बाबतीत दाखवता येणं शक्य होतं पण प्रेक्षकवर्ग मराठी आहे.... (बॉलीवूड मूव्ही नाही) याचं भान ठेवून दिग्दर्शकाने थोडक्यात महत्वाचे सगळे प्रसंग दाखवून विषयाला न्याय दिलेला आहे.

एकदा तरी जाऊन नक्कीच पाहता येईल असा एक वेगळा प्रयत्न....... नक्की पहावा असा कल्ला....

करू आता कल्ला कल्ला कल्ला......!!

अवांतरः सिटीप्राईद कोथरूडमध्ये चित्रपट आणि त्यातल्या मुलांच्या उचापती सुरू झाल्यावर दोन पालक आपल्या अनुक्रमे ८ आणि १२ वर्षाच्या मुलांना घेऊन बाहेर का निघून गेले याचा अजून विचार करतोय..!!!
सर्वांनी पहावा आणि समजून घ्यावा म्हणून केलेला हा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे हे बहुधा पालकांना झेपले नसावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त लिहिलय भुंगा.

विषय फारच वेगळा दिसतोय. बघणार.

शेवटची टीपही आवडली व महत्वाचीही वाटली, एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया या दृष्टीने.

धन्यवाद

bee.gifसर्वात आधी आभार मराठी सीनीमाचे परीक्षण लिहिल्या बद्दल
मी हा सिनिमा बघितला सिनेमा उत्कृष्ट आहे

पण प्रेक्षकवर्ग आचरट असल्याने स्त्री वर्गास मध्यंतरां नंतर घरी जावे लागले Sad

ह्म्म्म्म्म्म्म्म्म धन्स रे भुंगा.......मीही विचार करत होते मुलाला घेऊन जायचा........आता पक्काच केलाय या विकांताला बघुन येनारच...... Happy

अगदी बघण्यासारखाच आहे. मुलं थोडी मोठी असतील तरी दाखवायला हरकत नाही...... पण मग ती मुलं काय करत होती याची खरी उत्तरं द्यायची तयारी ठेवूनच न्या,..... नाहीतर बघणार्‍या मुलांना पुन्हा प्रश्न पडतील आणि त्यांना पण एखादा "विशू" सापडेल त्यांच्यातच...... Happy

अर्थात आताच्या काळात नेट अ‍ॅक्सेस प्रत्येकाकडचा स्मार्टफोन यामुळे त्यांना बर्‍याच गोष्टी आधीच कळतात हा भाग आहेच.

दक्षे मी पण Rofl
भुंग्या मस्त लिहिलयेस
खर तर माझ्या वयाच्या मुला मुलींना मी सजेस्ट करेन की आपल्या शालेय जीवलग मित्र मैत्रिणींना सोबत घेऊन बघा हा सिनेमा ( कारण त्यातून टिनेजर आणि त्यांच्या पालकांना बोध मिळतो.... आपल्याला सध्या शिकण्यासारखं काही नाहीये Wink )
त्यामुळे हा सिनेमा एंजॉय करायचा असेल तर आपल्या त्यावेळंच्या मित्र मैत्रिणींसोबतच पहावा . नाही तर त्या आठवणी येत रहातात आणि आपल्यातला विशू आठवत रहातो Happy
प्रत्येकाने पहावाच असा सिनेमा आहे हा.
बेस्ट!
बीपी रॉक्स Happy

केदारदादा कंट्रोल कंट्रोल Lol
पाहू देत लोकांना हा सिनेमा
अगदी एकही सिन फोडू नका Lol

रच्याकने माझ्या ग्रूप मध्ये असाच एक विशू होता आणि त्याने सेम असचं नावं कोरलेलं... सेम प्रसंग तसाच्या तसा Rofl

असं एकत्र पाहताना दाखवणं थोडेफार संयुक्तिक वाटून जातं >> तिथे सयुक्तिक पाहिजे.

बाकी परिक्षण मस्त.

.

Kiti divsapasun vaat baghat hote kuich kasa np bafaal lihit nahi ahe.. Aso.. Ha purna pic mi plaza madhey subtitles vachun samzavun ghetla kiti gondhal to baap re..99% college crowd..vishu sahiii ahe..Chan kaam kele ahe tyane..n mala pan jsra khatkla ki tya kalat mule v muli ektra kase kaay pic baghnnar ..aso.. Changla ahe movie...

Kiti divsapasun vaat baghat hote kuich kasa np bafaal lihit nahi ahe>> अहो इंग्रजीतून लिहिताना तरी स्पष्ट लिहा. कितीतरी वेळ एन पी बाफल हा कुठला सिनेमा म्हणून विचार करत बसले मी.

भुंग्या सर्वप्रथम तुझं मराठी सिनेमाच परिक्षण लिहिल्याबद्द्ल अभिनंदन , सिनेमाची स्टोरी लिहिण्यापेक्षा मोजक पण योग्य परिक्षण लिहिलयसं.
बालक पालक नक्कीच बघु (बी पी म्हणण्याच कारण सिनेमाचा विषय आहे का ? )

श्री, अरे त्या चित्रपटाचं नावच बीपी असं ठेवलेले आहे. आणि पूरक म्हणून आपलं फूलफॉर्म केलाय बालक पालक...

इथे प्रवास नक्कीच शॉर्ट्फॉर्म टू लाँगफॉर्म झालाय Happy कारण विषय आणि जे दाखवलेय त्याचा संदर्भ.

.

आत्ताच [सायंकाळी ७.१५ भाप्रवे] आकाशवाणी मुंबईवरून 'कलाजगत सफर' कार्यक्रमात अ‍ॅन्करकडून सांगितले गेले की 'बीपी' ने केवळ दोन आठवड्यात साडेतीन कोटीच्या व्यवसाय करून मराठी चित्रपटाच्या आर्थिक उलाढालीत एक विक्रम केला आहे. मल्टीप्लेक्सवाल्यांनी प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून खेळाच्या वेळाही वाढविल्या आहेत....विशेष म्हणजे तिकिटबारीवर पाळीत उभे असलेल्या प्रेक्षकांमध्ये अमराठीही दिसत आहेत.

हेच चित्र राहिले तर 'मी शिवाजीराजे बोलतोय' या चित्रपटाच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड 'बीपी' तोडेल असेच चित्र दिसत आहे. असे उत्पन्न मराठी चित्रपटनिर्मिती करणार्‍यांना उत्साहित करणारी आहे.

['पुणे-५२' आणि 'अजिंक्य' बद्दलही असेच आशादायक चित्र निर्माण झाले आहे.]

अशोक पाटील

खुप छान , अगदी तोलून मापून लिहीलेले परीक्षण! पालकांचं आणि मुलांचं "बीपी" वाढवणारा( अर्थातच वेगवेगळ्या कारणांनी ) दिसतोय हा बीपी. आता इकडे कधी बघायला मिळणार कोण जाणे!

अशोककाका, निर्माते पण दोन्ही राजकारण्यांची मुलं आहेत..... त्यामुळे हे गणित जमून आलं तर अधिक धनाढ्य लोक या क्षेत्रात उतरतील हे नक्की...... कोणी का निर्मिती करेना चांगले विषय येऊन जर पिक्चर चालणार असतील आणि आर्थिक गणितं सुधारणार असतील तर काय हरकत आहे...??

परीक्षण नि चित्रपट दोन्ही आवड्ले.. माझ्यामते कोठेही कमी जास्त नव्ह्तं .. अगदी नीट मेसेज दिलाय.. Happy
सगळ्यांची भुमिका मस्त आहे!
सिटीप्राईड्चा प्रेक्षकवर्ग सगळ्या पंचेसना हसत होता...

मी पण गेल्याच आठवड्यात बघितला .सिनेमा मस्त . खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पण मुल व्हीसीआर घेऊन लपत छपत येतात.विशुच्या बरोबर रात्री काही दिसलं तर म्हणून सगळ्या खोल्यातून कानोसा घेतात अशा बर्याच प्रसंगाला प्रेक्षकवर्ग टाळ्या वाजवत होता शिट्या मारत होता . त्यामुळे थोडा रसभंग होत होता . मुलांच्या मनात असणार्या सेक्स बद्दलच कुतुहल चंगल्या प्रकारे दाखवलाय पण पालकांनि ते कुतूहल दूर कस कराव त्याचे उपाय मात्र सुचवले नाहीत.

खुप छान परिक्षण Happy

मलाही बघायचाय, पण लेकीला घेऊन जावं की नाही हे ठरवतेय अजून. भुंग्या तू नेलं होतस का तुझ्या लेकीला?

९ पुर्ण वाल्या मुला मुलींना कोणी नेलं होतं का? काय अनुभव? तसं मला बर्‍याच प्रश्नांना तोंड द्यायची सवय आहे आणि नेहमी झेपेल (म्हणजे माझ्या मती नुसार तिच्या वयाला जितपत झेपेल असं मला वाटतं त्याप्रमाणे) अशी खरी आणि प्रामाणिक उत्तर देत असते. तरीही होमवर्क करुन नेलेलं बरं न्यायचं झालं तर म्हणून विचारतेय.

विशुच्या बरोबर रात्री काही दिसलं तर म्हणून सगळ्या खोल्यातून कानोसा घेतात अशा बर्याच प्रसंगाला प्रेक्षकवर्ग टाळ्या वाजवत होता शिट्या मारत होता . त्यामुळे थोडा रसभंग होत होता >>> ह्या साठी अरेरे.
कदाचित जी गर्दी जमते आहे ती काहीतरी बघायला मिळेल ह्या हेतू नी जमत असेल.

Pages