"का..."?

Submitted by किरण..... on 17 January, 2013 - 02:14

(एका आकाशगंगेतील नियमांत हरवलेल्या प्रेमाची गोष्ट.....)

प्रितीचा मिरवला थाट गुन्हा हा केला,
द्रव्यापरी नटले नाते त्या वक्ताला..
थांबला 'किरण' हा होता ज्या 'उल्केशी'
तुटली ती एका अजाणत्या इच्छेला

निरखीत 'भ्रमर' तो तुटणाऱ्या उल्केला
भाळला असा तो तिच्याच सौंदर्याला
बदलली इच्छा तिलाच मागून गेली
लाजून तरीही उल्का ती कोसळली..

घेत विसावा पदराच्या झोळीत
हुरळून जाई घटकेच्या प्रीतीत..
'जिथे' मिळे जे 'तिथेच'त्याचा तोरा
सोडून भाबड्या प्रेमाचा सुस्कारा..

तुडवीत तारका रात्र-रात्र जागणे
पालथी घातली कित्येक तारांगणे
काय शोधतो..? तिला न घेणे-देणे
'का' ऐकावे वेड्याचे रडगाणे..?

शोध होता त्या एका दैवाचा,
अक्षरी ज्याच्या योग 'त्या' भेटीचा
खंड-खंड चाळला विधीलिखिताचा
कोठे ना आखला बेत या तुटण्याचा..

क्षणात गेला निरोप उल्केपाशी,
"गाठ बांधली नियतीने माझ्याशी,
परत फिरुनी यावे लागते तुजला
ठरले आहे विचार त्या दैवाला.."

तसे हटकले मध्येच त्या दैवाने,
"केली आहे इच्छा या भ्रमराने,
तुझ्या प्राक्तनाआधी ठरले आहे..
इच्छेला उल्केचे गळणे आहे.."

"गळणे ते वेगळ्याच इच्छेसाठी,
मध्येच त्याने कशी बदलली होती..?"
बोलला किरण,"हा न्याय चुकीचा आहे,
त्या-आचीच ती इच्छा माझी आहे.."

दैव बोले,"ते आता होत नाही,
आले जे खालती, वरती जात नाही..
मागून बघ पुढच्या जन्मी जे तुझे आज नाही,
यापुढतो रे माझाही काही इलाज नाही.."

ज्या दैवाने भाळी होती लिहिली,
त्यानेच ती रे आज हिसकावली,
होती ती त्याच्या हक्काची उल्का..
अर्पूण किरण मग एके-एके रडला..

गेली ती धिक्कारून या प्रेमाला,
ओतून आग नियतीने घातही केला,
तरी लागते आस कशी वेड्याला..?
हुडकत फिरते नभात त्या उल्केला..

"खेळ खेळला साऱ्यांनी याच्याशी,
नव्हतेच कुठे रे मन हे माझे दोषी,
लावून लावली चटक अशा जहराची..
कशी मुरावी तृष्णा त्या प्रेमाची..?"

वरून बोलती, "सावर याचा तोल..
मागते काय हे 'नियतीच्या' बाहेर..."
अन गप्प राहती या एका प्रश्नाला..
"पण, 'का' समजावू माझ्या मी मलीन मनाला...?"
"पण... 'का' समजावू माझ्या मी मलीन मनाला...?"

Group content visibility: 
Public - accessible to all site users