'ड्रायक्लीन' ला काही घरगुती पर्याय आहे का?

Submitted by पियू on 17 January, 2013 - 01:53

आजकाल बरेचसे कपडे विकत घेतो तेव्हा दुकानदार सरसकट "ड्रायक्लीन"च करा असा सल्ला देतात. branded कपड्यांसाठी तर हमखास.

पण "ड्रायक्लीन" खोडे खर्चिक असते. नेहमी परवडते असे नाही.

ड्रायक्लीन ला काही घरगुती पर्याय आहे का?

पूर्वी नवीन कपडे पहिल्यांदा धुतांना रंग सुटू नये म्हणून मिठाच्या पाण्यात भिजत घालायचे थोडा वेळ. ते मी आजही करते. पण आता महागड्या कपड्यांना पाण्यात भिजवायची भीती वाटते. मीठ घातले तरीही.

कोणते कपडे ड्राय-क्लीन नाही केले तरी चालतील? सगळ्याच कपड्यांना सरसकट ड्राय-क्लीन नाही केले तरी चालते असे अनुभवले आहे. रिस्क घेऊन. असे कापड कसे ओळखायचे?

कोणी तज्ञ मार्गदर्शन करतील का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोदरेज इझी.
मी माझे हेवी वर्क चे कपडे त्यातच धुते . लग्नाच्या वेळी खरेदी करताना मालाड मध्ये एका दुकानदाराने सांगितले होते. माझे काही नविन कपडे ड्राय क्लिनिंग ला देऊन फिक्कट झाले होते. त्याने सांगितल्या पासून जरदोजी वर्क, सिल्क , इव्हन साड्यांचे काठ आणि ब्लाउज पण गोदरेज इझी मध्ये धुते.

पियु परी

माझ्या मते फक्त फर्स्ट वॉश ड्राय क्लिन केलं तरी चालतात कपडे. आणि जे कपडे नेहमी ड्रायक्लिनच करा असं सांगितलं जातं ते कपडे शक्यतो हेवी असतात, ते काही आपण रोज रोज नाही वापरत. सो १-२ वेळा घालून झाले की करावे ड्रायक्लिन.
फक्त घालून झाले की एक अख्खा दिवस आणि रात्र हँगरला टांगून बाहेर ठेवावे म्हणजे त्याचे वास निघून जातील.

दक्षिणा , काही कपडे फर्स्ट वॉश ड्राय क्लिन मधे पण फेड आउट होतात. ड्राय क्लिनिन्ग वाले सान्गतात एक्स्ट्रा कलर गेला पण ते खूप स्ट्राँग केमीकल्स वापरतात.

पियु, मलाही सेम प्रश्न सतावतोच हल्ली.

लग्नात व त्यानंतर पहिले १-२ वर्षे मिळालेले ड्रेस पीसेस अगदी २०१० पर्यंत शिवून घ्यायला पुरले. त्यानंतर ते टेलर कडे जाणे, त्याने डीले करणे व नंतर परत खेटे व घालून पाहूनही ड्रेस च्या दुरुस्स्त्या ह्या सर्वांना वैतागून रेडीमेड ड्रेसेस घेणे चालू केले, तर हा ड्राय क्लीन चा प्रॉब्लेम छळतो. मी ही रिस्क घेऊन काही कपडे घरी धुण्याचे ट्राय केले (दक्षी म्हणतेय तसे पहिल्यांदा १-२ वेळा ड्राय क्लीन व नंतर घरी).तर काही कुर्त्यांचे २-३ धुण्यात अगदी हाल झाले. रंगाचे जाऊदे. पण अगदी रया जाते. नंतर कितीही कडक इस्त्री केली तरीही आधीची मजा येत नाही. Sad

पूर्वी कॉटनचे रंगीत कपडे मीठाच्या पाण्यात घालून धुत असे. मला वाटे की कॉटन ला कशाला हवेय ड्राय क्लीन! फक्त सिल्क चे कपडे व भारी वर्क केलेले कपडे ह्यांनाच ड्राय क्लीन करायचे असे मला वाटे. पण हल्ली घाबरून कॉटनचे काही भारीतले ड्रेसही ड्राय क्लीन करतेय Sad

सिल्कचे कपड्यांचा नेहमि हा प्र्श सतावतो.कॉटनच्या तर काहि कपड्यांच्या एम्ब्रोय्डरिचे रंगहि मिक्स होतात घरि धुतले कि ! Sad काय करावे?

सेम प्रॉब्लेम झालाय माझाही.. लग्नाच्या साड्या, मेन साडी (शालु पण टिपीकल शालु नाहेय अतिहेवी असणारी सिल्क साडी आहे) हे सगळे धुवायचे आहेत. एक-दोनदा घातल्याने घामामुळे ब्लाऊजवर असणारी जर काळी पडत आलीये.. काय करु??

जरदोजी वर्क, सिल्क , इव्हन साड्यांचे काठ आणि ब्लाउज पण गोदरेज इझी मध्ये धुते.

>> अनुभव कसा आहे? माझ्या कपड्यांवर हेवी वर्क नाहीये. मला रंगाची काळजी आहे. अजून एक - तू साड्यांचे नसते काठ धुतेस? अक्खी साडी नाही? कसे काय?

दोन किंवा अनेक रंग असलेल्या नव्या कपड्यांची घरच्या धुण्यात वाट लागते.पहिला नंबर बांधणीचा.

>> अगदी बरोबर. २-३ रंगाचा कपडा धुतांना एक रंग कपड्याच्या दुसऱ्या रंगावर चढला कि इतके विचित्र वाटते; ह्यापेक्षा एकवेळ रंग फेड झाला असता तर परवडले असते असे वाटते. Sad

कॉटनच्या कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून माझी आई कायम समुद्राच्या पाण्यात भिजवायची. मी पण बर्‍याचदा तसंच करते. मीठाच्या पाण्यात भिजवण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात भिजवल्यावर रंग जात नाही हा अनुभव. रंगासाठी फिक्सिट नावाचे एक सोल्युशन मिळते ते पण बरे पडते. पण ते मार्केटमधे सहजासहजी उपलब्ध नसतं.

सिल्कच्या साड्या माईल्ड शाम्पू अथवा गोदरेज ईझीमधे धुवायच्या. साबण, डिटर्जंट वगैरे अजिबात वापरायचे नाहीत. शिवाय वाळत घालताना बाहेर उन्हामधे वाळत घालायचे नाहीत. कंपल्सरी घरामधे फॅनखाली सुकवायचे.

हेवी जरदोसी वर्क वगैर कपडे नुसत्या पाण्याने धुवून घ्यायचे. ते पण अगदी हलक्या हाताने. हे कपडे कायम घातले जात नाहीत आणी घातल्यावर फारसे खराब होत नाहीत त्यामुळे नुसत्या पाण्याने स्वच्छ होतात.

ड्रायक्लीन म्हंजे नळाला पाणी न आल्यास ,ओल्या टॉवेलने अंग पुसून घेणे.. Happy
जोक्स अपार्ट

कपडे ,पाण्याने न धुता पेट्रोलियम बेस्ड सॉल्वेंटस वापरतात. जसे गॅसोलिन आणी केरोसिन..

>>> ड्रायक्लीन म्हंजे नळाला पाणी न आल्यास ,ओल्या टॉवेलने अंग पुसून घेणे.. Lol Lol Lol

>>>> जसे गॅसोलिन आणी केरोसिन<<<
हो असे ऐकुन आहे. पण मग त्याचा वास निघुन कसा जातो? की दुसरेच काही वापरतात? माझ्या मित्राची लॉन्ड्री होती. पण ते लोक ट्रेडसिक्रेट्स सान्गत नाहीत, धन्दा बन्द केलाय तरी!

कॉटनचे कपडे फर्स्ट वॉश ड्रायक्लिन करावेत.
सिल्कचे शक्यतो नेहमीच. जर थोडासाच डाग असेल तर कापडाच्या बोळ्यावर रॉकेल घेऊन हलक्याने पुसून घ्यावे.

अनेक सिल्कस हॅण्डवॉश चालेल असतात त्यांच्यासाठी. माइल्ड शांपू + कोमट पाण्यात ५ मिनिटे बुडवून जिथे खराब झालंय तेवढाच भाग हलक्या हाताने चोळून घ्यायचा आणि लगेच संपूर्ण कपडा गार पाण्यातून काढायचा. पंख्याखाली वाळवायचा.

घामाच्या वासासाठी जालिम उपाय - व्होडका+पाणी ५०:५० प्रमाणात मिक्स करून तो स्प्रे घामाचा वास येत असेल तिथे मारायचा. वारा खेळता असेल अश्या ठिकाणी कपडा वाळत घालायचा. वास जातो. अर्थात भारतीय हवामानात ज्या प्रमाणात घाम येतो त्याला हे नेहमीच उपयोगी पडेल असे नाही पण २ वेळा तरी कपडा न धुता परत घालता येईल.

सिंथेटिक्स असतील आणि वर जर्दोसी किंवा तत्सम काम भरपूर असेल तर कपडे उलटे करून मशिनमधे टाकायचे, जेणेकरून मशिनच्या मूव्हमेंटमुळे ते कारागिरी उकलून येणार नाही. जेण्टल सायकलला फिरवायचे.

पण मग त्याचा वास निघुन कसा जातो?<<<
पेट्रोल वा रॉकेल उडून जाते. अल्कोहोल सारखेच. त्याचा वासही फार काळ टिकत नाही.
खूप हेवी वर्क असलेले कपडे ड्रायक्लिनिंगहून आल्यावर रॉकेल वा पेट्रोलसारखा वास येतो काही मिनिटे.

शर्टच्या खिशात अक्रोड ठेवून खायची वाईट सवय नडली आहे. Happy अक्रोडचा रंग खिशाभोवती पसरला आहे. काहीकेल्या निघत नाहीये. प्लीज ऊपाय सांगा. महागडे शर्ट आहेत टाकवत नाहीयेत.

मी तर कपडा कोणताही असो, फर्स्ट वॉश कायम ड्रायक्लिनच करते. माझा अनुभव, फर्स्ट वॉश घरी केला की कपड्याची नाविन्याची चमक जाते. Sad आणि नविन कपडा असला तरिही तो जुना दिसू लागतो लग्गेच. Sad

अनेक सिल्कस हॅण्डवॉश चालेल असतात त्यांच्यासाठी.>>>> हे कसं कळणार?
माझ्याकडे सिल्कच्या साड्या आहेत आणि खादी सिल्क /टसर सिल्क ला डाय करुन शिवलेले ड्रेसेस /कुर्ते. अजूनतरी कोणताच सिल्कचा ड्रेस घरी धुतला नाहीये, अपवाद जुन्या सिल्कच्या साडीचे शिवलेले कुर्ते /ड्रेसेस.. ते पण २-३ वर्ष वापरल्यावर घरी धुतलेत. खराब झाले तरी हरकत नाही ही स्टेज आल्यावर.

दिपाली , मी माझे लग्नाच्या साड्यांवरचे सिल्क चे ब्लाऊज गोदरेज ईझी मधे धुतले आहेत. ट्राय करून बघ. काळी झालेली बोर्डर नीट होणार नाही. पण कलर जात नाही.

मीठाच्या पाण्यात भिजवण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात भिजवल्यावर रंग जात नाही हा अनुभव.
>> ते कुठून आणायचे?

नी, नंदिनी खूप आभार..

पांढरे कपड्या वरचे डाग[ मळ्कट, ई] काढन्यासाठी मी amwayche product ते वापरते
ते चमचा भर आर्ध्या बादलीत टाकयचे मग नॉर्मल धुवायचे

पण ते गोदरेज इझी फक्त लोकरीच्या कपड्यांसाठी आहे ना! >> आधी नाजूक कपड्यंसाठी एक पिन्क बॉटल मधे गोदरेज चे एक लिक्विड यायचे ते बन्द झाले. दुकान्दाराने सान्गितले लोकरीच्या कपड्यांचे ईझी ड्राय क्लिनिन्ग ला चान्गला ओप्शन आहे.

मी तर कपडा कोणताही असो, फर्स्ट वॉश कायम ड्रायक्लिनच करते. >> +१. खासकरून "फॅशन के इस दौर मे गॅरंटी की अपेक्षा न करे" टाईप कपडे तर नक्कीच.

कॉटनमधे गुल्बक्षी, फिरोझी वगैरे रंगाच्या कपड्यांचा रंग हमखास जातोच. त्यामुळे घेतानाच मी हल्ली घेत नाही असल्या रंगाचे कपडे.

अनुभव कसा आहे? माझ्या कपड्यांवर हेवी वर्क नाहीये. मला रंगाची काळजी आहे. अजून एक - तू साड्यांचे नसते काठ धुतेस? अक्खी साडी नाही? कसे काय? >> खूप चान्गला अनुभव आहे. मी नेहेमी कॉटन किन्वा सिल्क च वापरते त्यामुळे कायम कपडे ईझी मधेच धुते. आधी मी कपडे ड्राय क्लिनिन्ग आणि स्टार्च साठी द्यायचे आता फक्त स्टार्च साठी देते.

मला स्वतःला खूप फायदा झाला . ह्या प्रॉब्लेम मधून मी गेले आहे म्हणून हे सॉल्युशन सान्गत आहे . ट्राय करून बघा. थोडासा भाग आधी धूऊन बघा मग पुर्ण कपडा टाका. It really works. फक्त कॉटन वापरणार्याना गोदरेज ईझी वरदान आहे.

जरीच्या साड्या, जरदोसी वर्कच्या साड्या, शिफॉनच्या ओढण्या वगैरे डेलिकेट कपड्यांसाठी मोदीकेअरचे डेलिकेट वॉश खूप छान आहे.फर्स्ट ड्रायक्लीन असे लेबल लावलेले कपडे नंतर यात धुवू शकतो.
कपड्यांची तकाकी तशीच रहाते...उजळते छानपैकी.. मी वापरले आहे. जरीच्या साड्यांचे काठ तर छानपैकी चमकून उठतात. Happy