मुद्दल सोडा, व्याजच अजुनी फिटले नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 January, 2013 - 13:48

गझल
मुद्दल सोडा, व्याजच अजुनी फिटले नाही!
ग्रहण कधी कर्जाचे माझ्या सुटले नाही!!

कळ्या कोवळ्या, फुलण्याआधी खुडल्या गेल्या....
तरी कुणाचेच आतडे का तुटले नाही?

सत्संगाची जरी वानवा सभोवताली;
तुझी कृपा! पाऊल कधी भरकटले नाही!

चिखल चहूबाजूंनी सारे उडवत होते.......
कोणाचे चारित्र्य सांग बरबटले नाही?

तारायाला खुद्द देव मग कसली भीती?
कैक जाहले ठार...मला खरचटले नाही!

आमच्यातला तोच एकटा हुशार होता!
म्हणून नाते अजूनही फिसकटले नाही!!

जागोजागी फक्त शायरी त्यांस मिळाली;
मग चोरांनी काहीही उचकटले नाही!

वादळ सुद्धा चकीत झाले मला पाहुनी,
घडीबंद आयुष्य कधी विसकटले नाही!

हृदयामध्ये एक ज्योत दिनरात तेवते!
आजवरी ते, थोडेही धुरकटले नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ता.क. बाकी छानेय. आतडी तुटण्याचा शे'र आवडला. कॉण्टेक्स्ट सेन्सिटिव्ह आहे.

महेश