तोच चंद्रमा नभात

Submitted by पुरंदरे शशांक on 16 January, 2013 - 05:29

तोच चंद्रमा नभात

रविवार दि १३ जाने. २०१३ ला द्वितीयेची कोर अशी चमकत होती.

प्र चि १
95.JPG

प्र चि २
97.JPG

प्र चि ३
99.JPG

प्र चि ४
103.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाला विलक्षण अशी शीतलता देणारी ही चंद्रकोर. मी पहाटेच्या वेळी गावाबाहेरील माळरानाच्या दिशेने चालत जात असताना नित्यदिनी दिसत्ये. या चंद्रकोरीकडे तसेच तेजस्वीरित्या चमकणार्‍या शुक्रतार्‍याकडे पाहताना रस्ता कधी सरतो ते कधीच समजून येत नाही.

आयुष्यातील काही सुखांच्या कल्पना इतक्या देखण्या असतात की त्याची तुलना होऊ शकत नाही...करूही नये....चंद्रकलादर्शन हे त्या सुखांपैकी एक.

तुमचे या प्रचिंबद्दल खास आभार, शशांक जी.

केवळ अप्रतिम. शहराच्या झामझोकात (ambient light?) इतका सुंदर फोटो.
अशोककाकांशी अगदी अगदी सहमत... <<आयुष्यातील काही सुखांच्या कल्पना इतक्या देखण्या असतात की त्याची तुलना होऊ शकत नाही...करूही नये....चंद्रकलादर्शन हे त्या सुखांपैकी एक>>

छानच !

सर्व रसिकांचे मनापासून आभार.

आयुष्यातील काही सुखांच्या कल्पना इतक्या देखण्या असतात की त्याची तुलना होऊ शकत नाही...करूही नये....चंद्रकलादर्शन हे त्या सुखांपैकी एक. >>>> अशोकजींनी नेमक्या शब्दात उलगडलंय सगळं.....

अमावस्येच्या आधी १-२ दिवस पहाटेच्या सुमारास जी अशीच नाजुक-साजुक कोर दिसते ती ही अतिशय देखणी, मनमोहकच.
ज्या कोणी चंद्राला मनाचा स्वामी/ कारक म्हटलंय त्याला मनोमन साष्टांग दंडवतंच... किती नेमकं ओळखलंय !!

पैशांनी न विकत मिळणारी नानाविध, परोपरीची, कितीएक सुखे आपल्या अवती भवती असतात; वेळे अभावी / दुर्लक्षामुळे आपण त्यांच्या अनुभुतीला मुकतो. (किंबहुना पैसे मोजायला न लागल्याने आपण त्याची अवज्ञा करतो) पण आपले काही एक पुर्वसंचित असते की काहीवेळा कोणीतरी अलगदपणे आपली झोळी त्या सुखांनी भरुन टाकतात.
धन्यवाद शशांक! यावेळी ती झोळी भरणारे आपण आहात! Happy

किती कवितांचा परिणाम अन गाण्यांच्या आठवणी देणारं प्र.चि. ,धन्स शशांकजी.
नितांतसुंदर. (मीही पाहिली होती ही कोर.श्वास रोखायला लावणारी.)
अशोकजींची प्रतिक्रियाही समर्पक.

व्वा! सुंदर! ;स्मित:
शशांकजी आणि हिम्स्कुल मस्त आलेत फ़ोटो. Happy
मी पण पाहिली त्यादिवशी चंद्रकोर . आयडीयल ग्राऊंडवर, गाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि या चंद्रकोरीने पण त्याला हजेरी लावली होती. Happy

मस्तच Happy

हिम्सकूल - मस्तंच फोटो...
गजानन - येऊंद्या की राव... अशा गोष्टीला परवानगी कशाला ???

सर्व रसिकांचे मनापासून आभार...

शशांक,'
मस्त फोटो!
अशी चंद्रकोर पहिली कि "परावर्तीत प्रकाश" आणि चंद्रावरचे "खाच-खळगे" विसरायला होतात Happy

>>>"ज्या कोणी चंद्राला मनाचा स्वामी/ कारक म्हटलंय त्याला मनोमन साष्टांग दंडवतंच... किती नेमकं ओळखलंय !!"
- अचूक वर्णन. पटले.

Pages