चित्र

Submitted by वैशाली अ वर्तक on 16 January, 2013 - 04:46

चित्र
हाती आले चित्र जुने ,
मन गेले मागे मागे,
काहूर दाटले मनीं आठवांचे.
मन रमले भूतकाळाते .
सहज आला विचार मनी ,
चित्राची किती कृपा जगावरी ,
नव्हते शब्द वा भाषा अधरी ,
चित्र वाच्य करि संभाषणी
दिसते नयनांना ते दृष्य असे,
छायेने रेखियता चित्र होतसे ,
चित्र रंगविते भाव दृष्याचे
चित्र सांगते भाव मनाचे .
चित्र दावि नवरस भाव
असीम भाव उमटतात तयात
चित्र करिते सजाण बालकास ,
अन देते रंजन मनास .
चित्रानेच जपले भूतकाळाला
इतिहासाला अन संस्कृतिला
नसते छायाचित्र वा चित्र जगती
कशी प्रगत झाली असती सिने सृष्टी

Group content visibility: 
Public - accessible to all site users