कवितेचे गझलेत रुपांतर करता येते का?

Submitted by मंदार खरे on 16 January, 2013 - 00:47

वानगी दाखल खलील कडव्याचे कोणी गझलेत रुपांतर करु शकेल का?

धरणं रिती झाली नदीत राहीली वाळु
शुष्क झाले अधर अश्रु पिऊन येथे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिक्त धरणे ,..वालुका जल शोषुनी
शुष्क झाले ओठ अश्रू प्राषुनी

असा शेर किंवा मतला होईल...पण ह्या कडव्याची गझल कशी होईल?

धन्यबाद......

खलील प्रकार गझलेत मोडेल का?

गझल

मदिरेचे ते प्याले कधी स्पर्शीलेच नाही
तुझ्या नशेने शुद्धीत कधी ठेवलेच नाही

कित्येकांनी तुज उचलेले सहज चाखलेही
माझे कधी ते धैर्य झालेच नाही

कधी स्पर्श होता लाजून गेलीस तू
जशी आधी कधी तशी भेटलीच नाही

दिसलीस सजुन नुकतीच बसलेली सांजवेळी
सौंदर्य ते करंट्या डोळ्यात साठलेच नाही

दिलीस खंत परी प्रेमास मी का पात्र नाही
कित्येक केल्या रचना पण तू गवसलीच नाही

रिक्त झाली नदी धरणीं फक्त वाळू
शुष्क झाले अधर अश्रू पिऊन येथे

असेही करता येते (जास्तीत जास्त समवृत्तीय करायचे असल्यास)

गझल शिकायची असेल तर प्रा सतीश देवपूरकर याना सम्पर्क करावा
गझल शिकायला मिळेलच शिवाय फ्री मध्ये पर्यायी गझलही शिकायला मिळेल मग आम्हाला असे प्रश्न सारखेसारखे विचारत बसावे लागणार नाहीत तुम्हाला Wink
पुलेशु

लिहीत रहावे चुका असतीलच तर काढायला आम्ही सगळे आहोतच Happy

मंदार जी , हो कवितेचे रुपांतर

मंदार जी ,
हो कवितेचे रुपांतर गझलेत करता येते . पण प्रत्येक नाही .
कविता दोन दोन ओळी फोर्म मध्ये असेल तर ते अजून सहज होते .
(पण हे जरुरीच आहे असे नाही .)

मी उदाहरणासाठी आकाशदा (आकाश बिरारी )ची पुढील रचना देतो .

|| पैसा || (कविता)

विद्येस मान नाही, तत्वात शान नाही
पैसाच सर्व काही, त्याला सलाम येथे

जोतो विके ईमान, त्यालाच भाव आहे
सत्यास वाव देता , डोके कलाम येथे

लाचार पोट मागे, हातास काम काही
दिनरात राबतांना, मिळतो छदाम येथे

धनदांडग्या चमूने, हा खेळ मांडलेला
गडगंज बाप देतो, पोरा बदाम येथे

सोन्यात मढविलेल्या, मुर्तीत देव बंद
आता हातात नाही, त्याच्या लगाम येथे

कोणास सूट नाही, हे चक्र भेदण्याची
पैश्या समोर सारी, दुनिया गुलाम येथे
.

--- आकाश बिरारी

|| पैसा || .. ( गझल )
.

वृत्त : "आनंदकंद" - "गागालगा लगागा गागालगा लगागा"

|| पैसा ||
---------

विद्येस मान नाही, तत्वा न दाम येथे
पैसाच सर्व काही, त्याला सलाम येथे

जोतो इमान टाके, कोणी मिठा न जागे
सत्यास वाव देता, डोके कलाम येथे

लाचार पोट मागे, हातास काम काही
मोडून मान पाठा, हाती छदाम येथे

लोभी ठग्या जनांचा, उद्दाम खेळ चाले
श्रीमंत बाप देतो, पोरा बदाम येथे

सोन्यात घाटलेल्या, मुर्तीत देव बंदी
हातात आज त्याच्या, नाही लगाम येथे

कोणास सूट नाही, दुष्चक्र भेदण्याची
पैश्या समोर सारी, पृथ्वी गुलाम येथे

--- आकाश बिरारी

अर्थात वरील फक्त एक उदाहरण आहे .
त्यासाठी वृत्त , जमीन , अलामत , काफिया ,रदीफ
असा बराच अभ्यास ही हवा .

अन मुळात कवितेत दम हवा ..

अजून एक
अति मुक्तछंदी(बेबंद ) कविता गझलेत रुपांतरीत करू नये / तसा प्रयत्न ही करू नये. (वै.म.)

क्षमा करा, परंतु हा प्रश्नच सर्वथा निरर्थक आहे.
'रुपांतर' करावेच का ? कविता, कविताच असू द्यावी की ! गझल समजून घ्या आणि गझलच लिहा.. लिहिलेल्या कवितेला 'आकार' देऊन गझलेत आणायचा अट्टाहास हा मूलतः सृजनाच्या उत्स्फूर्ततेच्या आवश्यकतेच्या विरोधात असल्याने, आधीच शब्दबद्ध झालेल्या एखाद्या कवितेला मुद्दाम दुसर्‍या कुठल्याही आकृतिबंधात आणण्यापेक्षा नवीन लेखनाचा प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर. - असे मला वाटते.

धन्यवाद सर्वांना
श्री.विनायक उजळंबे

तुम्ही दिलेले उदाहरण अतिशय छान आहे आणि मी ते एका खाले एक मांडून बघितले

एक शंका होती जर निरसन करता आले तर आभारी होइन

विद्येस मान नाही, तत्वात शान नाही
पैसाच सर्व काही, त्याला सलाम येथे

विद्येस मान नाही, तत्वा न दाम येथे (इथे तत्वात चे तत्वा न का झाले? किंवा तत्वा न शान येथे हे सुद्धा चालेल का?)
पैसाच सर्व काही, त्याला सलाम येथे

जोतो विके ईमान, त्यालाच भाव आहे
सत्यास वाव देता , डोके कलाम येथे

जोतो इमान टाके, कोणी मिठा न जागे (इथे सुद्धा विके चे टाके का करावे लागले उमजले नाही, किंवा त्यालाच भाव येथे ऐवजी मिठा न जागे का केले?
सत्यास वाव देता, डोके कलाम येथे

वरील सर्व शंका या गझल समजावी आणि करता यावी ह्या करीता आहेत गैरसमज नसावा

आपला कुपाभिलाषी

मंदार खरे

श्री डॉ.कैलास गायकवाड तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत..

शतःशा धन्यवाद!!!!

बेफिकीर यांना तर त्रिवार सलाम

मंदार,

जालापलिकडे बरेच वाचण्यासारखे आहे. ते ओरिजिनल वाचा. त्यातुनच घेतलेले विचार कशाला वाचायचे? गझल विचार अनुभवण्याची गोष्ट आहे, वाचून पाठ करण्याची नाही.

शुभेच्छा..!