कमतरता दिलदार स्वभावाची आहे

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 08:02

कमतरता दिलदार स्वभावाची आहे
जीवनशैली ताणतणावाची आहे

नवरा होता तेव्हा त्याची होती ती
आता पत्नी सार्‍या गावाची आहे

पेपरमध्ये फोटो आला की विखरू
हीच मागणी क्षुब्ध जमावाची आहे

भीती पाप्यालाही आहे लोकांची
फक्त गरज निर्भीड उठावाची आहे

बाप म्हणे पाहून बंगला पोराचा
ही प्रगती माझ्याच अभावाची आहे

मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे

शाल नारळापलीकडे किंमत नाही
'बेफिकीर'ची कविता नावाची आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा<<<

हा हास्योत्पादक शेर नाही आहे. उपहासगर्भता आहे. विधवेबाबत लोक कसा विचार करू लागतात त्यावरची टिपण्णी आहे. सर्कॅस्टिक!

मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे

मस्त शेर.
अवघड झालाय.

कमतरता दिलदार स्वभावाची आहे
जीवनशैली ताणतणावाची आहे,,,,,,,,,,,,,,,,सहीय!

मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे....क्या बात!

<<<हा हा हा>>>

"काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही"

Sad

-सुप्रिया.

>>पेपरमध्ये फोटो आला की विखरू
हीच मागणी क्षुब्ध जमावाची आहे >>
छानच,पण एवढे तर तुम्ही डाव्या हातानेही लिहाल.

भूषणराव!
छान गझल
!
बाप म्हणे पाहून बंगला पोराचा
ही प्रगती माझ्याच अभावाची आहे
<<<<<<<<सुंदर शेर.....आमचाही अनुभव तोच आहे!
मतल्यात किंचित बदल सुचला..........
कमतरता दिलदार स्वभावाची आहे!
अन् मुबलकता ताणतणावाची आहे!!

..........प्रा.सतीश देवपूरकर

चांगली गझल... आवडली.

पत्नीच्या शेरातील उपहासगर्भता चटकन ध्यानात येत नाही.... त्यामुळे हास्योत्पादक शेरच वाटतो आहे.

मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे.........

काहीतरी चांगलं वाचायला मिळालं की छान वाटतं..........

कमतरता दिलदार स्वभावाची आहे
जीवनशैली ताणतणावाची आहे

सुंदर मतला..

मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे

अप्रतिम शेर..

गझल खूप आवडली..धन्यवाद..

बेफिकीर,

परत एकदा एक सकस रचना वाचल्याचा आनंद झाला. समारोप अप्रतिम आहे. शेवटचं कडवं वाचलं की एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं.

एक गंमत करून पहिली. दुसर्‍या आणि शेवटल्या ओळींची अदलाबदल केली. आशयाचा रोख किंचित बदलला. पण मूळ गाभा तसाच राहिला.

आ.न.,
-गा.पै.

भीती पाप्यालाही आहे लोकांची
फक्त गरज निर्भीड उठावाची आहे
व्वा..!

बाप म्हणे पाहून बंगला पोराचा
ही प्रगती माझ्याच अभावाची आहे
व्वा...!

हे दोन.... छानच...!