माझी कविता...

Submitted by सत्यजित on 14 January, 2013 - 23:21

माझी कविता
माझ्यावरती कधीच रुसत नाही
रुसते ती शब्दांवर
आणि उतरते कागदा वरती ... शब्दां शिवाय
फरक इतकाच की
ती तुम्हाला कळत नाही
पण माझी कविता माझ्यावर कधीच रुसत नाही...

-सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छानच
याची चारोळी करा

माझी कविता माझ्यावर कधीच रुसत नाही
ती रुसते शब्दांवर ... शब्दांशिवाय उतरते कागदावर ...
फरक इतकाच की ती तुम्हाला कळत नाही
माझी कविता माझ्यावर कधीच रुसत नाही.

मस्तच !

देउ का झब्बु Happy

माझे विडंबन
माझ्यावरती कधीच हसत नाही
हसते माझ्या कमतरतेवर
आणि उमटते माबोवरती ... शब्दांमधे
फरक इतकाच की
ते तुम्हाला (कमतरता) कळत नाही ( म्हणून तुम्ही हसता )
पण माझे विडंबन माझ्यावर कधीच हसत नाही...

झब्बू मस्तय
हसते माझ्या हसण्यवर !!>>>>>>>>>>असे करा
इतरांच्या गंभीर कविता पाहिल्या की काहीजणाना अनेकदा हसू येते त्या हसण्यावरच विडम्बन हसते असा अर्थ मी लावत आहे !!
धन्स
-वैवकु

वर्षे... कमतरता कसली ही तर प्रतिभा आहे तुझी, शिघ्र विडंबनकार आहेस तू Happy

भारती, चिमुरी, वैभव , वर्षा तुमचे खुप आभार...