गाणारं सौंदर्य...

Submitted by चैतन्य दीक्षित on 14 January, 2013 - 12:13

परवा आयुष्यात दुसर्‍यांदा तिला लाइव्ह ऐकलं. घरातून निघायला उशीर झाला होता त्यामुळे सुरुवातीला तिने गायिलेला 'जोग' हुकलाच. पण पोहोचलो तेव्हा बागेश्री सुरु होता आणि गाणं ऐन रंगात आलं होतं. मध्यलय झपताल संपवून द्रुत तीनतालात बागेश्री दिमाखदारपणे पुढे चालला होता. आधी त्या स्वरांनी सगळी धावपळ, उशीर झाल्यामुळे झालेली चिडचिड थांबली आणि मग डोळेही निवले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

From Swarzankaar

From Swarzankaar

From Swarzankaar

From Swarzankaar

From Swarzankaar

From Swarzankaar

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, वैभव, जिप्सी, कंसराज
धन्यवाद Happy
>>हातही कित्ती सुरेख आहे
अवल, अनुमोदन

वैभव-
ह्या पं. अजय चक्रवर्ती यांची कन्या कौशिकी चक्रवर्ती आहेत.

अगदी खरं! गाणारं सौंदर्यच हे! ह्या कार्यक्रमात कौशिकीला ऐकले आणि मी तिची फॅन झाले आहे. जितकी अप्रतिम तिची गायकी आहे तितकीच ती गोड आहे. Happy ह्या सुंदर फोटोजसाठी खूप खूप आभार!

शास्त्रीय गाण्यातल मला काहिच कळत नाही ... Happy

पण फोटो केवळ अप्रतिम .... सुंदरच ... प्रत्येक फोटो परत परत पहावसा वाटतो.

प्रत्येक फोटोतले चेहर्‍यावरचे भाव एकदम खास... Happy

अमेलियाशी सहमत. ''गाणारं सौंदर्य'' व्वा क्या बात !
प्रतिभावंताची प्रतिभावंत कन्या, शिवाय सुस्वरूप. देव एखाद्याला सगळंच देतो .
आभार चैतन्यजी या फोटोंसाठी.

"माझ्या संगीतसाधनेत व्यतय येण्याची शक्यता असल्याने मी आपले निमंत्रण स्वीकारू शकत नाही....' ऋतुपर्ण घोष या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने ['रेनकोट, चोखेर बाली'] देवू केलेल्या प्रमुख नायिकेच्या ऑफरला नम्रपणे नकार देणार्‍या कौशिकी चक्रवर्तीच्या शास्त्रीय संगीत सेवेला सलाम केला पाहिजे. वयाच्या २ र्‍या वर्षापासून त्यानी भारतीय संगीत कलेची सेवा सुरू केली असून आज हे नाव त्यांची या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्हीमुळे देशविदेशात गाजत आहे.

kaushiki_chakraborty.jpg

त्यांचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यानीही कौशिकीप्रमाणेच आपले श्वशुर पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे.

श्री.चैतन्य दीक्षित यानी धाग्याला दिलेले शीर्षक आणि दिलेले फोटो 'कौशिकी' च्या नावाला शोभणारे असेच आहेत.

अशोक पाटील

अजुन लाईव्ह ऐकायला मिळालेच नाहीये.. पण काही रेकॉर्डींग्स ऐकली आहेत... फारच मस्त आहेत..

चैतन्य फोटो फारच सुंदर आलेत.

कुळकर्णी, यशवंतराव चव्हाण ला वर्षातुन १-२ कार्यक्रम होतात ह्यांचे. लक्ष ठेवा. हवं तर आतिथ्यशील कोथ्रुडकरांना सांगुन ठेवा वर्दी देण्यास.

खरच सगळेच फोटो अप्रतीम आहेत..लेखाच नाव अगदी चपखल आहे..अस्सल भारतीय सात्विक सौंदर्य!

पुनश्च धन्यवाद
वि.दि.पा,
गाण्याबद्दल म्हणण्यापेक्षा संपूर्ण स्वरझंकार महोत्सवाबद्दल लिहायचं डोक्यात आहे, पण अजून मुहूर्त लागत नाहिये Sad

चैतन्य...........काय सुंदर फोटो आहेत! गाण्याबद्दल तर जितकं बोलू कमीच पडेल!!
तिची एक खमाजमधली (बहुतेक)ठुमरीच ....अशी डोळ्यापुढेही आहे आणि कानात तर आहेच. अगदी पहिल्या हार्मोनियमच्या अप्रतीम तुकड्यासकट!
पं अजय चक्रवर्तीही खूप आवडतात.
अशोक यांनी दिलेली माहिती इन्टरेस्टिंग!

Pages