वृध्दांचा आहार कसा वाढवावा?

Submitted by विद्याक on 14 January, 2013 - 10:59

माझे बाबा वय वर्ष-८८, यांना १ दिवसच ताप आलेला. पण त्यानंतर त्यांची खाण्यावरची ईच्छा एकदम कमी झाली. ३ आठवडे झाले. काहीच खात नाहीत. काही दिवसापुर्वी निदान लिक्वीड्-सुप, ज्युस तरी घ्यायचे. पण आता काहीच घेत नाहीत. डॉं.नी हॉस्पीटलमधे अ‍ॅडमीट करायला सांगीतले पण ते हॉ.जायलाच तयार नाहीत, म्हणुन घरीच सलाईन लावले. त्याचाही काही फायदा नाही. पोटात दुखते, उलटी होते म्हणुन काहीच घेत नाहीत. फोर्स केला तर खुप चिडतात, चिडल्यावर अशक्तपणामुळे धाप लागते. काय करावे काहीच कळत नाही. कुणाचेच ऐकत नाहीत. कशाची चव, वास त्यांना नकोसा वाटतो. खर तर ते चांगले खाणारे होते. पट्टीचे नॉन्-व्हेज खाणारे आता या वयातही. पण आता काहीच खात नाहीत. प्लिज, कुणाला काही माहीत असेल तर कळवा. इब्लीस, तुम्ही काही मदत करु शकाल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना उलटी होईल अस वाटत असेल तर सुरवातीला पाणी, सरबत अस काहितरी २ चमचे दर पाच मिनिटांनी अस १/२ देऊन बघा. पचल तर ४ चमचे पुढचा १/२ तास द्या. अस वाढवत न्या. १२-१५ तासांनी सरबत वैगरे आजिबातच उलटुन पडल नाही तर पेज वैगरे चालू करा ती पण अशीच थोडी थोडी द्या.

अर्थात मी काही डॉक्टर नाही पण अस करतात हे ऐकलेल आहे. एकदा डॉ. ना विचारुन मगच करुन बघा, तेच जास्ती योग्य काय ते सांगतील.

धन्यवाद अनु. काल त्यांनी दिवसभरा मधे १/२कप चहा, १/२कप लस्सी, १/२ कप पियुश घेतले. डॉ. सांगतात खाल्ले पाहीजे. ते खात नाहीत हाच प्रोब्लेम आहे.

अशा वेळेला डॉ. सरळ चमचा चमचा सॅरलॅक द्यायला सांगतात. तुमच्या डॉ. विचारुन देऊन बघा आवडलं तर अजून थोड कालवून द्या.

एवढ्या वयाला १ दिवस ताप आला तरी भूक लागत नाही कारण थोडा लिव्हरवरही परिणाम होत असावा. माझ्या आईला सत्तरीला ताप आला तरी भूक जात असे. अश्यावेळी तापानंतर तिला २-३ दिवस रोज १ गोळी लिव्ह ५२ ची दिली की तिसर्‍या दिवशी तिचं जेवण अर्ध्या पोळीवरुन दिड पोळीवर येत असे आणि मग नॉर्मल जेवू लागे.

तुमच्या वडिलांच्या पोटात दुखते आणि उलटी होते म्हणताय म्हणजे वरिल शंका डॉक्टरना विचारुन घ्या.

विद्याक ताई,
बेबीफूडचा पर्याय चांगला असतो, ते पातळ अन्न घेऊ लागले आहेत हे चांगलेच आहे. त्यांच्या आवडीनुसार चिकन सूप इ. पासून हळू हळू वाढवून पहा.
स्पेसिफिक केस मध्ये प्रत्यक्ष न तपासता उत्तर देता येईल असे नसते. म्हणून नेट कन्सल्टेशन निरुपयोगी आहे, क्षमस्व!

डॉ. सांगीतले ,त्यांना काय पाहीजे ते द्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्यांना जेलोसिन दिले त्याने बर वाटते . आता स्वःताहुन चहा,पियुश मागुन घेतले. पण बाकी काही नाही. स्वतःहुन मागीतले, आणि आता उलटी झाली नाही, हीच खुप मोठी गोष्ट आहे. श्यामली, आश्विनी सांगते मी आईला तुम्ही सुचवलेल्या गोष्टी.
इब्लिस, हे असे म्हणजे भुक कमी होणे, माझ्या सासुबाईंना, नात्यातल्या दुसर्‍या बाईंना आणि बाबांनाही असेच झाले. हे असे या वयात का होते? म्हणुन विचारले.
धन्यवाद तुमच्या सर्वांचे!

विद्याक, जे झाले त्यावरून

विद्याक,
जे झाले त्यावरून अ‍ॅसिडिटी वाढली होती, इतकेच म्हणतो. तशी शंका होती, पण या वयात अनेक इतर बाबी असू शकतात. जेल्युसिलने बरे वाटले आहे. तेही थोडे थोडे देत जा. तुमचे डॉक्टर आहेतच सोबत.

हे -भूक कमी होणे- असे का होते?

वयानुसार चय-अपचयापैकी चय कमी होतो, अपचय वाढतो. चयापचयाने शरीर चालते.
मेटॅबॉलिझम चे मराठी भाषांतर चयापचय असे केले जाते. चय = कन्स्ट्रक्शन उर्फ anabolism, अपचय = डीस्ट्रक्शन उर्फ catabolism. Anabolism + Catabolism = Metabolism.
लहान मुलांत चय भयंकर स्ट्राँग असतो. दिवसभरात झालेली शरीराची झीज भरूनच काढतात, प्रचण्ड एनर्जी. कायम उड्या. वरून वाढतात! हे मुख्यत्वे झोपेत होते. (झाडंही रात्रीतून वाढलेली दिसतात) खातात कधी अन किती ते कळत नाही, पण वाढतात नक्की.

पण हे 'चय' वयानुसार कमी होते. ४०-५० पर्यंत प्लॅटू येतो. मग अपचय जास्त जड होवू लागतो. नवी ग्रोथ करायची नसते. आहे तोच घसारा -जमेल तितका- भरून काढायचा असतो.

मग थोडी झोप अन थोडे अन्न पुरते. म्हणून म्हातारपणी खारके सारखे असावे, असे म्हणतात.(उष्ण प्रदेश = भारत. स्टोअर्ड फॅट, कोल्ड कंट्रीज इ. वेगळ्या बाबी आहेत.) वजन कमी असेल असे 'सुक्कट' म्हातारे जास्त दिवस 'टिकतात'. पण या वयात शरीराची अन्न 'शोषण्याची' क्षमता कमी झालेली असते. म्हणून अधून मधून सर्व जीवनसत्वांच्या गोळ्या/पातळ औषध द्या. ४-६ महिन्यात १० दिवस वगैरे. अंगाला ऊन लागू द्या. घराबाहेर पडू द्या, नाही तर किमान पॅसजमधे फेर्‍या मारू द्या. पचायला हलके, प्रोटीन अन कार्बोहायड्रेटवाले अन्न द्या. फॅट्स ब्रेक करून मग वापरणे जरा कठिण जाते या वयात. पण स्निग्धताही हवीच असते. ती आपल्याकडे वरून मालिश केलेल्या तेलासारखी द्यावी. जेवणात त्यांना पचेल इतकी. (विशिष्ट प्रदेशात वापरतात तसा 'उभा' चमचा वापरायचा तूप द्यायला. जेवणातल्या तुपाने 'सकाळी नरम होते' असाही एक पॉझिटिव्ह साईड इफेक्ट आहे.)

तात्पर्य काय, तर भूक कमी होते, कारण 'वय झाले आहे'.

हे त्यांनी अ‍ॅक्सेप्ट करायचे असते. ते करतात. जास्त टेन्शन घेऊ नका. बस, दुसरे बाळपण म्हणून (समजून उमजून) लाड पुरवा.

अन सगळ्यात महत्वाचे. लेट हिम बी अ‍ॅक्टीव्ह. त्यांना आवडेल, वाट्टेल ती अ‍ॅक्टीव्हिटी करू द्या. मग भले बाल्कनीत बसून खाली खेळणार्‍या मुलांना ओरडा घालणे हे अजोबांना आवडत असेल. ओरडू द्या. मुलांनाही आवडते अजोबांनी ओरडलेले.

इब्लिस, थॅक्यु,थॅक्यु.... तुम्ही डॉ. असल्याने तुमचा सल्ला/माहिती खुपच चांगली असते. म्हणुनच वर तुमचे नाव घातले. चांगली माहिती दिलीत. हो, खुप घाबरुन गेलेलो आम्ही सर्व. पण अजुन लिक्विडच घेतात म्हणुन काळजी वाटते.