Submitted by निशिकांत on 13 January, 2013 - 23:39
दु:ख विसरायास असतो पीत मी
आज आहे नेमका शुध्दीत मी
व्यर्थ आलो उच्चभ्रू वस्तीत मी
वाढलो चाळीमधे मस्तीत मी
तू जशा लिहिल्यास गजला त्या क्षणी
कैद झालो वाळल्या शाईत मी
दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी
हात तू हातात देवुन बघ जरा
साथ देणे जाणतो यारीत मी
काय पाहुन पावला ईश्वर मला
काढले होते मला मोडीत मी
दु:ख हसण्याआड लपवावे, जुनी
यत्न करुनी पाळतो ही रीत मी
का भुतावळ घालते घिरट्या अशी?
घातले त्यांना कधी ना शीत मी
शल्य "निशिकांता"स भौतिक या जगी
चाललो नाही कधी वारीत मी
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त अमोल केळकर
मस्त
अमोल केळकर
तू जशा लिहिल्यास गजला त्या
तू जशा लिहिल्यास गजला त्या क्षणी
कैद झालो वाळल्या शाईत मी
दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी<<< तरल खयाल
'उच्चभ्रू' या शब्दात वृत्त बदलत आहे.
धन्यवाद!
सुरेख गझल.
सुरेख गझल.
छान
छान
छान
छान
दे सखे मिसरा तुझ्या
दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी....वा आवडला खयाल!