कैफ माझ्या काळजाचा ह्या तुझ्या दारूत नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 January, 2013 - 09:45

गझल
कैफ माझ्या काळजाचा ह्या तुझ्या दारूत नाही!
मी पिण्याआधीच माझ्या राहिलो काबूत नाही!!

हे अताशा आगलावे सांत्वनासाठी निघाले....
आज जेव्हा एकही घर राहिले शाबूत नाही!

रंगवेडा, गंधवेडा, एक मी सौंदर्यवेडा!
मी कुणाचा भाट नाही, मी कुणाचा दूत नाही!!

जन्म गेला पावलांचा वाळवंटी चालताना....
जाळण्याइतका मला चटका तुझ्या वाळूत नाही!

माझिया थडग्यावरी साकारले ते राजवाडे!
मी तिथे राहूनही त्यांच्यात अंतर्भूत नाही!!

बेरजा किंवा वजाबाक्या तुम्ही तुमच्याच मांडा......
हे असे खेळायला आयुष्य म्हणजे द्यूत नाही!

मी हवा काढून त्यांच्या घेतली सा-या कटाची!
वार करण्याएवढी ताकद कुण्या बाहूत नाही!!

द्यायचे नव्हते मला प्रेतासही माझ्या विटाळू!
ह्याचसाठी मी कुणा उचलू दिला ताबूत नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेरजा किंवा वजाबाक्या तुम्ही तुमच्याच मांडा......
हे असे खेळायला आयुष्य म्हणजे द्यूत नाही!
>>>
वाचायला छान पण अर्थ काय आहे?
बेरीज आणि वजाबाकी आणि द्यूत याचा काय संबंद्ध?

द्यायचे नव्हते मला प्रेतासही माझ्या विटाळू!
ह्याचसाठी मी कुणा उचलू दिला ताबूत नाही!!
>>>मग काय झाले त्या प्रेताचे? आणि असं कसं काय उचलु दिले नाही?
तुम्हाला काय सांगायचे आहे यातुन?

गझल वगैरे छान करता तुम्ही, पण हे कायच्या काहिच आहे.
चु भु दे घे
असो पु. ले. शु.

छान

ही तुमची गझल वाचून 'तुमची गझल' या बाबत चिंतन करत होतो तोवर एक शेर सुचला

हा शेर एक शेर म्हणून कसा झाला आहे हे सांगाल का?? (मजवरील वैयक्तिक रोष विसरून )

प्राशुनी मदिरा गझलची मत्त हत्ती जाहलो मी
आवरू शकणार मजला एकही माहूत नाही

??? ....हझलिश आहे जरासा पण कसा आहे शेर प्रा.साहेब ??? ..

प्रतिक्षेत.........
~नवाच एक कुणीतरी

एक नावाचा कुणीतरी,
आता जरा एखादे गोंडस नाव धारण करा म्हणजे आपण कुणाच्यातरी का होइना लक्षात रहाल! असो.
अरे वा! आपण चिंतन देखिल करता? कमाल आहे बुवा!
आम्ही गझलेकडे पहातो, गझलकाराकडे नव्हे!
रोष म्हणाल तर तो आमचा कुणावरच नसतो.
कारण आमचे व्यक्तीमत्व व प्रवृत्तीच अशी आहे की, आम्ही म्हणतो........
राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा! तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!

आता आपल्या शेराविषयी.................
सदर शेरातून आपली एकंदर अभिरुची व प्रतिमासृष्टी दिसून आली!

हत्ती काय, गझल काय, मत्त होणे काय आणि माहूत काय, सगळेच अजब व अभिनव आहे, मग,शेराला
गझलीश म्हणा, हझलीश म्हणा, हसू आणणारे म्हणा वा हसे होणारे म्हणा......काय फरक पडतो?
जाता जाता इतकेच म्हणावेसे वाटते........

गझलेमधली नशा काय ती, कशी कळावी तुजला?
नशा अशी ही, चढली म्हणजे कधीच उतरत नाही!
प्रा.सतीश देवपूरकर

आता