फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी".. निकाल

Submitted by उदयन.. on 13 January, 2013 - 08:54

http://www.maayboli.com/node/40148
इथे झालेल्या चर्चे नुसार हा धागा काढण्यात आलेला आहे.
.
माझी वैयक्तिक विनंती आहे जिप्सी आणि शापित गंधर्व यांनी ज्युरी (जज) बनावे....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित करावे...;)

प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील

१) जानेवारी महिन्याची थीम आहे............. "थंडी"..!!!!

निकाल जाहीर करण्यात येत आहे

१) प्रथम क्रमांकः- अमित मोरे

>1) अमित मोरे - नुसताच बर्फाचा आणि धुक्याचा फोटो न काढता त्याला एका लहान गरिब मुलाचि थीम. कॉम्पोझिशन आवडले.

२) द्वितीय क्रमांकः- तन्मय शेंडे
2.jpgSnow_1.jpg2) तन्मय शेंडे – जोरदार बर्फवृष्टी नंतरेची रम्य सकाळ, सुंदर घर आणि गोठवणारी थंडी कारण : टेकनिकली करेक्ट फोटो. रंगसम्गती आणि व्हाईट बॅलन्स

३) तृतिय क्रमांक: विभागुन देण्यात आलेला आहे .... गिरीश सावंत (भालचंद्र महाराज मठ) आणि दिपा_एस (झेंडा वंदन)

दिपा
3 deepa.jpg3) deepa_s - : थीम ला साजेसा फोटो. कॅप्चर केलेला मोमेंट. फडकलेल्या झेंड्यातुन पडनारी फुले पण दिसत आहेत.

गिरिश सावंत

4) गिरीश सावंत - सकाळचं प्रसन्न वातावरण मस्त टिपलंय. लाईट्स छान कॅप्चर केल्यात. कॉम्पोझिशन आवडले.
नियमः-

१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना) Wink
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला मी करतो सुरुवात Happy

देवळाली कॅम्प ची थंडी
.
आमच्या बंगल्या समोरचे दृश्य.. थंडी अगोदर चे...

-------------------------------------------------------------------------------------------

१ महिन्यानंतर थंडीचा जोर वाढल्यावर.....

-------------------------------

उदयन, अरे मार्कोपोलो ला विचार रे ज्युरी म्हणुन. मी अजुनही लर्निंग स्टेजला आहोत. Happy
पाहिजे तर, यात मी एकही फोटो टाकणार नाही. Happy

यात मी एकही फोटो टाकणार नाही >>>>>>>>> तुच रहा...आणि फोटो सुद्धा टाक...... Wink
.
.कुठे इथे कुणाला बक्षिस द्यायचे आहे Wink
.
.प्रोत्साहन म्हणुन ....मकर संक्रांतीच्या निमित्ताने.किमान आमचे फोटो जिप्सींनी निवडले म्हणुन गोड तर वाटु दे Wink

एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
>>>
पहिल्याच प्रतिसादात पहिल्याच नियमाचे स्वतःच उल्लंघन! Proud
ये बात कुछ हजम नही हुई!

पहिल्याच प्रतिसादात पहिल्याच नियमाचे स्वतःच उल्लंघन >>>>> अरे मीच नियम बनवले तर किमान जरा सुट नको का घ्यायला...... Wink
.
.

खर तर मी नियम नंतर लिहिलेले Wink

मार्कोपोलो ला विचार रे >>>>>>>> विचारणार होतो.... पण नंतर विचार केला की आपल्या कडे जेव्हा जिप्सी आणि शांग सारखी माणस आहेत तर....... श्रीगणेशा त्यांच्याकडुन करुया..........नंतर इतर परिक्षक जोडुया

थीम ठरवण्याचे काम जिस्पीला द्या आणि परिक्षणाचे काम सावली, बित्तुला द्या... त्यामुळे जिप्सीच्या फोटो टाकण्यावर बंधन येईल आणि इतरांचा फायदा होईल Wink

थीम ठरवण्याचे काम जिस्पीला द्या आणि परिक्षणाचे काम सावली, बित्तुला द्या>> +१

माफ करा मंडळी. कामाच्या व्यापात इकडे फिरकायला वेळ मिळाला नाही.

उदय, मी खरतर हौशी कलाकार आहे... अणि ज्युरी वगैरे बनण्याच्या स्टेज पसुन तर खुपच लांब.
म्हणुनच रोहन आणि इंद्रा ला माझे अनुमोदन. सावली, बित्तु, मार्कोपोलो हे जास्त जाणकार आहेत या क्षेत्रातले. त्यांना ज्युरी/जज बनवल्यास ते जास्त चांगले परिक्षण करु शकतिल.

ज्युरी वगैरे बनण्याच्या स्टेज पसुन तर खुपच लांब. >>>>>>>>> वाघमारे मी आपणाला विचारले नसुन सांगितले आहे......कृपया या कडे लक्ष असु द्या Wink Biggrin
.
.
सावली, बित्तु, चंदन करतील.>>>>>>> त्यांना वेळ असेल तर नक्कीच आम्हाला आनंद होईल

Pages