अमेरिका आणि भारत

Submitted by Mandar Katre on 12 January, 2013 - 13:12

कालच एका मित्राशी बोलताना अमेरिका आणि भारत यातील फरक याविषयी चर्चा झाली .अमेरिकस्थ माबोकर मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .तसेच भारतात राहणार्‍या /इतर देशात राहणार्‍या मंडळींनीही आपली मते मांडवीत.

मुख्यत: खालील मुद्दे हाताळावेत , अशी अपेक्षा आहे...

1. सरकार या संकल्पनेची व्याप्ती व मर्यादा. ...कार्ये आणि लोकांच्या अपेक्षा.

2. विचार-आचार स्वातंत्र्य liberty आणि त्याचे फायदे /तोटे

3. आर्थिक स्वातंत्र्य ,समानता आणि विषमता व त्याचे परिणाम

4. जगाकडे /इतर देशांकडे पाहण्याचा /व्यवहार करण्याचा दृष्टीकोण किंवा strategic policy

5. सुख-सुविधांची उपलब्धता किंव अडचणींचा अभाव असणे व त्याचा राहणीमान /lifestyle वरचा प्रभाव.

6. इतर मुद्दे.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकस्थ माबोकर मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .
<<
??

हाय्ला! तुम्ही पोच्ले नै वाट्टं अजून आम्रखंडात?

अमेरिकेतलं जगा आणि जगु द्या असं लोकांचं वागणं फार आवडतं. कोणी काय कपडे घातलेत? किती तोकडे? किती उघडे? घालणा-याचं वय काय वगैरेकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. मग शेरे मारणं दूरच.
ऐंशी वर्षांची आजी ब्युटीपार्लरमधे जाऊन मस्त हेअर कट करते. टकाटक कपडे, मेक अप करून खरेदीला जाते हे तर फारच आवडतं!!
कोणी कसं वागावं/ राहावं हे दुसरे ठरवत नाहीत!!!!! थोडक्यात व्यक्तिस्वातंत्र्य की जय हो! Happy
मी अमेरिकेत कायम राहणारी माबोकर नाही. पण इथे तीनवेळा येऊन हे पाहिलं ते लिहिलं.

फार चघळलेला विषय आहे, प्रत्येक संकेतस्थळावर, सर्व गप्पात चघळुन चोथा झाला आहे.