शोधतेय तुलाच प्रत्येकात !

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 January, 2013 - 11:05

एक कुंपण आखून घेतलयं स्वतःभोवती...
घुसमट, घालमेल, भिती
सगळ सगळ आतल्या आत !
संयत वाटते पाहणा-याला...
पण खर सांगू ?
आपलेच ओठ नि आपलेच दात !

एक करडी नजर ठेवतेय वागण्यावरती...
हसणं, बोलणं, वावरणं
सगळ सगळ आटोक्यात !
कौतुक वाटत आपल्यांना
पण खर सांगू ?
मीच हरवतेय या सगळ्यात !

रोज ओझं घेवून वावरतेय मनावरती...
अधु-या स्वप्नांच, ते जपण्याचं
सगळ सगळ बिनबोभाट !
सावरलीय वाटतेय सा-यांना
पण खर सांगू ?
शोधतेय तुलाच प्रत्येकात !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

कौतुक असे लिहिण्यासाठी kau टाईप करा (काल शिकारीचे औचित्य मधेही असेच झाले होते )
_______________________________
अवांतर :तो गर्दीचा शेर नाही तंद्रीचा शेर म्हणत होतो मी ...तो मला खूप आवडला होता प्लीज पुन्हा तो मूळ ....तंद्रीत मी! चा शेर कळवाल का सुप्रिया ताई प्लीज

धारदार कविता.
तुमच्या लेखनीत धार आहे. आणि तुमच्या कवितेचं ते सौंदर्यस्थान आहे.

नवीन पिढीतील माझ्या आवडत्या कवींमध्ये तुम्हाला स्थान आहे, ते कदाचित त्यामुळेच असावे.

लिहित रहा. तुमच्या लेखनीतून समग्र महिला समाजाची व्यथा प्रकट होत असते. त्यामुळे तुमची लेखनी अधिक व्यापकतेकडे सरकायला हवी, एवढी अपेक्षा.

धन्यवाद...! Happy

बागेश्री, वैवकु, chavansameerजी,भारतीताई, गंगाधर मुटेजी

मनःपुर्वक आभार!

कविता आवडली.

एक कुंपण आखून घेतलयं स्वतःभोवती...
घुसमट, घालमेल, भिती
सगळ सगळ आतल्या आत !
संयत वाटते पाहणा-याला...
पण खर सांगू ?
आपलेच ओठ नि आपलेच दात !

हे विशेष!

व्यक्त होत रहा! बस्स.. अजून काय सांगू?

आत स्फोट होतो नाहीतर एक दिवस! जे ठुसठुसतंय, जे खुपतंय ते बाहेर येऊ देत रहायचं!

रचना आवडली हे वेगळे सांगणे न लगे.

प्राजु ,
योगुली,
स्वाती आंजर्लेकर,
विदिपा,
निंबुडा...

<<<आत स्फोट होतो नाहीतर एक दिवस! जे ठुसठुसतंय, जे खुपतंय ते बाहेर येऊ देत रहायचं!>>> अगदी अगदी Happy

धन्यवाद !