अलंग - मदन - कुलंग ऑफबीट संगे

Submitted by पवन on 12 January, 2013 - 09:02

4 वर्षा पूर्वी ट्रेक ला सुरुवात केली तेंव्हा बरेच जण विचारायचे AMK केला का ? मी निरुत्तर व्हायचो
पण मी आज अभिमानाने सांगतो मी एकाच ट्रेक मध्ये AMK केला तीन दिवस सह्याद्रीच्या कुशीत AMK चा थरार अनुभवला .
25 ऑक्टोबर ला ऑफ बीट च्या राहुल खोत चा अगदी अचानक फोन आला AMK ला येणार का ?
तब्बल दोन दिवस सुट्टी मिळणे आणि एवढ्या अचानक महाकठीण .
हे दिव्य कसे तरी पार पडले .
को -ओर्डी नेटर म्हणून स्वताला अजमावण्याची पहिलीच संधी होती , तसे ट्रेक बरेच केले अरेंज देखील केले पण एका प्रोफेशनल ग्रुप सोबत
या को -ओर्डी नेटर च्या भूमिकेत करणे पहिल्यांदाच .
तसा माझा प्लान अचानक ठरल्या मुळे पुण्या वरून मी एकटाच होतो कोणी असेलच तर कसारा ला भेट होणारच होती .
रात्री 10:30 pm ला कल्याण गाठले राहुल हि वेळेत आला , पुण्यातून आलेला अम्या (अमेय जोशी ) याची कल्याण लाच भेट झाली .
कसारा लोकल 12.03 am ला होती, मी आणि राहुल्या खूप दिवसांनी भेटत होतो मग काय गप्पा चालू , अख्खा सह्याद्री फिरून आलो .
पदरगड ट्रेक कसा झाला , हरिश्चंद्रगड (नळीच्या वाटेने ) कसा झाला , राजगड - तोरणा - लिंगाणा -रायगड कधी करायचा वगैरे ..
ऑफ बीट चे सर्व 13 मावळे ठीक 03:00 am ला कसाऱ्यात भेटले तिथून खाजगी वाहनाने आंबेवाडी या गावी पहाटे 05:00 am ला पोहोंचलो .

1_0.jpg

गावात थंडी जरा जास्तच जाणवत होती . हिवाळ्यातला पहिलाच ट्रेक होता. गावात लखन नावाचा गावकरी आहे त्याच्या घरी थांबलो, मस्त चहा घेतला .
ऑफ बीट चा ब्रेक फास्ट (केक आणि पार्ले हैप्पी हैप्पी) भरपूर खाल्ला(पार्ले हैप्पी हैप्पी चा पंखा झालो). त्यानंतर ओळख परेड झाली आणि पहाटे 06:00 am च्या सुमारास आम्ही अलंग च्या बेचक्या कडे कूच केली .
गावकरी लखन आणि कैलास सोबत होतेच 3 दिवसाचे आमचे खाणे पिणे त्याच्या वर सोपवून आम्ही मोकळे झालो होतो.
गावातून अलंग - मदन - कुलंग चा त्रिकुट मस्तच दिसत होता . बाजूने छोटा कुलंग हळूच डोकावत होता ..पलंग मात्र मदन च्या मागे लपला होता .

1A.jpg

अलंग च्या जसे जसे जवळ जाऊ तसे तसे आम्हाला कुठल्या दिव्यातून जायचे आहे ते स्पष्ट होत होते .

2 तासाच्या चाली नंतर आम्ही अलंग च्या बेचक्यात पोहोंचलो तिथल्या गुहे मध्ये आमच्या स्याक टाकल्या , सगळ्यांनी आणलेला खुराक काढला .
मस्त ताव मारुन घेतला. स्याक इथेच ठेऊन पहिला मदन गड करण्याचा बेत होता कारण आजचा मुक्काम अलंग वर होणार होता आणि अलंग ची वाट या गुहे पासूनच होती .

3A.jpg

अलंग च्या त्या गुहे पासून उजवी कडे एक वाट मदन कडे जाते .

31_0.jpg

मदन च्या 45 फुट रॉक प्याच ला ल्याडर (दोरीची शिडी ) लावण्यासाठी मी आणि राहुल पुढे गेलो.
हा 45 फुट खडा प्याच खाली जवळपास 2000 फुट खोल दरी , एक चूक जीवघेणी ठरली असती , राहुल ने हा प्याच फ्री मारला, तो वरती जाई पर्यंत माझ्या अंगाचा थरकाप उडत होता . मी खाली आटेम्ट ला थांबलो होतो पण ...
राहुल अगदी सुरक्षित वरती पोहंचला . एक अस्सल क्लायंबर असल्याचे त्याने दाखवून दिले . मी फक्त बघतच राहिलो होतो.
मागुन राजस आक्खी टीम घेऊन तिथे आला , मग आमची खरी कसरत चालू झाली .हार्नेस घालून सर्व मावळे तयार होते त्या दोरीच्या शिडी वरून एक एक मावळा वरती जात होता राहुल एकटाच सेफ्टी साठी बांधलेली दोरी खेचत होता . मी आणि राजस एक एक मावळ्याला वरती चढवत होतो.

32_0.jpg

45 मिनिट च्या या कसरती नंतर आम्ही सर्व 13 मावळे एकदाचे वरती चढलो . मी आणि राजस ने अपेक्षे प्रमाणे तो प्याच बो लाईन वरच मारला . म्हणजे सेफ्टी साठी दोरी बांधली पण कातळाच्या खाचीत हात घालून वरती चढलो .गावाकडे आंब्याच्या झाडावर चढण्याची सवय आज पहिल्यांदा कामी आली . घरी आमराई आहे ना.
मदन चा माथा गाठण्यासाठी आणखी 30 मिनिट ची चढाई करावी लागणार होती . माथा गाठे पर्यंत पायरयाच आहेत .
पण त्या तुटलेल्या अवस्थेत , डाव्या हाताला डोकं बाहेर काढलेल्या भिंती आणि उजव्या हाताला सरळ २५०० - 3000 फुट खोल दरी , जीव मुठीत घेऊन आम्ही सर्वजन एकदाचे माथ्यावर पोहोंचलो .
आणि आजू बाजूचा परिसर बघून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला .

वरून अलंग खुजा वाटत होता,

6A.jpg5A.jpg

अलंग चे पठार नजरेच्या टप्यात होते, त्याच्या बाजूलाच भांडारदरयाचा अफाट जलाशय आणि खुट्टा - रतनगड सर्व कांही दिसत होते , पण कुलंग अजून उंचच उंच होता .

मदन गडाचा माथा तसा छोटा आहे , 2-3 पाण्याची टाकी आहेत. जानेवारी पर्यंत त्यात पाणी असते , एक गुहा आहे त्यात 50 जण आरामशीर झोपू शकतात. गड भ्रमंतीस 1 तास पुरेसा आहे .

4_0.jpg5_0.jpg

12:45 pm झाले होते , असे ऐकण्यात आले होते कि अलंग चा प्याच या पेक्षा मोठा आहे त्यामुळे वेळेचे भान राखून आम्ही परत फिरलो .

लोअरडाऊन , रयाप्लिंग करत 20-25 मिनिटात खाली आलो .

6.jpg8.jpg

अलंगच्या पहिल्या गुहे जवळ आलो त्यावेळेस 03:00 pm झाले होते .

अलंग ची सुरुवातच न्यारी आहे त्या गुहे जवळच एक 20 फुट रोंक प्याच आहे तिथे हि बरीच कसरत करावी लागली .

10.jpg

मी आणि राहुल तो प्याच चढून पुढे गेलो कारण अलंग चा मुख्य प्याच फ्री मारून वरून दोरी टाकायची होती .
अलंग चा तो प्याच तर एकदम 60 फुट सरळसोट कडा या वेळी राहुल ला तो प्याच फ्री मारताना पाहण्यासाठी बाकी मावळ्यांनी गर्दी केली होती .
सर्वच जण त्यास साक्षीदार होते . तो चढताना जे कांही डोळ्यांनी पहिले ते वर्णने अशक्य .

हा प्याच फ्री मारताना राहुल ची मी व्हिडिओ क्लिप तयार केली पण माहीत नाही कुठले बटन प्रेस केले क्लिप कांही सेव झाली नाही (सॉरी राहुल).
राहुल वरती गेला त्याने रोप आणि ती दोरीची शिडी खाली टाकली .

11.jpg12_0.jpg15a.jpg

मी लगेच वरती गेलो आणि बाकी मावळ्यांना वरती घेण्यास राहुल ला मदत केली .

13_0.jpg

वरती जागा अपुरी असल्यामुळे आणि पुढे तुटलेल्या पायऱ्या तिथे थांबण्यास हि जागा नव्हती म्हणून आम्ही वरती येणाऱ्या प्रत्येक मावळ्यास लगेच गडावरती जाण्यास पुढे पाठवत होतो.
साधारणता 01 तास हा कार्यक्रम चालला . अंधार पडत आला होता 06:00 pm झाले होते . मी आणि राहुल ने सर्व साहित्य प्याक केले आणि सर्वान्मागून गडावरती गेलो .

अलंग चे पठार खूपच विस्तीर्ण आहे . वरती गडाचे अवशेष म्हणाल तर 8 - 10 पाण्याची टाकी एक कोठी (मोठी ) आणि 2-3 गुहा आहेत .
त्यातील एकाच राहण्यायोग्य आहे. अंधार झाल्यामुळे आम्ही आराम करायचे ठरवले सकाळी लवकर उठून गड पाहण्यास जायचे ठरले .
गुहेत आणखी एक ग्रुप होता त्यांनी अगोदरच गुहेवर आपला हक्क दाखवला होता , तिथेच थोडी जागा करून आमचे मावळे सुस्त पडले .
गडावर एक हि झाड नाही त्यामुळे स्वयंपाकासाठी लाकूड फाटा खालून येतानाच आम्ही घेऊन आलो होतो (त्या शिवाय पर्यायच नाही ).

गावकरी लखन आणि कैलास आमच्या सोबत होतेच त्यांनी लगेच चूल मांडून स्वयपाक चालू केला
मस्त भात आणि मिक्स व्हेज (वांगी - बटाटी रस्सा ) बेत होता . सोबत सर्वांकडे आपापले डब्बे होतेच . सगळेच कसे जमून आले .
जेवणा नंतर सर्वांनीच ताणून दिली(झोपी गेले ) , पण आमचा खरा ट्रेक आता चालू झाला होता. ट्रेक म्हणजे तुसते चालणे,गड सर करणे, धाडस करणे नव्हे , तर ते शांत शीतल चांदणे अनुभवणे , गडावरील गार - गार वारा अंगावर झेलणे. सोबत आमच्या वाद विवादाची फोडणी तर आहेच , ट्रेकर्स ने हे करावे ते करावे (राजकारण ) (थोड्क्यात गड्वाटा सुरक्षित करण्याबाबत वगेरे...).
मस्त पैकी एका कातळावर जाऊन पहुडलो चांदणे बघत , तिरट , विंचू , शुक्र तारा बरेच कांही , आकृत्या तर बरयाच रेखाटल्या. त्यामुळे सर्वांचे बुद्धी कौशल्य कळून आले .
प्रसाद जोशी एक आद्य(अनुभवी) ट्रेकर, अभ्यासू व्यक्तिमत्व यांचे विचार ऐकायला मिळाले , कांही सूचना मिळाल्या . बरेच कांही शिकण्यास मिळाले .

सर्वांची चुळबुळ चालू झाली यावरून थंडी बरीच वाढल्याचे जाणवले .11 - 11:30 च्या दरम्यान गुहेत जाऊन आम्ही सर्वच जण (६ जण ) पहुडलो ..सकाळी त्या दुसरया ग्रुप च्या हालचाली वरून लगेच जाग आली कारण ते लगेच गड सोडत होते त्यांना मदन गड करून कुलंग मुक्कामी यायचे होते .
मग काय 05:00 लाच उठून इतर कृती उरकून मी आणि पियुष भल्या पहाटे गड भ्रमंतीस निघालो सुर्योदयापुर्वीच बराचसा गड पाहून हि झाला होता जसा जसा सूर्योदयाची जाणीव होत होती तस तसे आम्ही गडाच्या पूर्वेस कूच केली . मस्त सूर्योदय पाहण्यास मिळाला. मन अगदी तृप्त झाले ..
कळसुबाई , रतनगड , खुट्टा , भांडारदरा धरण असा आजूबाजूचा बराचसा प्रदेश न्याहाळून आम्ही परत फिरलो .

गडावर टाकी बरीच असल्या कारणाने पाणी मुबलक प्रमाणात आहे ..
सर्वजन फ्रेश होई पर्यंत आमची गड भ्रमंती झाली होती . आम्ही मग मस्त पैक्की चहा बनवून पीत बसलो . आमचा क्लायंबर राहुल ने हा ट्रेक अगोदर केला असल्यामुळे तो कांही गड भ्रमंतीस गेला नाही मग मी आणि राहुल बऱ्याच दिवसानंतर भेटल्याची कसर पुरी करत बसलो , मनसोक्त गप्पा
मारल्या , पुढच्या कित्येक ट्रेक चे प्लान केले .
बाकी मावळ्यांची गड्भ्रमांती झाली तसे एक एक जण गुहे कडे येऊ लागला , लगेच गड उतरायचा होता कारण तिथून आम्हाला कुलंग कडे चाल करायची होती .
कुलंग ला पोहचण्यास चाल बरीच आहे जवळपास 5-6 तास लागतात . मी आणि राहुल पुढे निघालो कारण खालच्या रॉक प्याच ला सेट तयार करायचा होता सर्वांना खाली उतरवायचे होते ना . उतरताना मस्त सगळे अगदी 20-25 मिनिटातच उतरले.

अलंग च्या आणि मदन च्या खोबणीतून अलंगच्या उजव्या बाजूस एक घळ उतरायची साधारणता 25 मिनिट . नंतर डाव्या बाजूस मलंग च्या खालून चालत राहायचे , जंगल खूप दाट आहे , कारवी खूपच वाढली आहे आता लखन आमचा म्होरक्या होता कारण वाट त्यालाच माहित होती . पावसाळ्या नंतर बहुतेक आमचा पहिलाच ग्रुप होता जो या वाटेने जात होता कारण वाट तसी अस्तित्वातच नव्हती लखन वाट तयार करतच निघाला , वाटेतच वनभोजन उरकून घेतले .

33.jpg

तशी चाल खूप मस्त आहे ,
मी तर म्हणतो अलंग पायथा ते कुलंग हा ट्रेक भर पावसात खूप मस्त होईल कारण वाटेत जवळपास 3 नाळ (अप्रतिम ) आहेत .

मदन चे नेढे तर अप्रतीम दिसत होते...

15.jpg

03:00 च्या सुमारास आम्ही कुलंग च्या पायथ्यास पोहोंचलो अजून 1:30 तास कुलंगची चढाई होती .. मावळे बरेच थकले होते . आणि अचानक पाउस चालू झाला खूपच मोठा इतका मोठा कि 5 चा मिनिटात आम्ही ओलेचिंब झालो . आडोसा घेण्यास हि आम्हाला उसंत मिळाली नाही . पावसाने कमाल केली जवळ पास 1 तास तो बरसतच होता . आता मावळ्याची चाल मंदावली होती
त्यात बिपीन(एक मावळा ) खूपच मागे राहिला होता आणि को -ओर्डीनेटर्स या नात्याने मला मागे राहून त्याला सोबत करणे हे माझे कर्तव्यच ..
ट्रेक ला मागे राहून सर्वांना मदत करणारा जरा जास्त दिवस जगेल असे माझे मत आहे कारण बऱ्याच लोकांचे आशीर्वाद मिळतात (तू होतास म्हणून मी वरती आलो वगैरे ..)..

आम्हाला रात्री शेकोटी साठी आणि जेवण बनवण्यासती खालूनच लाकूड घेऊन जायचे होते पण पावसाने घात केला .रस्ता निसरडा बनला इथे रिकाम्या हाताने चढणे शक्य नव्हते तिथे ब्यागेचे ओझे आणि लाकडे घेऊन कसे शक्य ...

कुलंग च्या पायऱ्या देखील खूप अवघड आहेत डाव्या बाजूस सरळ खोल दरी आहे .
एकदाचे 05:00 च्या सुमारास गडावर पोहोंचलो . वरती अगोदरच 2 ग्रुप ने येऊन गुहा बुक केल्या होत्या गड चढत आसताना दोन छोट्या गुहा लागतात पहिल्या गुहेत 5 मानसे आणि दुसरया गुहेत 10 माणसे आरामशीर झोपू शकतात
आम्ही तिथेच झोपण्याचा निर्णय घेतला . अंगावरचे आणि ब्यागेतले सगळे कांही भिजले होते. अंथरूण, कपडे वगैरे ... पण नेहमी प्रमाणे आमच्या सारख्या ट्रेकर्स ने ब्याग भरताना घेतलेली काळजी उपयोगास आली . आम्ही आमच्या कयारीबागेतून अंतरायाचे पांघरायचे काढून सगळे मिल बाटके घेतले..

लाकूड नसल्यामुळे शेकोटी तर सोडाच जेवण कसे बनवायचे हा यक्ष प्रश्न पडला होता कारण लाकूड आणण्यासाठी 30 मिनिट खाली उतरून जंगल तुडवून वाळलेले लाकूड शोधणे महाकठीण कारण नुकताच पाउस पडलेला .. शेवटी मी लखन , पियुष आणि कैलास ने जाऊन जेवण बनवण्या पुरती लाकडे आणली आमचा (ऑफ बीट चा ) आणखीन एक ग्रुप (फक्त कुलंग वारी करण्यास ) येणार होता तो पहाटे पहाटे आमच्यात सामील होणार होता सकाळी त्यांच्या नाश्त्याची सोय देखील करायची होती .
आमचे आद्य ट्रेकर प्रसाद जोशी सर यांनी त्यांचा अनुभव पणास लाऊन आम्हास मस्त पिठले - भात करून खाऊ घातला , विशेष म्हणजे तो बिगर मसाल्याचा मेनू इतका सही झाला होता कि बस ..आणि पोरांनी इतका खाल्ला कि त्याचे परिणाम अम्ही जागरण करणारे रात्रभर अनुभवत होतो ..
जेवण करून सगळे झोपी गेले आणि मग आम्ही ट्रेक चा खरा आनंद लुटण्यास बाहेर पडलो . गाण्याच्या भेंड्या , हिंदी गाणे मराठीत म्हणणे ,शिवाजीराजांचा इतिहास अश्या बऱ्याच गोष्टी वर चर्चा केली आणि तिथेच झोपी गेलो . भल्या पहाटे प्रीती (ऑफ बीट लीडर ) च्या आवाजाने जाग आली आणि आम्ही उठून गोंधळ घालण्यास चालू केला आम्हाला आमच्या आणखी 10 मावळ्याची कंपनी मिळाली होती .

मग काय लखन ला उठवले त्याला चहा करण्याची ओर्डर दिली आणि आम्ही पोहे बनवण्याची तयारी सुरु केली .त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली ..
थोड्याच वेळात आम्हाला आमची नवीन टीम येऊन मिळाली . मग काय रेडी टु इट फूड चा फडशा नुसता धिंगाणा चहा पोहे घेतले आणि आम्ही गाड्भ्रमंतीस निघालो .

22A.jpg16_0.jpg17.jpg

कुलंग हा कळसुबाई नंतर सर्वात उंच ठिकाण (पायथ्यापासून (समुद्र सपाटी पासून नव्हे )) आहे . वरून मदनगड आणि अलंग चा माथा खूपच मस्त दिसतो .

29_0.jpg30A.jpg

कुलंग च्या समोरच्या टोकाला गेलो कि कोकण कड्याचा भास होईल एवढा मोठा 'सी' आकाराचा
कातळ आहे. गडावर पाणी मुबलक प्रमाणात आहे जवळ पास 10-12 टाके आहेत .

30_0.jpg

आपले निसर्गमित्र....

28.jpg25.jpg

आणि एक बराच मोठा चौथरा आहे, तो इथे बरीच मोठी इमारत असल्याची जाणीव करून देतो . कुलंग च्या डाव्या बाजूला मदन गडाच्या कुशीत गिधाडांची घरटी आहेत .. गिधाडांच्या हवेत फिरण्याच्या उंचीच्या देखील आपण वरती आहोत या वरून आपण खरेच किती उंचावर
आहोत याची जाणीव होते .
2-3 तसा गड भ्रमंतीस पुरेसा आहे . 11 च्या सुमारास आम्ही गड सोडला वाटेत मस्त गाणी म्हणत आम्ही ऑफ बीट चे 22 मावळे गड उतरत होतो , इथे एका गोष्टी चा आवर्जून उल्लेख करावा असे वाटते ते म्हणजे आमची ग्रुप लीडर प्रीती हिने जवळपास 40 गाणी म्हणले
पण अगदी प्रामाणिक पने सांगतो मला त्यातली फक्त 2 गाणी च समजली कधीचे , कुठले गाणी म्हणत होती ती जाणे...पण ग्रेट गाणी ऐकण्यास मस्त होती.

3:00 वाजता आम्ही आंबेवाडी गाव गाठले जेवण करून परतीचा प्रवास सुरु केला .
मि प्रिति ला विचारले मगाशी तु कुठले गाणे म्हणत होतीस, तर ती म्हणाली मी गाणे म्हणत होते म्हनुन तर आपण चक्क ३ तासात आंबेवाडीत पोहचलो.. ही गाणे कुठ्ले म्हणते ते एक्ण्यासाठी सर्वजण तिच्या मागे पटापट चालत होते... म्हणजे ते गाणे कुठले ही असो, पण हा तिचा फुल प्रुफ प्लान होता लवकर गड उतरण्यासठी... ग्रेट...

एका पिकअप मध्ये तब्बल 22 जण , मग काय मज्जाच मजा .

26_0.jpg

तब्बल 3 दिवस निसर्गाच्या सानिध्यात , सह्याद्रीच्या कुशीत आणि तेही एका खूप अवघड ट्रेक ला , आनंद आनंद म्हणजे नेमका काय आसतो हे मला त्यावेळी माझ्याकडे बघूनच समजले ...आज 4 वर्ष झाली ट्रेक करतो आहे , ट्रेकिंग ला सुरुवात केल्यावरच या ट्रेक ची स्वप्ने पडू लागली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले होते .
भल्या भल्या ट्रेकर्स ची इच्छा असते एकदातरी हा ट्रेक करावा आज माझी इच्छा पूर्ण झाली होती . उगाचच सह्याद्री पाहून संपला कि काय असे वाटू लागले होते .
मनाशी एक खुणगाठ बांधली आहे एवरेस्ट सर करण्याची आज खऱ्या अर्थाने एवरेस्ट साठीची पहिली पायरी चढल्याची जाणीव होत होती ..
फक्त एकच खंत मनात राहिली होती ते म्हंजे भगवा फडकवता आला नाही वेळेअभावी तो घेताच आला नव्हता ..चला परत कधी तरी येऊ खास भगवा फडकावण्यासाठी कदाचित त्या निमित्ताने तरी हि वारी होईल ..

"हा ट्रेक कांही तरी नवीनच देऊन गेला मला , मनातली उर्मी जागवून गेला स्वावलंबन , प्रसंगावधान , ध्येयाशक्ती , निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला
पडून गेला . सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही आव्हानावर मात करण्याची इर्षा प्रेरित करून गेला . जगण्याचा एक वेगळाच अर्थ बहुदा मला लक्षात आला
ह्या ट्रेक मध्ये पाहिलेले एक एक दृश्य , जगलेला एक एक क्षण अजून सुद्धा ताजा आहे मनात.(रोहन चौधरी)".

मी हि हेच अनुभवतो आहे , या ट्रेक नंतर प्रत्येक ट्रेकर हेच अनुभवेल.

कांही आठवणी...

10A.jpg19.jpg20.jpg22.jpg23_0.jpg24.jpg27_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"हा ट्रेक कांही तरी नवीनच देऊन गेला मला , मनातली उर्मी जागवून गेला स्वावलंबन , प्रसंगावधान , ध्येयाशक्ती , निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला
पडून गेला . सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही आव्हानावर मात करण्याची इर्षा प्रेरित करून गेला . जगण्याचा एक वेगळाच अर्थ बहुदा मला लक्षात आला....................exlent

मी हि हेच अनुभवतो आहे , या ट्रेक नंतर प्रत्येक ट्रेकर हेच अनुभवेल.पूर्वी ट्रेक ला सुरुवात केली तेंव्हा बरेच जण विचारायचे AMK केला का ? मी निरुत्तर व्हायचो
पण मी आज अभिमानाने सांगतो मी एकाच ट्रेक मध्ये AMK केला तीन दिवस सह्याद्रीच्या कुशीत AMK चा थरार अनुअवा ऑफ बीट बोरोब्र्र offbet is very very good group

अरे वा चित्तथरारक चढाईचे सुंदर वर्णन आणि प्रचि पाहून मन दंग झाले.
चढाई आणि वर्णन दोन्हीही आवडले.

मी इथे "रोपवे" झाल्यावरच जाईन म्हणतो >>>> सहमत आहे!

मी इथे "रोपवे" झाल्यावरच जाईन म्हणतो ....

ट्रेकर्स ने हे करावे ते करावे (राजकारण ) (थोड्क्यात गड्वाटा सुरक्षित करण्याबाबत वगेरे...).

हे अशी आमची चर्चा नेहमी होते पण मनाला पटत नाही.

" ट्रेकिंग प्लेस चे पिकनिक प्लेस होण्याची भिती वाट्ते."

स्वराज्याची राजधानी रायगडाची आत्ताची अवस्था बघवत नाही.... सगळीकडे कचराच कचरा दिसतो...

मस्त रे पवन ... झक्कास लिव्हलयस .. Happy
अरे तुम्हाला ते हिरवे साप नेहमी कसे भेटतात ... आम्हाला एकदा सुद्धा दिसला नाही .

अलंग येथे लवकरच शिड्या लागणार आहेत आणि ह्यावर पुर्वीच इथे चर्चा झालेल्या आहेत. Happy त्या निर्णयाचे अनेकांनी, मी धरून स्वागत केलेले आहे.

एकच नंबर....

नवख्या ग्रुपबरोबर गेलो होतो फारा वर्षांपूर्वी. पायथाही सापडला नव्हता... Happy

हो.. तु तर रोपवे लावा असे म्हणत होतास.>>>>वरती वाचा रे नीट Wink मस्करीत म्हटलोय. "मी म्हणालो आणि लगेच रोपवे होणार" असं थोडी आहे. Happy

क्या बात है... आठवणी जागवल्यास मित्रा Happy

तिन्ही गडांची चढाई एक अविस्मरणीय अनुभव आहे. आम्ही तो फुरसत मधे घेतला आहे. कुलंग वरिल चांदणी रात्र आणि अलंग वरुन पाहिलेले चंद्रग्रहण केवळ अप्रतिम!

खतरनाक .. ट्रेक, प्रचि , वर्णन ... सगळच खतरनाक.

जबरी झालाय ट्रेक आणि वृत्तांत Happy

लय भारी !!

( मी ही अमकु केलाय ...पण फोटो पाहताना जितका डेन्जर वाततो तितक्या प्रत्यक्ष पाहताना वाटला नाही ...कदाचित आसपासच्या निसर्गाच्या इफ्फेक्ट मुळे असेल !!)

जबरी झालाय ट्रेक आणि वृत्तांत>>> +१० Happy
नवख्या ग्रुपबरोबर गेलो होतो फारा वर्षांपूर्वी. पायथाही सापडला नव्हता...>>>>> आसच काही तरी

झक्कास वर्णन केलंय या ट्रेकचं. आणि सगळे फोटोही मस्तच आहेत.

शनि-रविवारमध्ये सांदण आणि रतनगड केला तेव्हा हे तिन्ही त्रिकूट मलाही खुणावत होतं.

पुढल्या ट्रेकला बोलवायला विसरू नका. Happy

Pages