Submitted by Adm on 12 January, 2013 - 03:14
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन येत्या सोमवारपासून म्हणजे १४ जानेवारी पासून सुरु होते आहे. महिला आणि पुरुष एकेरीत अनुक्रमे व्हिक्टोरिया अझारेंका आणि नोव्हाक जोकोविक अग्रमानांकित आहेत. नदाल दुखापतीमुळे ह्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीये.
पुरुष एकेरीत जोको, फेडरर आणि मरे ह्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. द्वितीय मानांकित फेडरर साठी खडतर ड्रॉ आला आहे. फेडररचे डेव्हिडेंको, टॉमिक, रॉनिक, त्सोंगा आणि मरे ह्यांच्याशी सामने होण्याची शक्यता आहे.
महिला एकेरीत द्वितीय मानांकित शारापोव्हा वि व्हिनस विल्यम्स असा सामना तिसर्या फेरीत होण्याची शक्यता आहे. अझारेंका, सेरेना विल्यम्स, शारापोव्हा ह्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
हा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॅच सहीच झाली. ली ना पडली
मॅच सहीच झाली. ली ना पडली नसती तर जिंकली असती कदाचित.. पण अनफोर्स्ड एरर्स प्रचंड केल्या ली ना नी... त्यानेच फरक पडला...
मॅच सुरू... !!!!!!! पहातय का
मॅच सुरू... !!!!!!!
पहातय का कोणी ?
चांगलं खेळूनही चुकांमुळे
चांगलं खेळूनही चुकांमुळे पहिला सेट घालवला ज्योकोने.. !
ज्योकोविच जिंकला!!!!!! मस्त
ज्योकोविच जिंकला!!!!!! मस्त खेळला..काय जबरदस्त फटके आहेत त्याचे!
येस्स्स!!! ज्योको!!!!!!
येस्स्स!!! ज्योको!!!!!!
ज्योको भारी जिंकला !! मॅच ठिक
ज्योको भारी जिंकला !!
मॅच ठिक ठिक झाली.. पहिल्या सेटमध्ये ज्योकोने चुका केल्या, चौथ्यात मरेने.
दुसरा आणि तिसरा छान झाले. ज्योकोने मोक्याच्या वेळी पॉईंट मिळवले. दोघांनीही फोरहँड विनर्स भारी मारले. मरेचा गेम आधीपेक्षा खूपच सुधारला आहे एकंदरीत !
Pages