ऑस्ट्रेलियन ओपन - २०१३

Submitted by Adm on 12 January, 2013 - 03:14

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन येत्या सोमवारपासून म्हणजे १४ जानेवारी पासून सुरु होते आहे. महिला आणि पुरुष एकेरीत अनुक्रमे व्हिक्टोरिया अझारेंका आणि नोव्हाक जोकोविक अग्रमानांकित आहेत. नदाल दुखापतीमुळे ह्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीये.
पुरुष एकेरीत जोको, फेडरर आणि मरे ह्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. द्वितीय मानांकित फेडरर साठी खडतर ड्रॉ आला आहे. फेडररचे डेव्हिडेंको, टॉमिक, रॉनिक, त्सोंगा आणि मरे ह्यांच्याशी सामने होण्याची शक्यता आहे.
महिला एकेरीत द्वितीय मानांकित शारापोव्हा वि व्हिनस विल्यम्स असा सामना तिसर्‍या फेरीत होण्याची शक्यता आहे. अझारेंका, सेरेना विल्यम्स, शारापोव्हा ह्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.

हा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा आला का धागा! मस्तच!

मेलबर्न मधले वातावरण टेनिसमय झालयं! आजच लहान मुलांसाठी Kids Tennis Day होता. अपरिहार्य कारणामुळे जायला जमले नाही पण मेलबर्न पार्कवर मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम होता. डोरा, स्पाँजबॉब वगैरें होतेच पण खास लहानग्यांसाठी मानांकित टेनिसपटुंची एक मॅचही झाली.

यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपन आमच्या मित्रपरिवारासाठी खासच आहे. मुळचे चंद्रपुर येथील असलेले गिरीश आणि राजश्री राठोड यांचा १२ वर्षाचा मुलगा शशांक यंदाच्या मोसमात 'बॉलकिड' चे काम करतोय! शशांकने मागच्या वर्षी एप्रिलमध्ये 'बॉलकिड' साठी अप्लाय करेपर्यंत टेनिस कोर्टवर वेगात पळणारी, खेळाडुंना टॉवेल्/पाणी देणारी लहान मुले म्हणजे या स्पर्धा यशस्विरित्या पार पडण्यासाठी अथक काम करणारे 'बॉलकिडस' हेही आम्हाला माहित नव्हते. यंदा एकुण ३००० मुलांपैकी फक्त ३८० मुलांची निवड झाली आहे. सर्वप्रथम लेखी परीक्षा, मग तोंडी परीक्षा, प्रत्यक्ष मैदानावरचा वावर अशी अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर काही आठवड्यांचे ट्रेनिंग झाले की ही मुले मैदानावर येण्यास पात्र ठरतात. प्रत्यक्ष काम करत असतानाही त्यांचे प्रगतीपुस्तक ठेवले जाते! या सगळ्या दिव्यातुन शशांक यशस्वी झालाय. त्याचे आणि मुख्य म्हणजे त्याच्या आई-वड्लांचे अभिनंदन!

यावेळी एक दिवस तरी ग्राऊंड पास काढुन शक्य तेव्हढ्या मॅचेस/खेळाडु बघायचे आणि टीव्हीवर पण मॅचेस बघायच्या असे ठरवले आहे! मला टेनिसमधले खुप समजत नाही पण ह्या धाग्यावर बरीच माहिती मिळेल हे नक्की!

वत्सला सही ! बॉलकिड्स बद्दल सगळ्यांना उत्सुकता आणि कौतुक असते. शक्य असेल तर त्याने/त्याच्या पालकांनी काढलेले फोटो टाक इथे.

यावेळी एक दिवस तरी ग्राऊंड पास काढुन शक्य तेव्हढ्या मॅचेस/खेळाडु बघायचे >>>> नक्की बघा! फार धमाल येते. फोटो पण काढ भरपूर आणि डकव इथे.

काल ज्योकोची मॅच बघितली.. मस्त झाली.. ज्योको नेहमी सारखाच खेळला..
पोव्हा जोरदार जिंकली..
इव्हानोविक बाई पण चांगल्या खेळल्या.. अर्थात पुढच्या फेर्‍यांबद्दल भरवसा नाहीच..
हेविट आणि टिप्सारविच मॅच पण चांगली झाली... हेविट पूर्वीसारखा खेळत होता..
व्हिनसची मॅच पाहिली नाही पण ती ही सहज जिंकली..

डाटे काकूंनी ४२ व्या वर्षी विजय नोंदवून ऑ.ओ. मध्ये विक्रम केला.. !
(सगळ्यात वयस्कर विजयाचा विक्रम मार्टीना नवरातिलोवाच्या नावावर आहे... ४७ व्या वर्षी विंबल्डनमध्ये.)

सारा इर्रानी हरली पहिल्याच फेरीत ! गेल्या दोन तीन ग्रँडस्लॅम्समध्ये मस्त खेळली होती ती..

आजचा ज्योकोविच चा खेळ जबरद्स्त होता. बॅक हँड आणि फोरहँड एवढया ताकदीने मारलेले होते. he had all the angles and all the accuracy in the g ame. रायम हॅरीसनला वेळ पण मिळत नव्हता बॉल रीटर्न कराण्यासाठी. ज्या टॉप सीडनी ही मॅच बघीतली असेल त्यांनी नक्कीच धसका घेतलेला असणार.

शारापोव्हा ने सलग दुसरा ६-०, ६-० विजय मिळवला..!!! आता पुढच्या फेरीत व्हिनसशी मॅच..
व्हिनस पण दुसरी फेरी चांगली जिंकली..
ठोसर बाई हरल्या ! ठोसर बाईंच्या फॉर्म गेला का काय! जोको भारी खेळला.. ! आता तो आणि स्टॅपनिक पुढच्या फेरीत..
इव्हानोविक आणि जॅंकोविक ह्या दोन सर्ब एकमेकींविरुध्द खेळणार आहेत.. मधे त्यांची भांडणं झाली होती.. आता आम्ही मोठ्या आणि मॅच्युअर झालो आहोत म्हणे !

That kid was tired in the second set itself and the old man won easily in three sets..

ही इव्हानोविक कशी आहे!!!! दोन पॉईंट्स चांगले खेळून पुढच्या दोन ना अनफोर्ड्स एरर करते !! Uhoh

ओल्ड मॅनला म्हणं पुरे की आता.. Wink

हो ना फार खेचली शेवटी..
वावरिंका दमला.. स्ट्रेचिंगही करत होता बर्‍याचदा.. चांगलच झुंजवलं पण ज्योकोला..

२० व्या वर्षी जर टॉमीक सेकंड सेट मधे दमला असेल तर त्याने टॉप टेन रँकिग मधे येण्याची स्वपप्न बघु नयेत. निदान वल्गना तरी करु नयेत. his defeat was not as humiliating as harrison.

ना ली सेमी फायनलमध्ये !
शारापोव्हाने उपांत्यपूर्व फेरी फक्त ५ गेम्स गमावून गाठली आणि विक्रम केला !! आधीचा विक्रम मोनिका सेलेस (२ वेळा) आणि स्टेफी ग्राफचा नावावर होता.. ८ गेम्सचा..

फेरर पहिला सेट हरलाय !

काय पराग, काय म्हणताय?. कुठे असता हल्ली, अजिबात दिसत नाही ते. गाव बदलल की काय. ?आम्ही मजेत. बर चाललय. म्हणजे छानच की.

गाव नाही बदललं हो.. दोन्ही गावं आमचीच.. एका जरा गावात गुडघेदुखीची समस्या सुरु आहे.. पण वाटयत आता बरं.. दुसरी कडे जरा संकटं आली होती.. पण टळली ती ही..
तुमचं सुरुवातीला चालतच की छान ! पुढे बघू काय होतय..

Proud

अरे वा.. सुमंगलताई आलात का ? काय म्हणता.. ?

सेरेना हरली !!!!! स्लोन (?) स्टीव्हन्स कडून...
मर्‍या खेळतोय आता.

स्लोनच. सेरेनानं दिली का काय मॅच मैत्रीणीला? Happy पहिला सेट २५ मिनिटात घेतला होता मग मी झोपले कारण लवकर उठायचे होते..

Pages