ठाकला मृत्यू, तरी मस्तीत मी! (तरही गझल)

Submitted by सतीश देवपूरकर on 12 January, 2013 - 02:58

तरही गझल
ठाकला मृत्यू, तरी मस्तीत मी!
(आज आलो नेमका शुद्धीत मी!!)

ना पिताही प्यायलेला वाटतो....
कोण जाणे कोणत्या धुंदीत मी?

कोकणस्थी काय केली बायको....
जिंदगी जगलो किती शिस्तीत मी!

ना कुठे येणे, न जाणे ठेवले;
वागलो परक्यापरी वस्तीत मी!

मायबोलीचा अखाडा जाहला....
ह्यापुढे दिसणार ना कुस्तीत मी!

बिंबही माझेच अन् ज्योतीत मी!
सूर्य सुद्धा मीच अन् पणतीत मी!!

सारख्या तोंडावळ्यांचे कैकजण....
यायचा ना ओळखू गर्दीत मी!

सिद्धता देतील येणा-या पिढ्या!
शेवटी सिद्धांत वादातीत मी!!

मान तू किंवा भले धुडकाव तू!
एक आहे सत्य कालातीत मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीचा अखाडा जाहला....
ह्यापुढे दिसणार ना कुस्तीत मी!.....ऑ खरये का नक्की?

शेवटचे दोन चांगले जमलेत.......

कोकणस्थी काय केली बायको....
जिंदगी जगलो किती शिस्तीत मी!.. सूंदर

ना कुठे येणे, न जाणे ठेवले;
वागलो परक्यापरी वस्तीत मी!

क्या बात है

सर्वच शेर आवडले.

बिंबही माझेच अन् ज्योतीत मी!
सूर्य सुद्धा मीच अन् पणतीत मी!!

सारख्या तोंडावळ्यांचे कैकजण....
यायचा ना ओळखू गर्दीत मी!

सिद्धता देतील येणा-या पिढ्या!
शेवटी सिद्धांत वादातीत मी!!

मान तू किंवा भले धुडकाव तू!
एक आहे सत्य कालातीत मी!!

सुंदर शेर. Happy

आपली भाषा फार भावते.
साधे-साधे विचार त्यामुळे वेगळेच रूप घेऊन पुढे ठाकतात.
काही खटकणा-याही गोष्टी आहेत. असो, बरेच शेर आवडले.

ना कुठे येणे, न जाणे ठेवले;
वागलो परक्यापरी वस्तीत मी!

हा शेर फार आवडला Happy

धन्यवाद शामराव!
..ऑ खरये का नक्की?
ही आनंदात्मक प्रतिक्रिया म्हणायची की, चकीत झाल्याची?

ना पिताही प्यायलेला वाटतो....
कोण जाणे कोणत्या धुंदीत मी?

ना कुठे येणे, न जाणे ठेवले;
वागलो परक्यापरी वस्तीत मी!

>> दोन्ही शेरांमध्ये 'ना' असला तरी पहिल्या शेरातला 'ना' का कोण जाणे खटकतोय देवपूरकरसर.

सिद्धता देतील येणा-या पिढ्या!
शेवटी सिद्धांत वादातीत मी!!

मान तू किंवा भले धुडकाव तू!
एक आहे सत्य कालातीत मी!! >> आवडले हे शेर...

सफाईदार झाली आहे गझल