रस्त्याने जाता येता

Submitted by बेधुंद on 12 January, 2013 - 02:28

रस्त्याने जाता येता रोज दिसतात ती दुकाने
सुंदर सजावट आणी काचेची तावदाने

कधी तुला आवड्तात त्यात सजवलेली दागिने
मागतेसही कधी माझ्याकडे त्यातली काही प्रेमाने

पण नेहमीच दगा दिला मला या कमजोर खिशाने
तुही विसरुन जातेस लगेच सारे हसत मुखाने

फक्त बघत राहतेस सारे डोळेभरल्या आनंदाने
मीही चालत राहतो सोबत गुढ मुकपणाने

मला अबोल बघुन सारे बोलते तु नजरेने
सांगतेस मला ते काहि नको,फक्त तु रहा असाच सोबतीने

घेईन सारे प्रिय तुला जे ,सांगतो मिही हिमतीने
तुही दाखवतेस विश्वास मजवर सुंदरश्या मिठीने

बेधुंद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न छान आहे दागिने ऐव़जी आभुषणॅ वा दुस्ररा काहि शब्द , मी काहि फार कल्पक नाही