इतकच लागतं जगायला

Submitted by कविन on 11 January, 2013 - 11:14

तू म्हणालास,
"जपून ग!
घाटातली वाट, त्यात धुकं दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
तू सोबत आहेस ना?
मग कसलं धुकं आणि कसला घाट
सोबतीने करु की पार ही वाट"

तू म्हणालास,
"जपून ग!
जगणं म्हणजे नुसती,
अडथळ्यांची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
सोबत असण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी खचलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

जोड विजोड, रुप अनुरुपता
कळत नाहीत रे मला

अवघड वाटेवर
सोबतीने चालण्याचं वाण
मनापासून निभावतोय

हेच काय ते
ठावूक आहे मला

आणि विश्वास ठेव,
इतकच लागतं जगायला
बाकी काहीच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच्च...! तुला विश्वास बसणार नाही अगदी परवा म्हणजे अगदी प र वा च ह्या विषयावर बोलत होते नवर्‍याशी.. हाच टॉपिक.. त्यामुळे मलातरी थेटच रिलेट झालंय... छान मांडलीस.. Happy कविता विभागात हलव ना धागा..

धन्स ऑल Happy

@बागे Happy तुमची पण जुळी भावंडं/ बहिण भाऊ स्टेज आली काय? Wink (लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायकोच्या दिसण्यात्/वागण्यात्/बोलण्यात काही सिमिलॅरिटी दिसतात म्हणे त्याकरता आमचा (आमचा= आम्हा काही मित्र मैत्रिणींचा) हा बहिण भाऊ स्टेज डायलॉग ठरलेला आहे Proud

अग चुकून पडली इथे, पोस्ट केल्यावर लक्षात आलं पण तो पर्यंत दोन प्रतिसाद येऊन पडलेले. म्हणून हलवा हलवी केलीच नाही. त्यानंतर आज उगवतेय इथे Proud

आता हलवायची म्हणजे नुसता विभाग नाही ना बदलता येणार?

कविन | 17 January, 2013 - 02:02 नवीन
धन्स ऑल

@बागे तुमची पण जुळी भावंडं/ बहिण भाऊ स्टेज आली काय? (लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायकोच्या दिसण्यात्/वागण्यात्/बोलण्यात काही सिमिलॅरिटी दिसतात म्हणे त्याकरता आमचा (आमचा= आम्हा काही मित्र मैत्रिणींचा) हा बहिण भाऊ स्टेज डायलॉग ठरलेला आहे

प्रतिसादावर प्रतिसाद देणे चुकिचे आहे परंतु मुळ विषयाला धरुन आहे म्हणुन चान्स घेतो.

हरिभाई ठक्कर यांच्या कर्माचा सिध्दांत या पुस्तकात असे लिहले आहे.

पहिले २० वर्षे बायको नवर्याला हे आवडत किंवा आवडत नाही म्हणते
पुढची २० वर्षे नवरा बाय्कोला हे आवडत किंवा आवडत नाही म्हणतो.

त्यानंतर दोघांच्या आवडी निवडी यात फरक रहात नाही