गझल
कोणते आहे खरे अन् कोणता आभास आहे?
जे दिसे ते सत्य की, ज्याचा जिवाला ध्यास आहे?
काय हे पाहून सारे लोक भारावून गेले?
ही कुणाच्या वेदनांची मांडली आरास आहे?
आजही स्मरते.... मला तू भरवले होतेस आई.....
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे!
माझिया दारातही वृष्टी फुलांची काल झाली;
आज कळते त्या फुलांना निरनिराळा वास आहे!
नोंद इतिहासा! तुलाही घ्यायला लागेल माझी!
टाळता येणार नाही मी असा अनुप्रास आहे!!
सोसतो सुख त्याप्रमाणे दु:खही उपभोगतो मी;
ही मन:शांती नका समजू विनासायास आहे!
चेहरे सुकले फुलांचे, या दिशाही खिन्न झाल्या....
रंग नाही, गंध नाही, हा कसा मधुमास आहे?
माझिया श्रद्धेमुळे मी एवढा चालून आलो!
पांगळा असलो तरी पायांवरी विश्वास आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
ही मन:शांती नका समजू
ही मन:शांती नका समजू विनासायास आहे!<<< वा
आजही स्मरते.... मला तू भरवले होतेस आई.....
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे!<<< वा वा!
माझ्यामते 'अनुप्रास' मध्ये प्रा मधील प चा अर्धा भार नु वर पडतो.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
धन्यवाद भूषणराव! अनुप्रासचा
धन्यवाद भूषणराव!
अनुप्रासचा उच्चार कसा करतात समजले नाही!
खूप जुनी रचना होती ही.
अवांतर: तू अशावेळी अशी उजळू नको ........ही गझल पहाल का?
तुमचा प्रतिसाद वाचायला आवडेल, व आनंदयात्रींना लिहिलेल्या प्रतिसादावरील आपले मतही जरूर कळवा.
आमच्या दृष्टीने ते मौल्यवान असेल!
प्रा.सतीश देवपूरकर
माझिया दारातही वृष्टी फुलांची
माझिया दारातही वृष्टी फुलांची काल झाली;
आज कळते त्या फुलांना निरनिराळा वास आहे!...... अजिबात न आवडलेला शेर ..त्यातही अशी दुरुस्ती हवी.
माझिया दारामधे वृष्टी फुलांची काल झाली;
आज कळते त्या फुलांना निरनिराळा वास आहे!
कोणते आहे खरे अन् कोणता आभास
कोणते आहे खरे अन् कोणता आभास आहे?
जे दिसे ते सत्य की, ज्याचा जिवाला ध्यास आहे?
आजही स्मरते.... मला तू भरवले होतेस आई.....
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे!
हे शेर आवडले.
'वासाचा शेर आवडला नाही
'वासाचा शेर आवडला नाही !!
आजही ....पहिला घास आहे हे भावले नाही आईने भरवलेला जो म्पहिला घास अर्थ लावताना अपेक्षित आहे तो पहिला घास नेहमीच /हमेशा के लिये च पहिला असतो आज /उद्या /काल असे कसे असेल ?
या शेरात बदल हवा असे वाटले मग मी तो असा केला ................
भरवला होतास आई तू मला जो घास पहिला
आजही माझ्या स्मृतींना त्या दुधाचा वास आहे
न आवडल्यास /चिंतन चुकल्यास अवश्य निदर्शनास आणून द्यावे
गझल एकंदर आवडली
वैभव, तू ध्वन्यार्थ लक्षात
वैभव, तू ध्वन्यार्थ लक्षात घेत नाहीस असे दिसते

क्षमस्व !! मी फक्त गद्यार्थच
क्षमस्व !! मी फक्त गद्यार्थच लक्षात घेतला !

या शेराचा('शेराला' असे वाचू नये ;)) ध्वन्यार्थ आहे तरी काय म्हणायचा?? ...!!...??..!!
अरे, आई जीभ घास ह्या सगळ्या
अरे,
आई
जीभ
घास
ह्या सगळ्या प्रतिमा आणि प्रतिके आहेत.
शेर समजायला सुद्धा एक तबीयत असावी लागते.
प्रोफेसर, हलकेच घ्यावेत.
(No subject)
वरील दोन गझलकार मित्रांचे
वरील दोन गझलकार मित्रांचे प्रतिसाद पाहून देवपूरकरांच्या वतीने म्हणावेसे वाट्ते
हे पहा छळती कसे मज रोज माझे गझलभाई
अन् मला म्हणतात माझी ही गझल बकवास आहे
असो
वैवकुंनी सुचवलेला पर्याय तसा मूळ शेरापेक्षा बरा वाटतो आहे (वैयक्तिक मत)
अभिनंदन वैवकु !!
(................ त्यांनी निदर्शनास आणून दिले नसते तर आता आहे असाच शेर आवडून घ्यावा लागला असता त्यासाठी धन्यवादही!! )
धन्यवाद ! नवाच एक कुणीतरी
धन्यवाद ! नवाच एक कुणीतरी
कैलासराव! माझिया दारातही
कैलासराव!
माझिया दारातही वृष्टी फुलांची काल झाली;
आज कळते त्या फुलांना निरनिराळा वास आहे!...... अजिबात न आवडलेला शेर ..त्यातही अशी दुरुस्ती हवी.
माझिया दारामधे वृष्टी फुलांची काल झाली;
आज कळते त्या फुलांना निरनिराळा वास आहे!<<<<<<<
प्रथम आपले आभार मानतो आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
माझिया दारातही लिहिण्याचे कारण आमच्यावर झालेली फुलांची वृष्टी ही कामच्या ठिकाणी, बाहेर समाजात, मित्रमंडळांत, नातेवाईकांमधे, आमच्या यायच्या जायच्या वाटेवर इत्यादी ठिकाणीही झाली होती, तशीच राहतो त्या वास्तूपर्यंतही झाली होती! घरभर फुलेच फुले झाली होती, इतकी की, दारपर्यंत फुलेच फुले होती....इत्यादी!
आपण लोक परत आमची फिरकी घेणार हे माहीत असूनही शेराचा ध्वन्यार्थ/मथितार्थ आम्ही उलगडून दाखवणार आहोत, जे हा शेर आपणास आवडावा म्हणून नव्हे तर आमची चिंतनशैली/प्रक्रिया व्यक्त व्हावी
म्हणून!
इथे फुलांची वृष्टी म्हणजे आमच्यावर झालेला अभिनंदनाचा वर्षाव! जो चोहीकडून झाला होता!
पण काल झालेल्या या फुलांच्या/अभिनंदनाच्या वृष्टीचा आज जेव्हा नीट विचार करतो तेव्हा आम्हास निरनिराळ्या भावभावनांचा वास येवू लागतो! म्हणजे काही लोक मनातून खट्टूच होते आमच्या यशस्वितेमुळे पण केवळ एक उपचार म्हणून (नाइलाजाने) आमचे अभिनंदन करायला आले!
काही आमच्या खुर्चीच्या दबावामुळे, काहीजण केवळ पुढेपुढे करण्यासाठी आले फुले घेवून, काही जण छद्मीपणे आले इत्यादी. या सर्व भावभवनांना आम्ही फुलांचे निरनिराळे वास असे म्हटले! असो.
कैलासराव.......हे आम्ही आताच/नुकतेच आयुष्यात अनुभवलेले सत्य आहे, जे परमेश्वराने आम्हास दाखवून दिले! मोठ्या खुर्चीने आम्हास ब-याच गोष्टी शिकविल्या हे मात्र खरे!
प्रा.सतीश देवपूरकर
धन्यवाद विजयराव!
धन्यवाद विजयराव!
बरेच शेर आवडले !
बरेच शेर आवडले !
नोंद इतिहासा! तुलाही घ्यायला
नोंद इतिहासा! तुलाही घ्यायला लागेल माझी!
टाळता येणार नाही मी असा अनुप्रास आहे!! >>> सुंदर
आजही स्मरते.... मला तू भरवले
आजही स्मरते.... मला तू भरवले होतेस आई.....
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे! >>> फार च सुंदर
आजही स्मरते.... मला तू भरवले
आजही स्मरते.... मला तू भरवले होतेस आई.....
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे!>>> अति सुंदर
श्री वैभव वसंत कुलकर्णी(?)
श्री वैभव वसंत कुलकर्णी(?) /माजी क्ष.य.ज्ञ./ माजी/आजी ह.भा/?/?/?/?/?...............इनफिनिटी,
महोदय, आपला प्रतिसाद वाचला!
काही गोष्टींचा खुलासा करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो!
'वासाचा शेर आवडला नाही !!<<<<<<
कृपया कैलासरावांना लिहिलेले स्पष्टीकरण डोळ्याखालून घालावे म्हणजे आमचा मानस/मासिकता हा शेर लिहिण्यामगची समजावी.
आजही ....पहिला घास आहे हे भावले नाही आईने भरवलेला जो म्पहिला घास अर्थ लावताना अपेक्षित आहे तो पहिला घास नेहमीच /हमेशा के लिये च पहिला असतो आज /उद्या /काल असे कसे असेल ?
या शेरात बदल हवा असे वाटले मग मी तो असा................
भरवला होतास आई तू मला जो घास पहिला
आजही माझ्या स्मृतींना त्या दुधाचा वास आहे
पर्यायी शेर भावला नाही. क्षमस्व!
दुधाचा घास म्हणत नाहीत!
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे म्हणजेच त्या घासाची चव जणू अजूनही रेंगाळत आहे म्हणणे वेगळे व आईने भरवलेल्या पहिल्या घासाच्या दुधाचा वास म्हणणे वेगळे!
इथे पहिला घास म्हणजे आईने पहिल्यांदा पाजलेले दूध असा काहीबाही अर्थ आपण गृहीत धरलेला दिसत आहे. अशा अन्वयार्थात मूळ चूक हीच आहे की, दुधाचा घास अशी अकलात्मक कल्पना करून घेतलेली दिसते!
घासाच्या स्मृती म्हणण्यापेक्षा तो घासच जिभेवर आजही असणे म्हणणे यात आम्हास जास्त काव्य दिसते! असो.
आपण दिलेल्या पर्यायी शेरात मूळ शेरातील भावविवशता दिसत नाही, उलट चुकीच्या प्रतिमांचा अकलात्मक वापर व कृत्रीमता स्पष्ट जाणवते
एक सोपी चाचणी सुचवतो...........
घासाचा आमचा मूळ शेर व आपण सुचलेला शेर कोणत्याही परिपक्व व सहृदयी रसिकांस ऐकवावे, उत्तर आपणास निश्चित मिळेल!
गझल एकंदर आवडली<<<<<<हे म्हणजे आमचे अहोभाग्यच म्हणायचे!
ध्वन्यार्थ आहे तरी काय म्हणायचा?? ...!!...??..!!
वरील स्पष्टीकरण वाचूनही शेराने केलेला ध्वनी जर ऐकू येत नसेल तर काव्यात्मक कानयंत्राची आपणांस नितांत गरज आहे असे आम्हस तरी वाटते!
टीप: एक नावाचे कुणीतरींकडून पाठ थोपटली जाणे व म्हणून त्यांचे आपण केलेले अभिनंदन हे आपली व त्यांची दोघंची अभिरुचीच प्रकट करतात!
............प्रा.सतीश देवपूरकर आणि फक्त प्रा.सतीश देवपूरकर
टीप: एक नावाचे कुणीतरींकडून
टीप: एक नावाचे कुणीतरींकडून पाठ थोपटली जाणे व म्हणून त्यांचे आपण केलेले अभिनंदन हे आपली व त्यांची दोघंची अभिरुचीच प्रकट करतात!<<<
प्रा.सतीश देवपूरकर आणि फक्त प्रा.सतीश देवपूरकर<<<
धन्यवाद महेशजी, प्रसादपंत!
धन्यवाद महेशजी, प्रसादपंत!
भूषणराव!
भूषणराव!
कैलासराव! अजिबात न आवडलेला
कैलासराव!
अजिबात न आवडलेला शेर .<<<<<<<
फक्त एकाच शेराचा उल्लेख केलात, याचा अर्थ बाकीचे शेर आवडले, की थोडेसे आवडले की थोडेसे नावडले?
नेमके काय?
आमचे वरील स्पष्टीकरणावर काहीच वदला नाहीत, की ते सुद्धा वरीलच सदरात मोडते असे समजायचे?
प्रा.सतीश देवपूरकर
हे काय आहे हर्षवायू की काय ?
हे काय आहे हर्षवायू की काय ?
चूक! ओळखा पाहू वरील
चूक!
ओळखा पाहू वरील भावमुद्रेचा अर्थ!
बाकीचे शेर चांगले आहेत.
बाकीचे शेर चांगले आहेत. आवडले.
एक सोपी चाचणी
एक सोपी चाचणी सुचवतो...........
घासाचा आमचा मूळ शेर व आपण सुचलेला शेर कोणत्याही परिपक्व व सहृदयी रसिकांस ऐकवावे, उत्तर आपणास निश्चित मिळेल!>>>
परिपक्व व सहृदयी रसिकाची व्याख्या काय तुमची प्रोफेसर? का तुम्हाला काही नाव पण सुचवायचे आहे?
धन्यवाद कैलासराव! हुश्श!
धन्यवाद कैलासराव!
हुश्श!
प्रसादपंत! परिपक्व व सहृदयी
प्रसादपंत!
परिपक्व व सहृदयी रसिकाची व्याख्या काय तुमची प्रोफेसर? का तुम्हाला काही नाव पण सुचवायचे आहे?<<<<<<<
ज्याने त्याने आपापले ठरवायचे!
आम्ही कोण ठरवणारे आणि सुचवणारे बाबा?
परिपक्व व सहृदयी रसिकाची
परिपक्व व सहृदयी रसिकाची व्याख्या काय तुमची प्रोफेसर? का तुम्हाला काही नाव पण सुचवायचे आहे?<<<<<<<
ज्याने त्याने आपापले ठरवायचे!
आम्ही कोण ठरवणारे आणि सुचवणारे बाबा?>>> मला समजता का तुम्ही परिपक्व व सहृदयी रसिक?