हवाई बेटांविषयी माहिती हवी आहे

Submitted by सानिका on 10 January, 2013 - 17:07

फेब्रुवारीमध्ये हवाईला जायचा बेत आहे. १ आठवडा तिथे राहणार आहोत. Oahu, Kaui, Maui, Big Island ह्यापैकी नक्की कुठे कुठे जावं ते ठरविण्यासाठी माहिती हवी आहे. मायबोलीकरांपैकी कोणाला अनुभव असल्यास इथे शेअर कराल का? ईतर ब्लॉग वर काही अनुभव असल्यास प्लीज शेअर करा ना.

(१) होस्टेल (हॉटेल नाही ) मध्ये राहायचा विचार करतोय. कारण तिथे सुसज्ज किचन असतं. बाहेरचं सलग ८ दिवस नाही जेवू शकणार. तसंच हॉटेल आणि जेवण-खाणं महाग आहे. त्यावर जास्त पैसे खर्च करायची इच्छा नाही. या आधी होस्टेल मध्ये राहिलो आहोत. खूप चांगला अनुभव होता. कोणाला हवाईच्या होस्टेलचा अनुभव असल्यास प्लीज सांगा.
(२) ज्वालामुखी नक्की बघायचा आहे.
(३) मुलगा ४ वर्षाचा आहे. त्याच्यासाठी "must see" असं काही आहे का?
(४) ८ दिवसांमध्ये २ किंवा ३ बेटांवर जाणं जमेल का? कि खूपच हेक्टीक होईल?
(५) snorkeling केले आहे का कोणी? माझी खूप इच्छा आहे पण पाण्याखाली जायचं म्हणजे भीती वाटत्ये.
(६) इतर काही "must see" जागा असल्यास जरूर सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होस्टेलवर रहायचा काहीच अनुभव नाही. त्याबद्दल वाचायला/ऐकायला आवडेल. विशेषकरून लहान मुले असलेल्यांसाठी होस्टेल सुट होत का? मला वाटत होतं की फक्त बॅकपॅकर्स किंवा सडेफटिंग लोकच असे राहतात.

हवाई बद्दल जनरल माहिती - हे मा वै मत.
Oahu - very typical city life, big malls, buildings etc. गर्दी जाणवते बर्‍यापैकी.
Big Island - कोकणासारखं छान वातावरण. बैठी घरं, निवांत खेडं असल्याचा एक फील. रात्री भीती वाटू शकते. Happy
Maui - good mix of both. आता फार कमर्शिलाईझ झालंय असं वाटतं. पण प्रचंड सुंदर आहे. हाना भाग तर खरंच अजून निर्मनुष्य वाटतो.
Kaui - मी पाहिलं नाही पण मैत्रिणीचे फोटो पाहिलेत. सुंदरच आहे. Better version of Maui - untouched beauty etc. वाटतं. अजून टुरिस्टांनी घाण करायला सुरुवात केली नाहीये बहुतेक. Wink

यावरून तुम्हाला काय बघायची इच्छा आहे तसं ठरवा.
ज्वालामुखी नक्की बघा. पण परत येताना बॅटरी घेऊन जा. त्या ताज्या ताज्या लाव्हा दगडातून अंधार पडल्यावर बिना टॉर्च वाट काढणं मजा असतं. Happy
मुलासाठी Maui Ocean Aquarium बघाच. आणि snorkeling पण करा. अथांग समुद्रात सगळीकडे निळाई पसरलेली असताना पाण्याखाली रंगीबेरंगी मासे, प्रवाळ बघणं मस्त अनुभव असतो.

सानिका, ईस्ट कोस्ट वरुन जाणार आहात तर पहिले २ दिवस जेट लॅग राहिल याचा विचार करुन प्लॅनिंग करा. ५ तासांचा वेळेत फरक आहे. माझ्या मुलाला २-३ दिवस लागले होते अ‍ॅड्जस्ट व्ह्यायला.आम्हि ८ दिवस फक्त एकाच आयलंड ची ट्रिप केलि होति - माऊइ ची. तिथे तुम्हाला प्रायव्हेट बंगले रेंट ने मिळतिल. ते चांगले पडतिल. होस्टेल चा अनुभव नाहि. आम्हि Maui च्या कापालुआ एरियात थोडे दिवस आणि किहेइ एरियात थोडे दिवस राहिलो होतो. मुलगा लहान होता म्हणुन स्नॉर्कलिंग नाहि करता आले. पण तरिहि बघण्यासारखे खूप आहे.
हालेआकाला चा सनसेट /सनराइझ बघा.वाएलिया/माकेना एरिया मधे बेस्ट बिचेस आहेत माउइ चे.हाना ची ड्राईव्ह आहे - १ दिवस लागेल, हाना मधे एक रात्र राहु सुद्धा शकता. एक संध्याकाळ लुआउ नक्कि बघा- हवाई कल्चर छान वाटते बघायला.कापालुआ एरिया सुद्धा छान आहे शांत आहे. एक दिवस मोलोकिनि आयलंड ची ट्रिप घेवु शकता ग्लास बोट मधुन. कानापल्लि,लाहाएना एरिया मधे बरेच commercialize झाले आहे.काहुलुई एरियामधे सगळ्या अमेरिकन चेन मिळतिल -वालमार्ट, पिझ्झा हट ...
अजुन काहि माउइ ची माहिति हवि असेल तर नक्कि देवु शकेल. बाकी आयलंड्स चा अनुभव नाहि.

धनश्री, प्रिया७ धन्यवाद ...
तुम्ही सांगितल्या प्रमाणे Maui आणि Kaui ला जायचे ठरवतोय. तुमच्या माहितीचा खूप उपयोग होईल सगळं plan करायला.
ज्वालामुखी सध्या सक्रिय नाहीये म्हणे. त्यामुळे तिथे नाही जाणार.बाकी काय काय ठरवतोय ते अपडेट करीन.
जेट लॅग चा मुद्दा आम्ही विचारातच घेतला नव्हता. बघूया कसं काय जमतंय ते.
गौरांग तुम्हालाही धन्यवाद...मला गरज पडल्यास नक्की मेल करीन.

सानिका,

मुलासाठी सबमरीन राईड करा. माउई ला लहाईना वरुन असते ती सर्वात बेस्ट आहे.
माउई ला शुगरकेन ट्रेनची राईड पण चुकवू नका

मलाही oahu पेक्षा Maui जास्त चांगलं वाटलं. oahu खूप गजबजलेलं वाटलं.माऊईच्या रिसॉर्टची जागा फार भारी होती. एकदम ओशनफ्रंट. ते जास्त आवडलं. अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये पॅरासेलिंग, जेट स्की, ATV आणखी काहीतरी केलं होतं. तो अनुभवही छान होता. सबमरीन राईड छान होती. बाकी डिटेल्स खूप आठवत नाहीत.