Submitted by सुप्रिया जाधव. on 10 January, 2013 - 05:51
संभ्रमांचे घोट गेले पीत मी
आज आले नेमकी शुद्धीत मी
'त्या' क्षणाला होय की नाही म्हणू?
प्रश्न गहिरा, अडकले कात्रीत मी
लाजण्याचा अर्थ तू समजून घे
पाळते अवघ्या जगाची रीत मी !
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी
'मृगजळाचा ध्यास हा नाही बरा'
विसरले !... होते जरी घोकीत मी
एकदाची सापडू दे मी मला
हरवले आहे पुन्हा गर्दीत मी
प्रेयसी, पत्नी, सखी की 'निर्भया'
नेमकाली कोणत्या यादीत मी ?
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदाची सापडू दे मी मला हरवले
एकदाची सापडू दे मी मला
हरवले आहे पुन्हा गर्दीत मी<<<
अब ये शेर बहोत अच्छा लगने लगा है.
कभी शायर खुदको अलगसे समझमे आता है तो कभी सुननेवालेको शायर! गझलका मझा इसीमे है!
जाळले 'बेफिकीर' हिंदूंनी
शायरी तेवढी दफन केली
या मक्त्याचा अर्थ आता रसिकांच्या ध्यानी यावा अशी विनम्र अपेक्षा!
-'बेफिकीर'!
कभी शायर खुदको अलगसे समझमे
कभी शायर खुदको अलगसे समझमे आता है तो कभी सुननेवालेको शायर! गझलका मझा इसीमे है!
<<< + १००
आवडली!! मस्त !!
आवडली!! मस्त !!
व्वा! फारच सुंदर!
व्वा! फारच सुंदर!
वा! सगळेच शेर उत्तम.
वा!
सगळेच शेर उत्तम.
चांगली गझल.
चांगली गझल.
छान
छान
<<<<कभी शायर खुदको अलगसे
<<<<कभी शायर खुदको अलगसे समझमे आता है तो कभी सुननेवालेको शायर! गझलका मझा इसीमे है!>>>>
<<<<गझलका मझा इसीमे है!>>>>
सही फरमाया.....गझल का मकसद भी यही तो है !
शुक्रीया !
धन्यवाद मंडळी .
<<<लाजण्याचा अर्थ तू समजून
<<<लाजण्याचा अर्थ तू समजून घे
पाळते अवघ्या जगाची रीत मी !
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी>>>
गजलियत गजलियत म्हणतात ती काय; ते या द्वीपदी वाचल्यावर समजते !!
खूप छान.
खूप छान.
याचसाठी हात मी धरला
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी
..व्वा... मतला ही खास ताई
छान.. आवडली..!
छान.. आवडली..!
Pages