दत्ता दिगंबरा.. गाणे

Submitted by प्राजु on 10 January, 2013 - 00:40

ब्रह्मा विष्णू आणि महे-श्वराच्या अवतारा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..

अनूसयेचा बालक तू अन जगताचा कैवारी
तीन मुखे अन सहा करांची, मूर्त दिसे साजरी
तेजस कांती, श्यामल डोळे, करुणेच्या सागरा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..

गाय -वासरु उभे समोरी, श्वान बैसले चरणी
कृष्णाकाठी वास तुझा अन प्रत्यय क्षणोक्षणी
नामस्मरणे पावन केले देहाच्या मंदीरा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..

वैरागी तू, योगीराज तू, विश्वाच्या नाथा
उत्पत्ती, अन स्थिती-लयाची गावी मी गाथा
भास तुझे बघ होती मजला जळी स्थळी अंबरा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा...

-प्राजु

संगीत : अमेय मुळ्ये, गायक : अभिजीत राणे

ईथे ऐका

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांज पेटवून गेला ... खूप सुंदर झालंय.. भैरवी ना?

दिगंबराचे .. गायन छानै... म्यूझिक अरेंजींग नाही आवडले.. मूड ठेवता नाही आलेला.

विघ्नविनायक पण छान आहे.