टेबल नंबर २१- थरारक

Submitted by सुजा on 9 January, 2013 - 12:22

"टेबल नंबर २१ ?. हे कसलं नाव?. सिनेमाच नाव कस आकर्षक पाहिजे .नावावरूनच बघावासा वाटला पाहिजे ".अशी माझ्या सारखीच सगळ्यांची प्रतिक्रिया होत असणार. नक्की .पण बघितलाच पाहिजे..तलाश पेक्षा सुद्धा भारी आहे इ इ मला सांगितलं गेल्याने सिनेमाला गेले आणि मनात विचारांची खळबळ घेऊनच बाहेर आले. नावावरून काहीच न समजणारी पण जर कोणी विचारलं काय आहे या फिल्म मध्ये बघण्यासारख ? तर उत्तर असेल काय नाही बघण्यासारख . सिनेमाटोग्राफी / संवाद /डिरेक्शन / फायटिंग/स्पेशल इफेक्स या सगळ्या दृष्टीने आपण ( बॉलीवूड ने )खूप भरारी मारली आहेच .पण विषयाच नाविन्य /विषयामधली विविधता या बाबतीत आपण बरेच पाठी आहोत अस कुठे तरी जाणवत होत . पण २०१२ मधे आलेल्या हिंदी सिनेमाकडे दृष्टीक्षेप टाकला तरआत्ता हे चित्र बदलायला लागल आहे.नक्कीच टेबल नंबर २१ मध्ये हेच आहे विषयाच नाविन्य आणि उत्कृष्ट सदिरीकरण Happy
आता टेबल २१ विषयी
विवान आणि सिया या कपल ला फिजी बेटाची फ्री ट्रीप मिळते /ते फिजी बेटावर जायला निघतात आणि सिनेमा सुरु होतो . दोघेही फिजी बेटावर पोचतात . त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच गिफ्ट म्हणजेच ही फिजी बेटाची ट्रीप असते. ट्रिप परेश रावल नी स्पोन्सार केलेली असते. त्या निमित्ताने परेश रावल ची एन्ट्री होते .आणि सुरु होतो एक थरारक गेम शो. परेश रावल त्या दोघांना एक रियालिटी फ्री गेम ची ऑफर देतो जो गेम जिंकल्यावर त्यांना २१ करोड रुपये मिळणार असतात. विवान ची नोकरी गेलेली असते त्यामुळे त्यांना पैशाची जरुरी असतेच.अशा परिस्थितीत ते त्या गेम शो ची ऑफर स्वीकारतात. त्यांच्या कडून कॉनट्रक साईन करून घेतलं जात/नियम समजावले जातात आणि खेळाची सुरवात होते. श्वास रोखून धरणाऱ्या खेळाची सुरवात . विवान आणि सिया ज्या वेगाने त्या गेम मध्ये गुरफटत जातात त्याच वेगाने प्रेक्षकही गुरफटत जातात. आणि पुढे काय पुढे काय ?. सिनेमा सस्पेन्स असल्याने त्याचा शेवट मी सांगणार नाही .पण जरूर जरूर बघण्यासारखा सिनेमा आहे एवढ मात्र नक्कीच सांगेन. सगळ्यांनी एकदा तरी पहिलाच पाहिजे असा.
परेश रावल च्या अभिनयाबद्दल वादच नाही . तो आहे म्हणून लोक हा सिनेमा पहायला जातील. पण राजीव खंडेलवाल आणि टीना देसाई यांची पण कामगिरी तितकीच आश्वासक आहे. राजीव खंडेलवाल ला आपण आमिर ( २००८) मध्ये कदाचित बघितलं असेल. जर हटके फिल्म्स असतात त्याच्या आणि टीना देसाईचा कदाचित हा पहिलाच सिनेमा असावा. पण तिच्या अभिनयात अजिबात नवखेपणा नाहीये. सिनेमाची पकड कुठेही सुटत नाही .सिनेमाचा शेवट तर खूपच विचार करायला लागणारा आहे / चकित करणारा आहे .अमिरचा "तलाश" जसा एक सस्पेन्स सिनेमा म्हणून आपण बघितला तसाच एक सस्पेन्स थ्रिलर म्हणून या सिनेमाला पण प्रेक्षकांनी दाद दिलीच पाहिजे . तरच या नवीन नवीन बुद्धिमान लोकांना काहीतरी वेगळ आणि चांगल देण्याचा हुरूप येईल. सिनेमाच डिरेक्शन "आदित्य दत्ता" च आहे. एकदम नवीन आणि फ्रेश डिरेक्टर. . तेव्हा लोक हो टेबल २१ ला जरूर भेट द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लिहील्या बद्दल सुजा. मलाही बघायचा आहे. मी ही आमिर बघितला आहे, खंडेलवालचे काम खुप काही भारी नाही वाटलं पण सिनेमा बघायला आवडला. नक्की बघणार. Happy

मस्त आहे सिनेमा. आवडला.

परेश रावलसाठी बघितला. पण एकूण सिनेमाही आवडला. नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा.

मुख्य म्हणजे सिनेमाच्या शेवटी सगळी उत्तरे मिळतात. सगळॅ धागे जुळून येतात.

खंडेलवाल हा अभिनयासाठी बेताचा अक्टर आहे. पण "आमिर" विषयाच्या नाविन्यासाठी वेगळा सिनेमा होता . तसाच हा पण आहे. विषयांच नाविन्य/ विविधता याचा बॉलीवूड मध्ये बर्यापैकी दुष्काळ आहे किव्वा होता . पण आत्ता हळू हळू चित्र बदलायला लागल आहे. सस्पेन्स विषय हाताळणं खूप कठीण काम आहे. आणखीन एक मला चांगली गोष्ट वाटली कि सिनेमाचा सह संवाद लेखक एक मराठी मनुष्य आहे माझ्या मते अभिजित देशपांडे Happy मी नताशा म्हणते तस एक एक सगळे धागे जुळवून आणण अप्रतिम . आणि शेवट तर भलताच अनपेक्षित. विचार करायला लावणारा . अंगावर येणारा

फर्स्ट डे बघितला होता (नेहमीप्रमाणेच!). काही ठिकाणी थरार वाटला आणि काही ठिकाणी अगदीच 'प्रेडिक्टेबल' ! आणि शेवटी मूळ 'कारण' लक्षात येतं तेव्हा तर अगदीच पांचटपणा वाटला.
परेश रावलला जे काही आणि ज्या कोणत्या कारणास्तव करायचं असतं (मी 'सस्पेन्स' सांगणार नाही.. 'तलाश'च्या बाफचा अनुभव आहे!), ते करण्यासाठी त्याने इतका द्राविडी प्राणायाम का करावा? हेच मुळात समजले नाही. म्हणजे - विवान-सियाला 'फ्री हॉलिडे' साठी निवडून 'फिजी'ला नेणे.... टेबल नं. २१ खेळणे.... सिनेमा संपला तेव्हा नैराश्यापोटी आम्ही एका दोन अक्षरी विन्ग्रजी अपशब्दास मुकतकंठाने वाट करून दिली.... तेव्हा आजूबाजूचे सगळेच प्रेक्षक आमच्याकडे सहानुभूतीने पाहात होते..!

आम्हाला पण नाही आवडला आजिबात. सुरुवात कंटाळवाणी, नंतर एकदा गेम सुरु झाल्यावर मजा येइल अशी अपेक्षा होती पण कंटाळाच आला.आटपा काय ते असे वाटत होते. दगडी चेहर्‍याचे अ‍ॅक्टर्स अन एकूण सगळे कृत्रिम डायलॉगबाजी वाटल्याने काहीच बिलिवेबल होत नाही. सुरुवातीपासूनच कुणाबद्दलच सिंपथी वाटत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत काही का होइना काहीच बरे वाईट वाटले नाही.

Fa shevata babat hajar modak pan i guess to he adhich ka nai kel tyach karan sangato......

Mazyasathi ha cinema must watch nai, pan pahila tari nairashya waigere yet nai agadich Proud

<<मुळ कारण लक्षात येत तेव्हा अगदीच पांचट पणा वाटला >> म्हणजे ??? पांचट पणा असा काय होता ? उलट मला स्वताला अगदी अनपेक्षित शेवट वाटला . आणि एका महाभयंकर वास्तवाला एका वेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहे असे मला स्वताला वाटले. ज्याच जळत त्यालाच त्यातली दाहकता समजते.विषयाची मांडणी वेगळ्याप्रकारे केल्याने सिनेमा थेट मनाला भिडतो. वास्तवाची दाहकता तर प्रेक्षकांना समजली पाहिजे ,पण ती सरधोपट पद्धतीने न करता जरा वेगळ्या पद्धतीने केली गेली आहे आणि म्हणूनच मला स्वताला आवडला Happy

नेहमीच्या बॉलीवुडी मसाला चित्रपटांपेक्षा बराच चांगला आहे. कलाकारांनी अभिनय चांगला केला असता तर इम्पेक्ट अजुन जास्त झाला असता. कथा फनी गेम्स, लक, ४०४ या चित्रपटांच मिक्स्चर वाटली.

मलातरी अभिनय चांगला वाटला.

तलाश पेक्शा १० पट चांगला आहे. (लोकं आजकाल अमिर खान ला डोक्यावर घेतात, कितीही टुकार चित्रपट असला तरी)

मला आवड्ला.
दोन अक्षरी अपशब्द राजीव म्हणतो तेव्हा त्याला शोभते ते. माझ्या मागे पण काही लेडीज बायका राजीवला बघण्यासाठी खास आलेल्या, टीना छान दिसते. फ्रेश आहे. केसही सुरेख आहेत तिचे. परेश रावल कडे अ‍ॅक्टिंग आणि राजीव टीना कडे दिसणे हे भाग वर्ग केले असले पाहिजेत. सूट्स मी फाइन.

हं......... मला तर नावही उत्सुकता वाढवणारं वाटलं! छाने! आता तर मी बघीनच हा टेबल नं. २१.

Mala pan rajiv sathi ch jayach hot but kalat navhat jav ki nai..... He parikshan wachun pahayacha tharavala..... Paise vaya gelyasarkhe nai watale...

<<तलाश पेक्शा १० पट चांगला आहे.>> सुयोग अगदी माझ्या मनातल बोललात . अगदी १० पट नसेल तरी पण खूप म्हणजे खूपच चांगला आहे . पण आज काल काय किव्वा अगदी पहिल्या पासूनच काय बेताच बजेट / अनावाजलेले कलाकार ( एखादा सोडून ) /कमी जाहिरात असेल ( कमी बजेट मुळे ) तर कितीही चांगला सिनेमा असेल तरी तो कमीच चालतो . म्हणूनच मी परीक्षण लिहिताना विशेष उल्लेख करून लिहिलंय <<अमिरचा "तलाश" जसा एक सस्पेन्स सिनेमा म्हणून आपण बघितला तसाच एक सस्पेन्स थ्रिलर म्हणून या सिनेमाला पण प्रेक्षकांनी दाद दिलीच पाहिजे . तरच या नवीन नवीन बुद्धिमान लोकांना काहीतरी वेगळ आणि चांगल देण्याचा हुरूप येईल>> Happy

आणि राजीव खंडेलवाल अगदी वाईट अभिनय करत नाही . नवीन हिरोइन मध्ये पण प्रियांका चोप्रा चा थोडासा अगदी थोडासा भास होतो Happy

राजीव खंडेलवाल, 'आमीर'मध्ये खूपच आवडला. टेबल नं. २१ मध्येही त्याचे काम अप्रतिम सुंदर आहेच, वादच नाही. सिनेमा पाहाण्याची दोनच कारणं होती ....

१. राजीव
२. परेश रावल बर्‍याच सिनेमांनंतर नकारात्मक भूमिकेत.

आणि राजीव खंडेलवाल अगदी वाईट अभिनय करत नाही .
>>
नाहीच करत Happy
तस पण मी फक्त राजिव ला पहाते... त्याच्यासारख्यात अभिनय शोधतंच कोण Wink

नवीन हिरोइन मध्ये पण प्रियांका चोप्रा चा थोडासा अगदी थोडासा भास होतो स्मित
>>
अगदी अगदी!
मी केंव्हापासून हे कोणाकडून तरी ऐकायची वाट पहात होते Happy

आमा येस पैसा वसूल आहे. आणि रिया जी काय? Uhoh

नमस्कार मंडळी..इथला बाफ वाचून सिनेमा पहिला..संपूर्ण सिनेमा चांगला होता आणि शेवटी डोंगर पोखरून उंदीर काढावा तसं झालं!!
खंडेलवालचं संपूर्ण सिनेमाभर दाखवलं गेलेलं पात्र आणि शेवटी आलेली त्याची पार्श्वभूमी जस्टीफायच नाही झाली...बाकी सगळी पात्रं ओके!
मागे एकदा 'किडनॅप' नावाचा 'किड'का, 'जखम मांडीला मलम शेंडीला' टाईपचा सिनेमा आलेला त्याची आठवण झाली..:अओ:

आपण इकडे सस्पेन्स न फोडण्याची भाषा करतोय ... पण विकीपिडिया वर तो आधीच फोडलेला आहे. वाचा विकी वाचा....

याचाच अर्थ निर्मात्यांना पण विश्वास नव्हता की हा सिनेमा चालेल की नाही म्हणुन...

खंडेलवालचं संपूर्ण सिनेमाभर दाखवलं गेलेलं पात्र आणि शेवटी आलेली त्याची पार्श्वभूमी जस्टीफायच नाही झाली...बाकी सगळी पात्रं ओके
>>
अनुमोदन!

राजिव चे बदलने गोधळात पाडते.
>>
असही नाही
कारण कॉलेजात आपण सगळेच उनाडच असतो
तसाच तोही होता
सो ठिक आहे
पण शेवट दुसरा काही तरी हवा होता
तरीही आवडला मला

आवडला पण खुप काही extra ordinary वाटला नाही मला! शेवटाचा अ.न्दाज बराच आधी आला होता मला..

Pages