अस्मिता,अभिनिवेश व अहंकार

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 8 January, 2013 - 11:39

मनुष्यात स्वत्व हे हवेच.. संपूर्णपणे स्वत्वविरहित माणूस हा कधी लीन-दीन होईल हे सांगता येणार नाही.. हे ३ पातळ्यांचे असते .

-- या ३ पातळ्यान्पैकी अस्मिता ही हवीच.. तिच्याशिवाय अस्तित्व अर्थहीन.. अस्मिता आत्मविश्वास जिवंत ठेवते..

-- दुसरी पातळी म्हणजे अभिनिवेष हा सद्सद्विवेकबुद्धी ठेवून स्थळ-काळ पाहून केला जाणारा असावा.. योग्य त्या ठिकाणी योग्य ते कम्युनिकेट केले गेलेच पाहिजे..

-- आणि तिसरी म्हणजे अहंकार.. हा आवश्यक ती पातळी सोडून जात नाही ना हे पाहण्यासाठी कायम स्वसंवाद हवा.. टीका सहन करण्याची क्षमता हवी.. याकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे..

अस्मिता-अभिनिवेश-अहंकार हे सद्गुरुंकडेही असतात! तशा सिद्धीही असतात त्यांच्याजवळ, म्हणून त्यांचे शक्तीवर्णन "कर्तुमकर्तुम अन्यथाकर्तुम" असे करतात!

ज्याची देह धर्मातून सुटका झालिनाहिये त्याचे अस्मिता-अभिनिवेश-अहंकार हे तीनही भाव अस्तित्वात असतातच, पण ते परमेश्वर चरणी समर्पित असतात त्यामुळे उक्ती-कृतीद्वारे प्रदर्शित होत नाहीत.

लहान मुल जशी प्रत्येक गोष्ट करताना आईकडे पहाते, तिच्या डोळ्यातून व्यक्त होणार्या सहमतीसाठी तद्वत संत-सद्गुरु आज्ञेवाचून व्यक्त होत नसतात, सगळ काही(अस्मिता-अभिनिवेश-अहंकार- सिद्धी) त्यांच्या जवळ असले तरी ते फक्त ट्रस्टी-कस्टोडीयन असतात, त्यांच अस काहीच नसत, आणि मालक फक्त एक ईश्वरच असतो..

Psychology understands this process as INTROSPECTION may be INTROSPECTIVE MEDITATION a process which leads to INSIGHT.But mere INSIGHT is not enough. perhaps SACHINji talks about INSIGHTS developed through a dialogue with a guru/mater/knowledgable teacher. the next step is awareness about oneself. when does feeling of being better than someone else creeps in and when does one feel grandiose? what does one do when ine has such feelings-such EGO TRIPS? are real challenges. ADHYATM offers insight which is previously recorded and available through teachings, scriptures like GEETA etc THE CHALLENGE IS IN MAKING IT REAL AND PUT INTO PRACTICE.

सद्गुरुना शरण जाणे म्हणजे नेमके काय करणे? माथा टेकवणे? आपल्या विवंचना सांगणे? अनुग्रह मागणे? शेवटी चित्त चित्त म्हणतात त्याचे समर्पण वस्तुतः शक्य नसते , म्हणजे आपण केवळ शरीर झुकवतो मन काही बाहेर काढून ठेवता येत नाही त्याची गती सुद्धा आपली हातात नसते ती कालानुरूप वाढते, कमी होते, परंतु सद्गुरूचे स्मरण केवळ आपले चित्त विचलित न करता होऊ शकणे याला महत्व आहे.

मी सद्गुरूच्या जपाची १०८ मण्याची माळ केली परंतु ते १०८ मी फक्त सद्गुरुचेच स्मरण केले का? दुसरा कोणताही विचार माझ्या मनास शिवला नाही का? सद्गुरुनी अनुग्रह दिला तुझ्या चित्त शांतीसाठी पण त्याचे आचरण १००% सद्गुरूच्या आदेशानुसार करता येईल तो सुदिन.

मनुष्य योनीत मिळालेला जन्म त्यांच्या पुर्वासंचीतास अनुसरून अस्मिता, अभिनिवेश किंवा अहंकार ठेवतो. त्याचे कालानुरूप बदल हे सुद्धा त्याबर्हुकुमच होतात. आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो तेथील आपल्याहून सुद्धा अहंकारी (खुर्चीत बसलेला) अधिकारी उर्मटपणे आपल्याला दुरुत्तरे करतो -आपला अहंकार खरेतर त्याच्याहून कमी नसतो- परंतु आपल्याला त्याच्याकडून काम करून घ्याचे असते तेव्हा आपण आपल्या अहंकाराला न कुरवाळता त्यावर फुंकर घालतो अर्थात हे देखील पुर्वासंचीताच्या संस्काराचे रूप असते. अहंकाराचा सर्वस्वी त्याग करणे किंवा मी तो केला असे म्हणणे हे सुद्धा अहंकाराचे सूक्ष्म रूप आहे.

* आधारित /संग्रहीत

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

masta

खरे आहे भारतीय जी. माबोवर आल्यानंतर अवघ्या 2-3 आठवड्यातच स्वत:ची विशिष्ट अशी ओळख बनवण्यात ~गोमूत्र~जी यशस्वी झालेत